Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    May 25, 2026

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 02 जानेवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 02 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 2, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 02 जानेवारी 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 12 पौष शके 1947; तिथि : चतुर्दशी 18:54; नक्षत्र : मृगशीर्ष 20:04
    • योग : शुक्ल 13:07; करण : गरज, विष्टी 08:37, 29:11
    • सूर्य : धनु; चंद्र : वृषभ 09:25; सूर्योदय : 07:11; सूर्यास्त : 18:11
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी 06:54

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज एखाद्या मोठ्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, एक महत्त्वाचा करार निश्चित होईल. सरकारकडून विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहे. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

    वृषभ – आज तुमचे लक्ष नवीन योजनांवर असेल. एखाद्या पवित्र स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती मिळेल. कायदेशीर वाद जिंकता येईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल, सहकारी तुम्हाला पाठिंबा देतील. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. समस्या दुसऱ्यांना सांगून त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे सयुक्तिक ठरते.

    मिथुन – आजचा दिवस खूप सर्जनशील आहे. एखादे सर्जनशील किंवा कलात्मक काम पूर्ण करण्यात दिवस घालवू शकता. सर्वात जास्त आवडणारे काम करायची संधी मिळेल. ज्या नवीन योजना अखाल, त्यांसाठी वरिष्ठांचा पाठिंबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील.

    कर्क – जे काही समर्पणाने कराल त्याचे परिणाम लगेच मिळू शकतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होतील. ऑफिसमधील वातावरण तुमच्या कल्पनांना अनुकूल असेल, तुमचे सहकारीही पाठिंबा देतील. आज केलेली गुंतवणूक भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल.

    सिंह – आजचा दिवस जरी व्यग्र असला तरी, धार्मिक आणि आध्यात्मिक अभ्यासासाठी थोडा वेळ बाजूला ठेवणे शहाणपणाचे ठरेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या वृत्तीमुळे तुम्हाला आदर मिळेल. 

    कन्या – इतरांशी संवाद साधताना संयम आणि सावधगिरी बाळगा, वाद होणार नाही याची काळजी घ्या. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने वागा. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल.

    तुळ – आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कामाशी संबंधित कोणतेही वाद आज सोडवले जाऊ शकतात. नवीन प्रकल्पावर काम देखील सुरू होऊ शकते. कुटुंब आणि तुमच्या सभोवतालचे लोक मालमत्तेच्या संदर्भात काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.

    वृश्चिक – आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. दिवसभर अनेक फायदेशीर संधी तुमच्याकडे चालून येतील. म्हणून, सक्रिय रहा. नोकरीत किंवा व्यवसायात नाविन्यपूर्ण बदल केल्याने भविष्यात फायदे होतील. तुमचे काम पुन्हा एकदा जोमदार पद्धतीने सुरू होईल. कुटुंबात असलेली शांती आणि स्थिरता अनुभवा.

    हेही वाचा – Social Media : डॅड से नो लेट नाइट पार्टी!

    धनु – आजचा दिवस सावधगिरी आणि दक्षतेचा आहे. व्यवसायात छोटीशी जोखीम घेतल्याने मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन दिनचर्येपेक्षा वेगळे काहीतरी नवीन करून पाहा. एक नवीन संधी अगदी जवळ आली आहे, मात्र ती ओळखणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला प्रिय व्यक्तीसाठी पैशांची तरतूद करावी लागेल.

    मकर – आजचा दिवस सामान्य आहे. भागीदारी व्यवसायातून लक्षणीय नफा मिळेल. संततीबाबत तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. प्रामाणिकपणा ठेवा आणि नियमांचे पालन करा. एकाच वेळी अनेक कामे केल्याने चिंता वाढू शकते. नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.

    कुंभ – आजचा दिवस आरोग्याच्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा आहे. हवामानातील बदलांचा परिणाम होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयींमधील निष्काळजीपणा टाळा. व्यवसायातील वातावरण आनंददायी राहील. घाईमुळे चुका होऊ शकतात, त्यामुळे काहीही करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

    मीन – आजचा दिवस फायदेशीर ठरेल. व्यवसायात जोखीम घेतल्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. संयम आणि सौम्य वर्तनाने समस्या सोडवता येतात. बुद्धिमत्तेचा वापर करून, तुम्ही आपल्यातीलल कमतरता पूर्ण करू शकता. गरजू व्यक्तीला मदत कराल.


    दिनविशेष

    खगोलशास्त्रज्ञ वसंत गोवारीकर

    टीम अवांतर

    खगोलशास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. कोल्हापूरला त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठातून ते एम.एस्सी. झाले. पुढे त्याच विद्यापीठातून संशोधन करून त्यांनी पीएच्.डी. मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते हार्वेल येथील इंग्लंडच्या अणुऊर्जा संशोधन विभागात काम करू लागले. त्यावेळेस भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांची त्यांच्यावर नजर पडली. गोवारीकरांनी भारतात परत येऊन अंतराळ संशोधन कार्याला हातभार लावावा, अशी साराभाई यांची इच्छा होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन गोवारीकर भारतात परत आले.

    भारतात गोवारीकरांनी थुंबा येथील अंतराळ संशोधन केंद्रात कामाला सुरुवात केली. त्यावेळेस भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम अगदीच प्राथमिक अवस्थेत होता. अंतरिक्षात झेप  घेण्यासाठी अनेक क्षेत्रात संशोधन करणे आवश्यक होते. गोवारीकरांनी अग्निबाणात वापरावयाच्या इंधनावर आपले लक्ष केंद्रित केले. थोड्याच अवधीत त्यांना योग्य घन इंधन मिळविण्यात यश आले. त्यांच्या या महत्त्वाच्या कामामुळे भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाला गती मिळाली.

    1973 ते 1979 या काळात ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, या संस्थेतील रसायन विभागाचे प्रमुख होते. 1979 मध्ये ते या केंद्राचे प्रमुख झाले. 1985 पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर पाच वर्षे त्यांनी भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून काम केले. 1991 ते 1993 या कालावधीत ते पंतप्रधानांचे सल्लागार होते. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी त्यांची निवड झाली.

    हेही वाचा – Education : उत्तम संगीताचे संस्कार

    भारतातील शेती ही प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पावसाचा अचूक अंदाज करणे आवश्यक असते. या कामात गोवारीकरांनी पुढाकार घेतला. मोसमी पावसावर प्रभाव टाकणाऱ्या 16 घटकांचा सखोल अभ्यास करून त्यांनी हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी एक आराखडा तयार केला. हा आराखडा खूपच यशस्वी ठरला आहे.
    शेतीसाठी कोणती खते वापरायची यासाठी त्यांनी बनवलेला खतांचा कोश संपूर्ण जगातला असा पहिला कोश ठरला आणि त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी लाभली.

    गोवारीकर यांचा कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना भारतीय खगोल मंडळाच्या वतीने आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता. भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री तसेच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2 जानेवारी 2015 रोजी पुण्यात त्यांनी अंतिम श्वास घेतला.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 मे 2026

    May 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 24 मे 2026

    May 24, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    By Team AvaantarMay 25, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 मे 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 04…

    साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 मे 2026

    May 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 24 मे 2026

    May 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 मे 2026

    May 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    May 25, 2026

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 308
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 431
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 651
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    May 25, 2026

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.