दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 02 नोव्हेंबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 11 कार्तिक शके 1947; तिथि : एकादशी 07:31, द्वादशी 29:07; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 17:03
- योग : व्याघात 23:10; करण : बव 18:24
- सूर्य : तुळ; चंद्र : कुंभ 11:26; सूर्योदय : 06:38; सूर्यास्त : 18:05
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
भागवत एकादशी
तुलसी विवाह आरंभ
चातुर्मास समाप्ती
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
दिनविशेष
गांधीवादी नेत्या इला भट
टीम अवांतर
प्रसिद्ध भारतीय समाजसेविका, वकील आणि गांधीवादी नेत्या इला भट यांचा जन्म 7 सप्टेंबर 1933 रोजी अहमदाबाद येथे झाला. वडिलांप्रमाणे त्यांनीदेखील कायद्याचे शिक्षण घेतले. 1954 साली त्या वकील झाल्या. ‘हिंदू लॉ’ या विषयात त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्याकाळी टेक्सटाइल इंडस्ट्रीमध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते; पण या क्षेत्रात स्वयंरोजगार करणाऱ्या स्त्रियांना तर कायद्याचेदेखील संरक्षण नव्हते. या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी इला भट यांनी अहमदाबादमधील ‘टेक्सटाइल लेबर असोसिएशन’मध्ये प्रवेश केला. 1972 साली त्यांनी प्रथम ‘सेवा’ (सेल्फ एम्लॉयड वुमेन्स असोसिएशन) ही संघटना स्थापन केली. इला भट यांच्या मते ही नुसती संघटना नसून एक चळवळ होती. त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी नवीन कायदे तयार करणे आणि प्रगतीच्या आड येणारे प्रश्न कायदेशीर मार्गाने दूर करणे याबरोबरच महिलांना सक्षम करण्यावर भर दिला. देशातील 18 राज्यांत आणि 7 दक्षिण आशियाई देशांत ‘सेवा’चे कार्य आहे. 4 हजार 813 स्वयंसहाय्यता गट, 160 व्यवसायांनुसार सहकारी संस्था, 15 आर्थिक महासंघ आणि 3 उत्पादक कंपन्या, असा ‘सेवा’चा विस्तार आहे. याशिवाय ‘सेवा’तर्फे महिलांसाठी बँक, आरोग्य सेवा, लहान बालकांसाठी वसतिगृह, विमा, कायदेशीर मदत, गृहनिर्माण आदी गोष्टी उपलब्ध केल्या जातात. श्री सेवा महिला सहकारी बँकेची 1974 मध्ये स्थापना करण्यात आली. भारतातील महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही पहिलीच बँक आहे. 1986 पासून याच संस्थेच्या अंतर्गत ‘इको टुरिझम’ ही नवीन संकल्पना राबवण्यात येते. दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या इला भट यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हली हूड पुरस्कार तसेच पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते ‘ग्लोबल फेअरनेस इनिशिएटिव्ह अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले. नेल्सन मंडेला यांच्या पुढाकाराने 2007 मध्ये स्थापन झालेल्या ‘दि एल्डर्स’ या जागतिक नेत्यांच्या गटामध्येही इला भट यांचा समावेश करण्यात आला होता. हा गट खास करून मानवी हक्क आणि जागतिक शांतता यासाठी कार्यरत आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना इला भट यांनी `अनुबंध’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ग्रामीण भागातील लोकांना लागणाऱ्या जीवनावश्यक गरजा (अन्न, निवारा, कपडे, प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य) त्या परिसराच्या शंभर मैल परिघात उपलब्ध करून देणे, हे त्यामागचे उद्दीष्ट होते. त्यांना त्या `शंभर मैलाचा समुदाय’ असे म्हणत. 2 नोव्हेंबर 2022 रोजी अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : आहाराच्या वेळा आणि प्रमाण
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


