Author: मधुर सुनील कुलकर्णी

Avatar photo

M A (इंग्लिश) असून पुण्याला वास्तव्य आहे. पाच वर्षांपूर्वी कथालेखनास प्रारंभ केला. त्याआधी अनेक कविता केल्या आहेत. आत्तापर्यंत 60 कथांचे लेखन! 'सिद्धी' हा पहिला कथासंग्रह एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झाला. दुसरा कथासंग्रह 'भक्ती!' नोव्हेंबर 2025मध्ये प्रकाशित झाला आहे. 'सिद्धी' या कथासंग्रहास जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत एक आंतराष्ट्रीय द्वितीय पारितोषिक आणि तीन राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 'भक्ती' या कथासंग्रहास चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही कथांना प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार लाभले आहेत. याबरोबरच गाण्याची आवड असून पुण्यात स्टेज शो करते. हौशी चित्रकार असून अनेक स्केचेस काढले आहेत.

सरिताच्या फोटोकडे अनघा टक लावून बघत होती. कुणाचा तरी खांद्यावर हात पडला म्हणून तिने वळून बघितलं. सुमामावशी होत्या! “अनघा, आम्ही आता निघतो. थोडं लवकर निघालो की, मग स्टेशनवर वेळेत पोहोचू. हल्ली पुण्यात ट्रॅफिक किती असतो गं…” “मावशी, तुम्ही पंधरा दिवस राहिलात, मला खूप बरं वाटलं. आता आई नसल्या तरी अधूनमधून येत जा,” अनघाला दाटून आलं. “मी येणारच गं बाळा! पण तू तुझी काळजी घे. तू अशी सारखी रडलीस तर, सरिताच्या आत्म्याला त्रास होईल.” मावशी नागपूला परतल्या आणि अनघाला घर खायला उठलं. तिची चार दिवस असलेली रजा तिने अजून वाढवून घेतली. दोन दिवस जळगावच्या घरात जाऊन प्रत्येक वस्तूला सरिताचा झालेला स्पर्श…

Read More

मी स्कूटर पार्क केली आणि बिल्डिंगच्या लिफ्टपाशी आले. लिफ्ट वर गेली होती आणि दहाचा आकडा दाखवत होती, म्हणजे अजून दहा मिनिटं जाणार. मला ऑलरेडी उशीर झाला होता. मी पायऱ्या चढायला लागले. सहावा मजला येईपर्यंत माझा दम निघाला. चांगलीच धाप लागली होती. माझा उतावीळपणा… दुसरं काय! आनंदच्या घरी आज पहिली मिटिंग होती. पु. ल. देशपांडे यांचं ‘ती फुलराणी’ हे नाटक आम्ही करायचं ठरवलं होतं. आनंदने कॉलेजमध्ये असताना एकांकिकेतलं माझं कामं बघितलं होतं. अभिनय हे माझं देखील पॅशन होतं. एक दिवस आनंद घरीच आला. जवळपास तीन-चार वर्षांनी आम्ही भेटत होतो, आनंदने मला ‘मंजुळा’चा रोल ऑफर केला. भक्ती बर्वे यांची मी प्रचंड चाहती…

Read More

बोर्ड मीटिंग झाली आणि नील हॉटेलवर परत आला. मीटिंग लवकर संपली होती. नील चेन्नईला मीटिंगसाठी आला होता. या ट्रिपमध्ये आईबाबांना घेऊन आला होता. त्यांना क्षमाताईकडे सोडून तो हॉटेलवर आला. डिनरला वेळ होता म्हणून त्याने फेसबुक ओपन केले. बिझी शेड्युलमुळे हल्ली त्याचं व्हॉट्सॲप, फेसबुक बघणं होतंच नव्हतं. स्क्रोल करताना अचानक एक अप्रतिम पेंट केलेलं झेंडूचं फुल त्याला दिसलं. त्याने अकाऊंटवर नाव बघितलं. फक्त स्मृती नाव होतं आणि प्रोफाइलवर झेंडूचं फुल. ही स्मृती कुलकर्णी तर नव्हे? पण केवळ नावावरून तीच स्मृती असेल असं कशावरून? पण तीच असावी, झेंडूचं फूल प्रोफाइलवर म्हणजे स्मृतीच असणार! पण प्रोफाइल लॉक होतं. नीलने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ते…

