Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026

    May 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु
    अध्यात्म

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    Team AvaantarBy Team AvaantarMay 12, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरि सुईं वोडण माझिया जीविता । सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥383॥ आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें । तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें ॥384॥ म्हणोनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया । काढीं मातें महाभया- । पासोनियां ॥385॥ हा ठायवरी पुढतपुढती । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ॥386॥ जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा । जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥387॥ परि तया आंतुल नव्हे हे देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा । तुवां आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेंसीं ॥388॥ कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु । बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥389॥ अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां । कटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥390॥ हे नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनिया तोंडें । कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥391॥

    अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंघै: । भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥26॥

    नोहेति हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सपरिवार । तुझां वदनीं ॥392॥ आणि जे जे यांचेनि सांवायें । आले देशोदेशींचे राये । तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटितु आहासी ॥393॥ मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां । आरणीं हन थाटा । देतोसि मिठी ॥394॥ जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर । मुखाआंत भार । हारपताति मा ॥395॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज

    अर्थ

    अहो श्रीकृष्णा, जर आपण आमचे स्वामी आहात तर, माझ्या जीविताच्या आड ढाल घाला, आणि हा विश्वरूप रूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. ॥383॥ हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा, ऐक. तू जो चैतन्य, त्या तुझ्यामुळे सर्व विश्व वसते आहे ते विसरलास आणि उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस. ॥384॥ एवढ्याकरिता हे देवातील राजा, श्रीकृष्णा, लवकर प्रसन्न हो आणि आपल्या मायाशक्तीला आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ. ॥385॥ इतके तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावे, असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखर भ्यायलो आहे. ॥386॥ ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला, त्यावेळी मी एकट्याने तो परतविला आणि साक्षात् काळ समोर आला, तरी भय न धरणारा असा मी आहे, ॥387॥ परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातील नव्हे. येथे तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. ॥388॥ प्रलयाचा वेळ नसताना मधेच कसा तू काळ प्राप्त झालास? हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते. ॥389॥ अरेरे! विपरीत दैवा! विश्वरूप दर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली, तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले. हाय! हे त्रैलोक्य आता नाहीसे होत चालले! तू हे आता गिळावयास लागलास! ॥390॥ एकसारखी तोंडे पसरून ही सैन्ये चारी बाजूंनी तू ग्रासीत आहेस, हे प्रत्यक्ष (दिसत) नाही काय? ॥391॥

    तसेच राजांच्या समुदायांसह वर्तमान हे धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण, तसाच कर्ण, त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योध्यांसह- ॥26॥

    हे कौरवांच्या वंशांतील वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का? अरे अरे, हे तर आपले परिवारसुद्धा तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलेच म्हणावयाचे! ॥392॥ आणि जे जे यांच्या मदतीकरिता देशोदेशीचे राजे आले आहेत, त्यांची वार्ताही सांगता येणार नाही, (कोणी उरणार नाही,) असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस. ॥393॥ मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटाघट गिळीत असून, युद्धभूमीवरील सेनासमुदाय तू गिळून टाकीत आहेस. ॥394॥ तोफांवरून मारा करणारे लोक आणि पायांनी चालणारे पायदळ, यांच्या झंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत, नाही का? ॥395॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    May 11, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज

    May 10, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    By Team AvaantarMay 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु…

    Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज

    May 10, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026

    May 12, 2026

    10 साल जवान कर दिया…

    May 11, 2026

    उपम्याला उपमा नाही…

    May 11, 2026

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 295
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 416
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 205
    • मैत्रीण 19
    • ललित 618
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026

    May 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.