Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    Team AvaantarBy Team AvaantarMay 12, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी, सोया चंक्सचा वापर, रस्सा भाजीत सोया चंक्स, मटार पुलाव, प्रथिनेयुक्त सोया चंक्स, प्रथिनेयुक्त सोयाबिन
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मसालेभात, पुलाव, सोया चंक्स असलेली रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना या टिप्स वापरून पाहा.

    • मोठ्या प्रमाणावर, पंधरा माणसांचा वगैरे मसालेभात करताना फोडणीसाठी तेल तापत ठेवतो, तेव्हाच निम्मे साजूक तूप आणि निम्मे तेल असे एकत्र तापवून नेहमीप्रमाणे फोडणी करून तांदूळ आणि भाज्या परतून मसालेभात करावा. त्यामुळे भात मोकळा चवीला जास्त चांगला लागतो. नंतर दही अगर वरून तूप सोडावे लागत नाही.
    • पुलाव करताना गरम (ताजा) मसाला (धणे, जिरे, दालचिनी, लवंग, मिरी) कोरडा भाजून घेऊन मिक्सरमधून अर्धवट कुटून घ्यावा. तो पाण्यात बराच वेळ उकळून ते उकळलेले पाणी गाळून घेऊन त्या पाण्यात पुलाव शिजविल्यास सौम्य मसाल्याचा पुलाव होतो आणि गाळणीतले मिश्रण पुन्हा आमटीचा मसाला म्हणून वापरता येते.

    हेही वाचा – Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    • बाजारात सोया चंक्स मिळतात. ते पंधरा मिनिटे गरम पाण्यात मीठ घालून ठेवावेत. वांगी, कांदा, बटाटा, अशा कुठल्याही रस्सा भाजीत, गवार आणि इतर शेंगांच्या भाजीत ते घालावेत. एग करी आणि फ्राइड राईसमध्येही ते घालता येतात. त्यामुळे चव छान येते. एक वेगळा प्रकारही होतो. सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण सोयाबिनमध्ये असल्याने ते पौष्टिकही असतात.
    • कटाची आमटी करताना आपण फोडणीला कढीलिंब टाकतो आणि आमटी खाताना तो बाजूला काढून ठेवला जातो; पण तसे न करता आपण इतर मसाल्यांबरोबर कढीलिंब वाटून आमटीला लावल्यास आमटीला रंगही छान येतो आणि चवही छान येते, तसेच कढीलिंब आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. कुठल्याही आमटीला तसे केल्यास तेवढाच चवीत बदल होतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना…

    • मसालेभात, भाज्या आणि पुलाव यात ताजे मटार वापरताना त्यांना थोडासा तेलाचा हात लावावा. मटारचा हिरवा रंग आणि ताजेपणा कायम राहतो. शिवाय तेलामुळे मटार लवकर शिजतात.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,  avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026 फूड काॅर्नर

    मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    May 4, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    By माधवी जोशी माहुलकरMay 10, 2026

    माझे माहेर आणि सासर हे दोन्ही विदर्भातील अकोल्याचे. आमचे शालेय आणि महविद्यालयीन शिक्षण सर्व अकोल्यातून…

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    May 4, 2026

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026

    May 12, 2026

    10 साल जवान कर दिया…

    May 11, 2026

    उपम्याला उपमा नाही…

    May 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 295
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 416
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 206
    • मैत्रीण 19
    • ललित 618
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.