Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : नगरेंचि रचावीं, जळाशयें निर्मावीं
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : नगरेंचि रचावीं, जळाशयें निर्मावीं

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 15, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Fourteen, चौदावा अध्याय, अध्याय चौदावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय चौदावा

    आणि आड पडलिया । उद्यमजातां भलतेया । प्रवृत्ती धनंजया । हातु न काढी ॥231॥ तेवींचि एखादा प्रासादु । कां करावा अश्वमेधु । ऐसा अचाट छंदु । घेऊनि उठी ॥232॥ नगरेंचि रचावीं । जळाशयें निर्मावीं । महावनें लावावीं । नानाविधें ॥233॥ ऐसैसां अफाटीं कर्मीं । समारंभु उपक्रमीं । आणि दृष्टादृष्ट कामीं । पुरे न म्हणे ॥234॥ सागरुही सांडीं पडे । आगी न लाहे तीन कवडे । ऐसें अभिलषीं जोडे । दुर्भरत्व ॥235॥ स्पृहा मना पुढां पुढां । आशेचा घे दवडा । विश्व घापे चाडा । पायांतळीं ॥236॥ इत्यादि वाढतां रजीं । इयें चिन्हें होतीं साजीं । आणि ऐशा समाजीं । वेंचे जरी देह ॥237॥ तरी आघवांचि इहीं । परिवारला आनी देहीं । रिगे परी योनिही । मानुषीचि ॥238॥ सुरवाडेंसिं भिकारी । वसो पां राजमंदिरीं । तरी काय अवधारीं । रावो होईल ॥239॥ बैल तेथें करबाडें । हें न चुके गा फुडें । नेईजो कां वऱ्हाडें । समर्थाचेनी ॥240॥ म्हणोनि व्यापाराहातीं । उसंतु देहा ना राती । तैसयांचिये पांती । जुंपिजे तो ॥241॥ कर्मजडाच्या ठायीं । किंबहुना होय देहीं । जो रजोवृत्तीच्या डोहीं । बुडोनि निमे ॥242॥ मग तैसाचि पुढती । रजसत्त्ववृत्ती । गिळूनि ये उन्नती । तमोगुण ॥243॥ तैंचि जियें लिंगें । देहींचीं सबाह्य सांगें । तियें परिस चांगें । श्रोत्रबळें ॥244॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : धाराधरकाळें, महानदी उचंबळे

    अर्थ

    आणि अर्जुना, कोणाताही धंदा समोर आला असता (करण्याचा प्रसंग आला असता) तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल तो मागे घेत नाही. ॥231॥ त्याचप्रमाणे एखादे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा, असा अघटित नाद घेऊन तो उठतो. ॥232॥ शहरेच वसवावीत, जलाशय वगैरे पाण्याचे साठे बांधावेत, नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत ॥233॥ अशा अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इहलोकीचे व परलोकीचे भोग मिळण्याच्या कामात पुरे म्हणत नाही. ॥234॥ समुद्र दुर्भर खरा, पण तो या रजोगुणी पुरुषाच्या अभिलाषापुढे हार खाईल. अग्नीला कितीही जळण घातले तरी, त्याची तृप्ती होत नाही, असा तो दुर्भर आहे खरा, परंतु त्या पुरुषाच्या अभिलाषाच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची तीन कवड्या किंमत नाही, असे त्याच्या अभिलाषाच्या ठिकाणी दुर्भरत्व असते. ॥235॥ त्याची विषयतृष्णा ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व तो सर्व विश्व इच्छेच्या पायाखाली घालतो. ॥236॥ याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे ही लक्षणे टवटवीत (व्यक्त) होतात. व अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला तर ॥237॥ तर या सर्व लक्षणांनी युक्त असा तो रजोगुणी पुरुष दुसर्‍या देहात प्रवेश करतो परंतु (ती) मनुष्याचीच योनी असते. ॥238॥ हे पहा, एखादा भिकारी चैनीने राजवाड्यात वसेना का? तर तेवढ्यावरून तो राजा होईल का? ॥239॥ बैलाला जरी श्रीमंताच्या लग्नाबरोबरच्या मंडळींनी (गाडीला जोडून) नेला, तरी त्याच्या कपाळाचा कडबा खरोखर चुकत नाही. ॥240॥ म्हणून व्यापारामुळे ज्यांना रात्रंदिवस विसावा मिळत नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीस तो जुंपला जातो. (तशांच्या कुळात तो जन्मतो). ॥241॥ फार काय सांगावे? जो रजोगुणाने बनलेल्या वृत्तींच्या उत्कर्षरूपी डोहात डुंबून मरण पावतो, तो कर्मठांच्या कुळात जन्मतो. ॥242॥ त्याचप्रमाणे जेव्हा पुढे रजोगुण व सत्त्वगुण नाहीसे करून तमोगुण उन्नतीला येतो. ॥243॥ त्या वेळची जी लक्षणे देहाच्या आतबाहेर असतात, ती आता आम्ही सांगतो. ती चांगल्या श्रोत्रबळाने (लक्षपूर्वक) ऐक. ॥244॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सांग पां धनुर्धरा, रावो रायपणें डोंगरा

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : सांग पां धनुर्धरा, रावो रायपणें डोंगरा

    October 14, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : धाराधरकाळें, महानदी उचंबळे

    October 13, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    By डॉ. शिरीष कुलकर्णीOctober 15, 2026

    माया / भाग – 8 ज्ञेयो न विषयो ह्यात्मा निर्विकारो ह्यतोऽद्वयः। स्वीकारो वा परित्यागो नात्मनो…

    सार्थ ज्ञानेश्वरी : सांग पां धनुर्धरा, रावो रायपणें डोंगरा

    October 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : धाराधरकाळें, महानदी उचंबळे

    October 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : त्रिगुणवृद्धिनिरूपण, तीं श्लोकीं सांगितलें जाण

    October 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026

    दरवाजा ढकलायचा की, ओढायचा?

    October 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नगरेंचि रचावीं, जळाशयें निर्मावीं

    October 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑक्टोबर 2026

    October 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 471
    • अवांतर 217
    • आरोग्य 159
    • पंचांग आणि भविष्य 630
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 259
    • मैत्रीण 32
    • ललित 994
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.