Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सदाफुली… पण विरहात मलूल झालेली!
    ललित

    सदाफुली… पण विरहात मलूल झालेली!

    स्नेहा सुतारBy स्नेहा सुतारMay 16, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, श्री जुईली प्रेमकथा, श्री जुईली विरहकथा, श्री जुईची प्रेमकहाणी, श्रीसाठी जुईलीचे झुरणे, जुईलीच्या मनाची तळमळ, अस्वस्थ जुईली, जुईलीची मैत्रीण रेवती, रेवतीचे जुईलीवर चिडणे, रेवती जुईली मैत्री,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 14

    “माझ्याकडे बघ इकडे. मी काय सांगतेय बघ… ऐक!” रेवती तावातावाने बोलू लागली तशी जुईली दचकली.

    “काय गं काय म्हणतेय मी, स्वतःकडे बघितलंयस का कशी झालीयेस ती? काही होतंय का तुला? काय चाललंय तुझं हे सगळं? स्वतःविषयी काही वाटतं की नाही तुला? की त्याच्या हातचं खेळणं आहेस? हवं तेव्हा जवळ केलं, हवं तेव्हा लांब… आणि तुला काही अक्कल? स्वतःचं असं करू द्यायचं दुसऱ्या कुणामुळे? हे बघ… आरसा बघ हा. यात कोण दिसतंय? ही तू आहेस? ही अशी??” रेवतीचा स्वर तीव्रच होत चाललेला. तिला उत्तर देण्यासारखं आत्ता तरी जुईलीकडे काहीच नव्हतं आणि ती गप्प राहतेय ते बघून रेवतीचा अजूनच पारा चढत होता.

    “तू उठ… इथून आधी उठ आणि चल माझ्यासोबत. ये केस बांधून देते, तोंडावर पाणी मार जरा, कपडे बदल आणि चल माझ्यासोबत तू. त्याशिवाय व्हायचं नाही तुझं हे सगळं नीट. चल जरा मोकळ्या हवेत जाऊया.” रेवतीने जुईलीला हाताला धरून उठवलं आणि तिला खुर्चीत बसायला सांगून आपण कंगवा हातात घेतला. जुईलीचे अस्ताव्यस्त झालेले केस तिने सोडवले. केसांचा रब्बर मनगटात घालून तिने तिच्या केसांचा गुंता सोडवायला घेतला.

    “बघ कसे झालेयत केस. तेल वैगेरे काय घातलेलं दिसत नाहीये, कितीतरी दिवस. नुसत्या वाफा झाल्यात डोक्याच्या. शेगडी झालीय शेगडी!”

    काहीही उत्तर न देता कितीतरी वेळापासून जुईली तिचं बोलणं ऐकत होती.

    “अगं घुमे आता बोलशील की नाही? काही गिळलंयस का? आज मौनव्रत आहे का? की बोलणार नाहीयेस माझ्याशी? त्याने हात फिरवलाय का डोक्यावरून? अप्लाय अप्लाय नो रिप्लाय?”

    “रेवू, तुला माहीत आहे केकी मूस?” अचानक दगड फेकून मारावा तसा जुईलीने रेवतीला प्रश्न केला. अनपेक्षित प्रश्नाने रेवती जरा हबकली.

    “कुठल्या केकचा ब्रँड की काय?”

    “केकी मूस… तीनशेहून अधिक सुवर्णपदकं मिळवलेला हा विश्वविख्यात छायाचित्रकार. मात्र याला आवड ती फक्त ग्रे शेड्सची. वेगवेगळे ग्रे शेडस आणि त्या ग्रेमधून गडद होत जाणारा काळा रंग. हा माणूस अगं काळ्या रंगाला कवटाळून बसलेला. त्याचे सगळे फोटो फक्त काळे, पांढरे आणि ग्रे.”

    हेही वाचा – घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    “मग त्याचं काय आता मधेच?”

    “हा केकी ना रोज रात्री दोन वाजता येणाऱ्या कलकत्ता मेलची वाट बघत बसायचा. ती ट्रेन आली की, दरवाजापर्यंत जायचा. रोज ‘तिच्या’ स्वागताला तयार व्हायचा आणि कलकत्ता मेल गेली की, तिच्या न येण्याने रोज तीळ तीळ तुटायचा… रोज… रोज आतल्या आत मरायचा.  रात्र सरली की, दुसर्‍या दिवशी पुन्हा नव्या जोमाने जगायचा.”

    “हां का? हा आवडलाय का तुला?”

    “काय माणसं असतात ना गं रेवा एकेक… प्रेमात आकंठ बुडणारी… आणि या बुडण्यात आनंद मानणारी. मला मात्र गुदमरायला होतंय गं… असं का? माझं चुकतंय की त्याचं? हळूहळू माझा पण आता केकी होणारेय असं वाटतंय मला!”

    “तुला एक सांगू का जुई, मला ना नको कुणाचं सांगूस काही. मला तू हवी आहेस, जशी होतीस तशी. लॅपटॉपवर तू असतीस तर अन-डू केलं असतं तुला. रिफ्रेश बटण दाबत राहिले असते पुन्हा पुन्हा… तू या वेडातून उठेपर्यंत! झोपलेल्या माणसाला एकवेळ उठवायला बरं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं उठवायचं?”

