Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 3, 2026Updated:April 7, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी, सुगंधी तांदूळ, बासमती तांदळाचा पुलाव, शाही मसाल्याचा पुलाव, शाही मसाल्याचा पुन्हा वापर
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा.

    • मुगाची डाळ (दाल फ्रायसाठी) शिजवताना जर डाळ जास्त शिजली आहे, असे वाटल्यास त्यात बर्फाचे पाणी किंवा बर्फाचे तुकडे घालावेत म्हणजे गार पाण्याने डाळ लवकर गार होऊन तिला कडकपणा येतो. तुपाची फोडणी दिल्यावर ती रुचकर लागते. मुगाची डाळ शिजवताना त्यात कढीलिंबाची पाने चुरून टाकल्यास डाळीचा वास आणि उग्रपणा कमी होऊन आमटी किंवा दाल फ्राय फारच चविष्ट लागते. तसेच, डाळ शिजविताना त्यात हिरवी मिरची आणि आले घातले, तर स्वाद चांगला येतो.
    • व्हेजिटेबल पुलाव करताना एक टेबलस्पून लोण्यावर बासमती तांदूळ, काजू पाकळ्या, चेरी, मनुका चांगले परता. एका स्वच्छ पांढऱ्याशुभ्र कापडात सर्व शाही मसाला (लवंग, जिरे, दालचिनी, तमालपत्र) पुरचुंडी बांधून भाताच्या भांड्यात ठेवा आणि भांडे कुकरमध्ये ठेवा. शिट्टी झाल्यावर कुकर खाली उतरावा. पुलावला घमघमीत शाही मसाल्याचा स्वाद लागतो आणि या मसाल्याच्या पुरचुंडीचा परत एखाद्या चिकन फ्राय, फिश फ्रायसाठी उपयोग करता येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना…

    • आजकाल पुलावासाठी उत्तम दर्जाचा लांब आणि सुवासिक तांदूळ सर्वांनाच परवडेल, अशा किमतीचा राहिलेला नाही. चविष्ट पुलाव करण्याची हौस मात्र खूप जणांना असते. अशा वेळेस लांब दाण्याचा मध्यम प्रतीचा तांदूळ घेऊन त्यात साधारण पाच किलोस 10-12 लवंगा, या प्रमाणात घ्या. लवंगा तांदळात घालून हवाबंद डब्यात ठेवल्यास तांदळाला सुरेख वास येतो. भात शिजविताना लवंगा काढून ठेवाव्यात. तांदळाला कीड, जाळी लागत नाही. शिवाय, तांदूळ संपल्यावर लवंगा मसाल्यात वापरता येतात.
    • मेथीदाणे धुऊन, बेताचे पाणी घालून भिजवावेत. (मेथीदाणा फुगल्यावर त्यात पाणी उरू नये) भिजल्यावर फडक्यात बांधून अंकुरित होऊ द्यावे. चांगले मोड आल्यावर सावलीत कोरडा वाळवावा. आमटीच्या डाळीच्या डब्यात मिसळून द्यावा. अनायासे रोज थोडा-थोडा मेथीदाणा खाल्ला जातो. मेथीदाण्याचे वातहारक आणि मधुमेह नियंत्रक गुण सर्वश्रुत आहेत.

    हेही  वाचा – Kitchen Tips : कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर बनवताना हे करून पाहा…

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    April 2, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    By Team AvaantarApril 7, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    April 2, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 18
    • ललित 547
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.