Read More

रश्मीने केसांवरून एकदा परत कंगवा फिरवला. डबा पर्समध्ये टाकला आणि ऑफिसला जायला निघाली… “झाला का नट्टापट्टा? ना रूप ना रंग, तरी दहा वेळा आरशासमोर उभी असते. आता या वयात कोण लग्न करणार ग तुझ्याशी? चाळिशीला आलीस तू! खायला काळ आणि भुईला भार…” मंगल रश्मीकडे बघत तिरसटासारखं बोलली. ते ऐकून रश्मीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ही आई आहे का कोण? सावत्र आईसुद्धा इतकं वाईट वागत नसेल. इतकी मी तिरस्करणीय आहे का? सहा महिने झाले, ही अंथरुणाला खिळली आहे. बाबा जाऊन वर्ष होतंय आणि हिचे हे विखारी शब्द अजूनच ऐकावे लागताहेत. आयुष्याचा सगळा राग ती आता माझ्यावर काढते आहे. रश्मीने महत्प्रयासाने राग…

Read More

उत्तरार्ध गौरी आणि आदिनाथबद्दल शैलाच्या कानावर आलं. “गौरी, सावध हो. तुझी पावलं जिकडे वळताहेत तो मार्ग तुझा नाही. मला सगळं कळलं आहे. आदिनाथला भेटणं बंद कर.” गौरी धीर गोळा करून म्हणाली, “मी प्रेम करते आदिनाथवर. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे.” “डोकं ठिकाणावर आहे का तुझं? ख्रिश्चन मुलाशी लग्न करणार तू?” “धर्म बघून कुणी प्रेम करतं का आई?” “गौरी, जरा विचार करून बोल. आपल्या घरचं वातावरण तुला माहिती असून तू वाहवत गेलीस.” “आई, आम्ही कुठलीही मर्यादा ओलांडली नाही. आदि इतका संयमी, समंजस मुलगा शोधून सापडणार नाही.” गौरीचा तो निश्चय बघितला आणि शैलाला नानांची भीती वाटायला लागली. शैलाने नानांजवळ तिच्या लग्नाचा विषय…

Read More

पूर्वार्ध कॉलेज सुरू होऊन आठच दिवस झाले होते. शेवटचं सायकॉलॉजीचं लेक्चर सुरू होतं. गौरी अगदी तल्लीन होऊन सरांचं लेक्चर ऐकत होती. “मे आय कम इन सर?” हे ऐकल्यावर सगळ्यांचीच नजर क्लासच्या दाराकडे गेली. इतकं सुंदर लेक्चर मधेच बंद पडलं म्हणून गौरी जरा चिडलीच. तो मुलगा गौरीच्याच बाजूला येऊन बसला. एक मंद सुगंधाची झुळूक आली. गौरीने त्याच्याकडे बघितलं आणि त्यानेही बघितलं. नजरानजर झाली आणि गौरीने मान खाली घातली. सर इतकं सुंदर शिकवत होते की, मंत्रमुग्ध होऊन सगळे विद्यार्थी ऐकत होते. लेक्चर कधी संपलं, कळलंच नाही. क्लासरूमच्या बाहेर आल्यावर त्या मुलाने गौरीला गाठलं, “माफ करा, मी जरा उशिरा कॉलेज जॉइन केलं आहे.…