    “कळतंय गं मला सगळं. पण अचानक असं एकाएकी बोलणं चालणं बंद केलं म्हणजे कसं होणार गं माझं? काय झालंय नक्की ते कळू तरी दे… जायचंच होतं तर सांगून जायचं होतंस. अचानक काहीही न कळवता वागणं बदलतं, एकाएकी बोलणं बदलतं, एकाएकी सगळंच बदलतं…”

    “आता काय करूयात? जाऊया पुण्याला? गाठून घेऊयात का त्याला? कॉलरला धरून विचारूया का? की कानफाडवूया? काय करायचं? तू सांग.”

    “तुला माहीत आहे, माझं डोकं फुटायला आलंय विचार करून करून… मला कळतच नाहीये मी काय करू?”

    “आता सध्या उठ. केस विंचरले बघ मी. किती छान दिसलीस! जा पाणी मार चेहऱ्यावर जरा. कपडे पण बदल… आणि चल माझ्यासोबत. चल उठ!” रेवतीने जुईलीला बळेच उठवलंच आणि तिची वाट बघत ती गॅलरीत उभी राहिली.

    गॅलरीत तिला बाहेर बघताना जाणवलं, जुईलीने एकाही झाडाला नीट पाणी दिलं नव्हतं. तिने जाऊन आतून पाणी आणलं आणि मगातून ती झाडांना पाणी घालू लागली. ही जास्वंदी अगदी कशी वाळून गेलेली. तिला तिने कुरवाळलं. नाजूकपणे पाणी घातलं. ही सदाफुली. अगदी जुईलीसारखी. सदानकदा फुललेली. आता कशी मलूल झालीये. अगदी जुईसारखीच! अरे यार, काय करून घेतलंय जुईलीने स्वतःचं… जीवापाड जपायची या झाडांना ती. सावर गं बाई स्वतःला…

    एवढ्यात तिला जुईलीची चाहुल लागली. “ए जुई, हे काय गं केलंयस त्या झाडांचं? त्यांचा काय दोष म्हणून अशी वागतेयस त्यांच्याशी?”

    “दोष नाही गं… कुणाचाच दोष नाही. दोष माझाच. मीच जीव लावला…”

    “हां चल, झालं सुरू तुझं. कपडे कर आणि चल माझ्यासोबत आता.”

    बादली घेऊन रेवती घरात गेली. जुईलीच्या आईकडे किचनमध्ये बोलत बसली. जुईलीने बेडरूमचं दार लावून घेतलं. काही वेळात तयार होऊन ती आली. तयार म्हणजे फक्त टीशर्ट पॅन्ट बदलून आली.

    हेही वाचा – वाढत चाललेला गुंता अन्…

    “ओ मॅडम, सूतकी चेहरा करून फिरू नका. हसा जरा,” रेवतीने तिला बघताच क्षणी म्हटलं. जुईलीचा चेहरा तरीही मख्ख!

    “चल काकी, आम्ही जाऊन येतो गं. घेऊन जाते जरा हिला माझ्यासोबत. छान फिरवून आणते.”

    “जा जा गं बाई… बरं वाटेल पोरीला…” आईने संमती दिली तसे दोघेही दार उघडून बाहेर निघाले.

    जिना उतरून खाली आल्यावर रेवतीने आपल्या गाडीकडे जाताना जुईलीला सांगितलं, “आपण आता जरा सुपरमार्केटला आधी जाऊयात. तिथून मग आपल्या कट्ट्यावर. माझ्या डोक्यात ना एक सुचलंय काहीतरी. सांगते तुला चल कट्ट्यावर बसल्यावर. आज बोलूयात खूप हां.”

    “हं…”

    एवढंच बोलून जुईली तिच्या मागे बसली. स्टार्ट बटण दाबून रेवतीने गाडी स्टार्ट केली आणि दोघेही दिसेनासे झाले.

    क्रमश:
    स्नेहा सुतार

    Related Posts

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026 ललित

    “खरा डाव आता सुरू होतोय…”

    May 16, 2026 ललित

    अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!

    May 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    By मधुर सुनील कुलकर्णीMay 16, 2026

    बोर्ड मीटिंग झाली आणि नील हॉटेलवर परत आला. मीटिंग लवकर संपली होती. नील चेन्नईला मीटिंगसाठी…

    “खरा डाव आता सुरू होतोय…”

    May 16, 2026

    अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!

    May 15, 2026

    अल्लड हर्षा अन् तिच्या मैत्रिणी

    May 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026

    सदाफुली… पण विरहात मलूल झालेली!

    May 16, 2026

    “खरा डाव आता सुरू होतोय…”

    May 16, 2026

    Dnyaneshwari : अगा आत्मा तूं एकु, सकळविश्वव्यापकु…

    May 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 299
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 421
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 208
    • मैत्रीण 19
    • ललित 629
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.