Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’
    ललित

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    मधुर सुनील कुलकर्णीBy मधुर सुनील कुलकर्णीMay 16, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, नीलची प्रेमकहाणी, स्मृतीची प्रेमकहाणी, नील स्मृतीची प्रेमकहाणी, झेंडुची फुले, झेंडुच्या फुलांची स्मृती, चित्रकार स्मृती, स्मृतीचे आवडते फुल झेंडू, झेंडुमुळे नील स्मृतीची भेट
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    बोर्ड मीटिंग झाली आणि नील हॉटेलवर परत आला. मीटिंग लवकर संपली होती. नील चेन्नईला मीटिंगसाठी आला होता. या ट्रिपमध्ये आईबाबांना घेऊन आला होता. त्यांना क्षमाताईकडे सोडून तो हॉटेलवर आला. डिनरला वेळ होता म्हणून त्याने फेसबुक ओपन केले. बिझी शेड्युलमुळे हल्ली त्याचं व्हॉट्सॲप, फेसबुक बघणं होतंच नव्हतं. स्क्रोल करताना अचानक एक अप्रतिम पेंट केलेलं झेंडूचं फुल त्याला दिसलं. त्याने अकाऊंटवर नाव बघितलं. फक्त स्मृती नाव होतं आणि प्रोफाइलवर झेंडूचं फुल. ही स्मृती कुलकर्णी तर नव्हे? पण केवळ नावावरून तीच स्मृती असेल असं कशावरून? पण तीच असावी, झेंडूचं फूल प्रोफाइलवर म्हणजे स्मृतीच असणार! पण प्रोफाइल लॉक होतं. नीलने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ते अतिशय सुंदर झेंडूचं फूल बघता बघता नीलला स्मृती आठवली. झेंडूच्या फुलांच्या प्रेमात असलेली! स्मृतीच्या स्मृतीत नील हरवला…

    आठवीचा वर्गात मराठी विषयाच्या सिधये सरांनी प्रवेश केला आणि सगळी मुलं अगदी शांत झाली. सिधये सरांचा तसा मुलांना धाक होताच, पण त्याच्या शिकवण्यावर सगळे विद्यार्थी खूश असत. मराठी विषयाची गोडी केवळ सिधये सरांमुळेच लागली, हे वर्गातील विद्यार्थी मान्य करायचे. सर खुर्चीवर बसले. पुढचं टेबल त्यांनी आपल्या पुढे ओढलं आणि म्हणाले,

    “आज तुम्हाला ‘माझं आवडतं फूल’ या विषयावर निबंध लिहायचा आहे. या तासाची पूर्ण पंचेचाळीस मिनिटं तुमच्या हातात आहेत. उत्तम निबंध होईल असा प्रयत्न करा. कोणाचा सगळ्यात उत्तम झाला आहे, ते मी उद्या सांगेन. लिहायला सुरुवात करा.”

    “काय बोअरिंग विषय दिला आहे सरांनी. चौथीतल्या मुलांचा विषय!” नील बाजूला बसलेल्या समरला म्हणाला.

    “या विषयात एखाद्या मुलीलाच उत्तम शेरा मिळणार. हे असले नाजूक विषय मुलींचेच! लिहितील गुलाब, मोगरा, नाहीतर निशिगंधावर!” समर वही-पेन काढत म्हणाला.

    “समर, चॅलेंज देऊ नकोस हं! बघ आता, माझाच उत्तम होतो की नाही ते!”

    पिनड्रॉप सायलेन्समध्ये सगळे निबंध लिहायला लागले. तास पूर्ण झाला आणि सरांनी चेकिंगसाठी वह्या घेतल्या. शाळा सुटल्यावर वर्गाच्या बाहेर नीलला स्मृती, नेहा, सुरुची बोलताना दिसल्या.

    “सुरुची, कुठल्या फुलावर लिहिलंस?” नीलने विचारलं.

    “मी मोगऱ्यावर लिहिलंय. मोगऱ्यासारखा सुगंध कुठल्याच फुलांचा नसतो… आणि माउलींनी किती सुंदर काव्य केलं आहे. मोगरा फुलला…”

    “मी निशिगंधावर लिहिलंय. धुंद करणारा सुवास आणि पांढराशुभ्र रंग…” नेहा म्हणाली.

    “आणि तू कशावर लिहिलंय?” सुरुचीने विचारलं.

