Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 17 मे 2026; वार : रविवार
    • भारतीय सौर : 27 वैशाख शके 1948; तिथि : प्रतिपदा 21:41; नक्षत्र : कृत्तिका 14:32;
    • योग : शोभन 06:15, अतिगंड 25:59; करण : किंस्तुघ्न 11:36;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:05;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    करी दिन

    पुरुषोत्तम / मल / अधिक ज्येष्ठ मासारंभ

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    रियासतकार गो. स. सरदेसाई

    टीम अवांतर

    महाराष्ट्रातील थोर व्यासंगी इतिहासकार आणि रियासतकार म्हणून ओळख असणाऱ्या गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म 17 मे 1865 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावी झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविदयालयातून ते बी. ए. झाले आणि बडोद्यास सयाजीराव महाराजांकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून नोकरीस लागले. सयाजीरावांबरोबर त्यांना परदेशाचा, विशेषतः युरोपचा प्रवास करण्याची अनेकदा संधी मिळाली. महाराजांनी अध्यापकीय कामाबरोबर त्यांना काही वर्षे हिशोबनीस म्हणूनही काम दिले होते. सरदेसाई यांच्या इतिहासलेखनास बडोद्यात असतानाच प्रारंभ झाला होता.

    हेही वाचा – झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    सयाजीरावांना वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकविणे हे त्यांचे संस्थानी सेवेतील मुख्य काम होते. त्यासाठी ते लेखी टिपणे काढीत. याच टिपणांनी पुढे रियासतींना जन्म दिला. त्यांची प्रथम मुसलमानी रियासत प्रसिद्ध झाली. याबरोबरच त्यांनी मॅकिआव्हेलीचा द प्रिन्स आणि प्राध्यापक सिली यांचा एक्सपान्शन ऑफ इंग्लंड या दोन ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले. यानंतर इतिहास हेच त्यांचे जीवित कार्य ठरले. इ. स.1000 पासून 1857 पर्यंतचा इतिहास त्यांनी संकलित केला. त्याचे ब्रिटिश आणि मराठी रियासत असे शीर्षक निवडून कालक्रमानुसार विषयवार खंड प्रसिद्ध केले.

    रियासती व्यतिरिक्त सरदेसाई यांनी मुलांसाठी इतिहासविषयक तसेच बालोपयोगी भारतवर्ष, महाराष्ट्राचा इतिहास, इतिहासाच्या सोप्या गोष्टी, हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास वगैरे पुस्तके लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिशतक सांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी सुव्हेनिअर (Shivaji Souvenir) या ग्रंथाचे संपादन केले. त्यामुळे परप्रांतात त्यांची कीर्ती पसरली. गुजरातीत त्यांच्या काही ग्रंथांचे अनुवाद झाले. ब्रिटिश शासनाने 1929मध्ये त्यांच्याकडे पेशवे दप्तराच्या संपादनाचे काम सोपविले. त्यामुळे पेशवे दप्तरातील असंख्य कागदपत्रांतील काही निवडक कागदपत्रांचे 45 खंड प्रसिद्ध झाले.

    हेही वाचा – लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    याशिवाय, सरदेसाई यांनी विविध ज्ञानविस्तार, रत्नाकर, मासिक मनोरंजन, चित्रमयजगत, सह्याद्री, लोकशिक्षण यासारख्या नियतकालिकांतून सुमारे 275 लेख लिहिले. त्यानंतरच्या काळात ‘न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज्’चे तीन खंड, डॉ. जदुनाथ सरकार यांच्या संपादन-सहकार्याने मेन करंट्स ऑफ मराठा हिस्टरी आणि पूना रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्सचे पाच खंडदेखील प्रसिद्ध केले.

    सरदेसाई यांना अनेक मानसन्मान लाभले. ब्रिटिश शासनाने त्यांना प्रथम रावसाहेब आणि  नंतर रावबहादूर हा किताब दिला. राजवाडे संशोधन मंदिराने ‘इतिहास मार्तंड’ ही पदवी आणि सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार केला. पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिली. त्याच वर्षी जयपूर येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. अखेरच्या दिवसांत त्यांनी माझी संसारयात्रा हे आत्मचरित्र लिहिले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला. 29 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचे निधन झाले.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 मे 2026

    May 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 मे 2026

    May 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 मे 2026

    May 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 मे 2026

    By Team AvaantarMay 16, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 26…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 मे 2026

    May 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 मे 2026

    May 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 मे 2026

    May 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026

    सदाफुली… पण विरहात मलूल झालेली!

    May 16, 2026

    “खरा डाव आता सुरू होतोय…”

    May 16, 2026

    Dnyaneshwari : अगा आत्मा तूं एकु, सकळविश्वव्यापकु…

    May 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 299
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 421
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 208
    • मैत्रीण 19
    • ललित 629
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 17 मे 2026

    May 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.