Read More

पुण्याहून आलेलं, साठेकाकांचं पत्र मी वाचलं. अश्रूंनी पत्रातील अक्षरं धूसर व्हायला लागली. माझ्या हातातले पत्र घेत अवनीने विचारले, “प्रसाद, बघू काय लिहिलं आहे?” अवनीने पत्र वाचलं. मला पाठीवर थोपटत म्हणाली, “प्रसाद, हा दिवस कधीतरी येणारच होता. त्या वाड्याला शंभर वर्षे होऊन गेली. वाडा आता किती मोडकळीस आला आहे. तो आता पाडणंच योग्य आहे, नाहीतर काहीतरी विपरीत घटना घडायची.” “हो, खरंय तुझं! पण आठवणी आहेत ना गं! त्या अशा सहजासहजी जाणार नाहीत. सगळेच भाडेकरू सोडून गेले आहेत. आता नवीन टोलेजंग इमारत उभी राहणार. पुढच्या महिन्यात वाडा जमीनदोस्त करताहेत. मी एक रात्र वाड्यात राहून येतो.” “प्रसाद, तिथे आता कोणीही राहत नाही. तू…

Read More

चहा करताना मुक्ताच्या हातून साखरेचा डबा खाली पडला, सगळी साखर जमिनीवर सांडली… “आज मला घाई आहे तर, हे जास्तीचं काम पडणारच.” मुक्ता रागातच बोलली. तिचं बोलणं ऐकून रविवारची टीव्हीवरची रंगोली बघत असलेला शशी किचनमध्ये आला. “मुक्ता, इतकी का वैतागली आहेस?” “अरे बघ ना, आज मला घाई आहे तर नेमकं हे!” मुक्ता साखर गोळा करत म्हणाली. “रिलॅक्स! बाजूला हो, मी भरतो ती बरणीत!” “बरणीत नको हं! ती खाली सांडलेली साखर वापरायला नको.” “तू म्हणशील तसं! मुक्ता किती वाजता पोहोचायचं आहे शाळेत तुला?” “अकरा वाजता! आमची शाळा अकरा वाजता सुरू व्हायची ना! शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून नेहाने परवानगी घेतली आहे. आज रविवार आहे…

Read More

भाग – 2 आभाला जाऊन वर्ष होत आलं होतं. “आई परत कधी येणार?” हा प्रश्न इराने विचारणं बंद केलं. काय विचार असतील त्या इवल्याश्या मनात? का पोरकी झालेली मुलं अकाली शहाणी होतात? आई दुसरं लग्न कर म्हणून मागे लागली होती. मी आभाला विसरणं शक्य नव्हतं… पण इराला आता आईची गरज आहे, असं वाटायला लागलं. नेत्राची आणि माझी ओळख होऊन देखील वर्ष झालं. रोजची लोकलमधली भेट, तिचं साधं व्यक्तिमत्त्व, तिचे संस्कार मला तिच्याकडे आकर्षित करायला लागले. इराला नेत्रासारखी आई हवी, असं मनात यायला लागलं. पण हा माझा स्वार्थी विचार होता. मला नेत्रा लाइफ पार्टनर म्हणून का निवडेल? एक विधुर, एका मुलीचा…

Read More

भाग – 1 मी शिवाजीनगरच्या प्लॅटफॉर्मवर आलो आणि 9.55ची लोणावळा लोकल प्लॅटफॉर्मवर आली. मी घाई गडबडीत लोकलमध्ये चढलो. आज घरून निघायला जरा उशीरच झाला. इराला आज शाळेत जायचं नव्हतं. एकतर सकाळी उठल्या उठल्या तिचं रडणं सुरू झालं होतं. इराला मी एका उत्तम शाळेत नर्सरीत प्रवेश घेतला, पण इरा तिथे रमतच नव्हती. रोज शाळेत निघताना कुरकुर असायचीच. आज तर उठायलाच तयार नव्हती. कशीबशी तिची समजूत घालून तिला उठवलं. आईने तिला तयार केलं आणि टिफिन दिला. शाळेच्या बसमध्ये तिला चढवताना, तिचा रडवेला चेहरा बघून माझ्या घशात आवंढा आला. त्या क्षणी वाटलं, नको ही नोकरी, नको ती इराची शाळा! माझं पिल्लू आणि मी…

Read More