    “अर्थातच गुलाब! फुलांचा राजा! प्रेमिकांचे आवडते फूल!” नील म्हणाला.

    “हं! तुम्हा मुलांना दुसरं कुठलं फूल दिसतं का?” नेहा बोलल्यावर तिघीही हसल्या.

    “स्मृती, तू कुठलं फूल निवडलं?”

    “झेंडूचं फुल…” स्मृती नीलकडे बघत म्हणाली.

    “किती अरसिक गं! दुसरी कुठली फुलं तुला आठवली नाही का?” नील नाक मुरडत म्हणाला.

    “आठवली नं! पण आवडत्या फुलावर लिहायचं होतं, ते मी लिहिलं.” स्मृतीने नीलकडे बघितलं आणि ती चालायला लागली.

    “स्मृती जरा वेगळीच आहे, असं नाही वाटत नील तुला?” समर नीलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

    “हो! ती वेगळी आहे म्हणूनच उठून दिसते…” नील स्मृतीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाला.

    स्मृती आठवीतच नीलच्या वर्गात नवीन आली होती. अगदी साधी, मितभाषी, हुशार आणि हातात उत्तम चित्रकला असलेली! तिचा ड्रॉइंगचा पेपर सगळ्या वर्गात दाखवला जायचा. चित्रातली एकेक रेष बघत राहावी, अशी आणि त्याहून सुंदर त्याची रंगसंगती!

    हेही वाचा – जाडेपणाबद्दल ओळखणारी रुंजी कॉलेजमध्ये गेली अन्…

    दुसऱ्या दिवशी सिधये सरांनी वह्या काढल्या आणि स्मृतीला बोलावलं…

    “सगळ्यात स्मृतीने उत्कृष्ट निबंध लिहिला आहे. अतिशय वेगळं फूल निवडून, त्यावर सुरेख निबंध लिहिलाय. स्मृती, यातल्या काही ओळी तूच वाचून दाखव.”

    स्मृतीने वहीचे पान समोर धरले आणि ती वाचू लागली.

    “फूल हे सुंदरच असतं, मग रानटी फूल का असेना! एखाद्या माळरानात छोट्या खडकावर एखादं फुल आपोआप उगवतं, ते त्या माळरानाची शोभा वाढवण्यासाठीच!

    माझं सर्वात आवडतं फूल, झेंडूचं फूल आहे. खरंतर, फुलांचा राजा गुलाब आहे, त्याचं मोहक रूप, त्याचा कुठलाही रंग आकर्षित करणारा आहे. पण त्याच्या सौंदर्याचा त्याला गर्व आहे. तो सहजासहजी जवळ येऊ देत नाही. एखादा तरी काटा टोचतोच!

    झेंडूच्या फुलांसारखं पावित्र्य कशातच नाही. केशरी झेंडू, पिवळा झेंडू, अगदी छोटा लाल झेंडू असला तरी भगवंताच्या चरणी अर्पण करताना, मूर्तीचं सौंदर्य वाढतं. त्याच्या केशरी, पिवळ्या रंगाची झळाळी जणू देवाच्या मुखावर विलसत असते. आपल्या मराठी सणांमध्ये जे साडेतीन मुहूर्त आहेत, त्या दिवशी झेंडूइतकं महत्त्व कुठल्याच फुलांना नाही. प्रवेशद्वारावरचे तोरण, देव्हाऱ्यात, रांगोळीत आणि वाहनांना हार घालताना सुद्धा झेंडूचीच फुले वापरतात. घरातली फुलं जर संपली असली तर, एका झेंडूच्या पाकळ्या तोडून सगळ्या देवांना वाहता येतं. म्हणतात न, ‘फूल नाही तर फुलाची पाकळी”!

    झेंडूचे फुल औषधीयुक्त आहे. याचं इंग्रजी नाव कॅलेंडूला आहे आणि हे फुल होमिओपॅथीमध्ये औषध म्हणून वापरतात…”

    स्मृती वाचत होती आणि नील तिच्याकडे टक लावून बघत होता. किशोरवयीन नीलला स्मृतीचे आकर्षण वाटायला लागले. रोज शाळा सुटल्यावर तिच्याशी काहीतरी कारण काढून बोलायचा.

    दहावीचा शेवटचा पेपर झाला आणि नील उदास झाला. स्मृती आता रोज दिसणार नव्हती. त्याने स्मृतीला भेटायचे ठरवले आणि त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या ठरवल्या. पण स्मृतीला हे आवडेल? दहावीत हे असं विचारणं म्हणजे फारच उथळपणा! त्याची हिम्मतच झाली नाही. दहावीचा निकाल लागला. शाळेत रिझल्ट बघायला गेलेला नील, स्मृतीला शोधत होता, पण ती दिसलीच नाही. त्याने सुरुचीला गाठलं. “सुरुची, स्मृती दिसत नाहीये. आली नाही का?”

    “स्मृतीच्या वडिलांची दिल्लीला बदली झाली आहे. ते शिफ्ट झाले तिकडे! रिझल्ट घ्यायला ती कधी येणार ते काहीच माहिती नाही.”

    नील ते ऐकून निराश झाला. सुरुचीला तरी कसं सांगणार? ते वय प्रेमात पडण्याचं नव्हतंच. नीलने स्मृतीला स्मृतिआड करत करिअरवर फोकस केलं. उत्कृष्ट मार्काने इंजिनीअर झाला. कॅम्पस सिलेक्शन झालं आणि प्रख्यात कंपनीची ऑफर आली.

    चेन्नईची त्याची ही पहिलीच बोर्ड मीटिंग होती. त्याच्या हुषारीमुळेच, इतक्या लहान वयात तो बोर्ड मीटिंगला हजर होता… आणि आत्ता स्मृतीचं प्रोफाइल बघून नील आठवणीत रमला.

    त्याने स्मृतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. डिनर करून आल्यावर त्याला स्मृतीने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली दिसली. त्याने मेसेंजरवर मेसेज टाकला – ‘हाय स्मृती, मी नील कामत! कशी आहेस? कुठे असतेस?’

    लगेच स्मृतीचा रिप्लाय आला…

    ‘मी मजेत आहे. मुंबईत असते. जे जे स्कुल ऑफ आर्टस् मध्ये प्रोफेसर आहे. तू कुठे असतो?’

    – – ग्रेट! तुझं आवडीचं प्रोफेशन. मी पुण्यालाच आहे. तू पुणे सोडलं हे सुरुचीकडून कळलं होतं.

    — हो पपांची बदली झाली, त्यावेळी दिल्लीला. त्यांनतर, हैद्राबाद, बंगलोर आणि आता मुंबईत सेटल झालोय. पपांनी आता व्हीआरएस घेतलीय.

    — भेटून बोलायचं? असं मेसेंजरवर नको.

    — हो पण कसं? मी मुंबईत, तू पुण्यात!

    — मी येईन मुंबईला! कळवतो तुला! तुझा फोन नंबर पोस्ट कर.

    — हं करते! पण कशावरून मी ज्या नीलला ओळखते तोच तू आहेस? फेसबुकवर फेक अकाऊंट्स पण असतात.

    — ही चेष्टा असेल तर वेलकम! इतकं सगळं बोलून झाल्यावर तू मला हे विचारते आहेस? ठीक आहे, मी माझा नंबर देतो. हवं तर तू कॉलर आयडीवर चेक करून घे.

    नीलने अत्यानंदाने मोबाईल बंद केला. डोळ्यासमोर सारखी स्मृती येत होती. त्यावेळी विचारायची हिम्मत झाली नाही, पण आता स्मृतीला विचारायचं! पण तिचं लग्न झालं असेल तर? नील परत निराश झाला. पण स्मृतीला भेटायचं हे त्याने ठरवलंच होतं.

    आठवड्याने नीलने स्मृतीला फोन केला, “कामासाठी मुंबईत येतोय. तुझ्या सोयीने कुठे भेटायचं ते ठरव.”

    स्मृतीने नीलला दादरच्या एका हॉटेलमध्ये बोलावले. तिने टेबल बुक केलं होतं. तिच्या मनात आलं, पण नीलला मी ओळखणार कसं? त्याचे तपकिरी डोळे तेव्हाच मनात भरले होते. दहावीत तर नील शाळेचा हीरो होता. त्याची उंची, त्याचे सरळ रेशमी केस, सावळा रंग, त्याची बोलण्याची लकब… सगळंच मोहात पाडणारं होतं. खूप आवडायचा नील! पण व्यक्त होण्याचं ते वय नव्हतं. नंतर कधी भेटच झाली नाही…

    हेही वाचा – भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    एक उंचपुरा मुलगा रुबाबात येताना स्मृतीला दिसला. तिचा मोबाईल वाजला. नीलचाच फोन होता. स्मृतीने त्याला हात दाखवून बोलावले.

    नील टेबलजवळ आला आणि स्मृतीकडे बघत बसला. स्मृती जास्तच सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर एक ग्लो आला होता. साधीच पण मोहक!

    स्मृतीने नीलकडे बघितलं. तेच देखणं रूप! आता तर कमावता झाल्यामुळे चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता.

    “काय बघतेस? नीलच आहे हे कन्फर्म झालंय नं?” नीलने हसत विचारले.

    स्मृती हसली. “हो, फारसा फरक नाही तुझ्यात. फक्त डोळ्यावर चष्मा आलाय. पण शोभतोय तुला. पुण्यात कुठे जॉब करतोस?”

    “एका मल्टिनॅशनल कंपनीत आहे… ते जाऊ दे. तू सांग, तुझं ड्रॉइंग सुरू आहे नं?”

    “तेच तर माझं प्रोफेशन आहे नं! एका इंटरनॅशनल प्रदर्शनात माझ्या चित्राला अवॉर्ड मिळालंय. माझं फेसबुकवरचं प्रोफाइल आहे नं, तेच चित्र!”

    “खूप खूप अभिनंदन! तुझं झेंडूच्या फुलाचं वेड तसंच आहे तर!”

    “हो! खूप आवडीचं फूल!”

    स्मृतीशी गप्पा करताना एक तास कसा गेला नीलला कळलंच नाही. विचारू का नको या संभ्रमात त्याने शेवटी स्मृतीला विचारलंच!

    “लग्न केलंस?”

    “नाही! आई पपांनी वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं आहे.”

    नीलने हिम्मत करून खिशातलं झेंडूचं फूल काढलं, उजव्या हातात धरलं, डाव्या हाताचा तळवा पुढे करत स्मृतीला म्हणाला, “माझी होशील? शाळेत असतानाच तू आवडत होतीस, पण तेव्हा विचारायची हिम्मत नव्हती, आज करतोय. तुझा होकार असेल तर, तुझ्या डाव्या हाताने ह्या फुलाचा स्वीकार कर आणि उजवा तळवा माझ्या डाव्या तळव्यावर ठेव. तुझा नकार असला तरी मला मान्य. मैत्री कायम ठेवू.”

    स्मृतीने नीलकडे बघितलं. त्याच्या डोळ्यातली प्रीती तिला सहन होईना! तिने डाव्या हाताने ते झेंडूचे फूल घेतले आणि उजवा तळवा नीलच्या तळव्यावर ठेवला. नीलने तिच्या तळव्यावर ओठ टेकले.

    “व्हॉट अ लव्हली, रोमँटिक मोमेंट.”

    नील आणि स्मृतीने वळून बघितलं तर, एक फॉरेनर त्यांचा मोबाईलवर फोटो काढत होता.

    “हॅलो गाईज! व्हॉट अ स्वीट पेअर! गॉड ब्लेस यु! गिव्ह मी युअर मोबाइल नंबर. आय विल सेंड यु द पीक.”

    नीलने स्मृतीकडे बघितलं. झेंडूच्या फुलासारखी ती प्रसन्न आणि टवटवीत दिसत होती…

    Avatar photo
    मधुर सुनील कुलकर्णी

    M A (इंग्लिश) असून पुण्याला वास्तव्य आहे. पाच वर्षांपूर्वी कथालेखनास प्रारंभ केला. त्याआधी अनेक कविता केल्या आहेत. आत्तापर्यंत 60 कथांचे लेखन! 'सिद्धी' हा पहिला कथासंग्रह एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झाला. दुसरा कथासंग्रह 'भक्ती!' नोव्हेंबर 2025मध्ये प्रकाशित झाला आहे. 'सिद्धी' या कथासंग्रहास जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत एक आंतराष्ट्रीय द्वितीय पारितोषिक आणि तीन राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 'भक्ती' या कथासंग्रहास चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही कथांना प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार लाभले आहेत. याबरोबरच गाण्याची आवड असून पुण्यात स्टेज शो करते. हौशी चित्रकार असून अनेक स्केचेस काढले आहेत.

    Related Posts

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026 ललित

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026 ललित

    चमचम

    August 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    By प्रणाली मंगेश महाशब्देAugust 22, 2026

    I Love You! तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर, झालं असं की, काल आम्ही सगळे…

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.