Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026

    नात्यातील निरगाठी

    June 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…
    ललित

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    Team AvaantarBy Team AvaantarJune 8, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नव्या युगातील महिला, विकृत दीर, दिराचा विकृतपणा, तिच्या बंडखोरीला जावेची साथ, नवऱ्याविरुद्ध उभी राहिली पत्नी, दोन जोडप्यांचा घटस्फोट, दिराचा छुपा कॅमेरा, दिराची विकृत मनोवृत्ती, दिराला शिकवला धडा, दिराविरुद्ध पोलीस तक्रार, दिराकडून अश्लील चित्रीकरण, नवऱ्याने भेकडपणा, दोघींचा कुटुंबाविरुद्ध संघर्ष
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नुकताच महिनाभर झाला होता तिचं लग्न होऊन. मजेत चालले होते दिवस. ती, तिचा नवरा, मोठा दीर, जाऊ, सासू, सासरे सगळे एकत्र राहायचे. घर तसं बऱ्यापैकी मोठं, पण एकत्र मोठ्या कुटुंबात राहायची सवय नसलेल्या तिला, ते वातावरण अंगवळणी पडायला अंमळ जड जात होतं, पण करत होती ती प्रयत्न, रमायचा आणि जमवून घ्यायचा!

    घरचे सगळे चांगले होते; पण अपत्य नसलेल्या, लग्न होऊन तीन वर्ष झालेल्या दिराची नजर काहीतरी वेगळीच होती. न्याहाळत असायचा तो तिला. ती पाठमोरी असली, तरी ती नजर रेंगाळतेय आपल्या पाठीवर, असा सदोदित भास व्हायचा तिला. विचित्रच वाटायचं काहीतरी… ती टाळायची त्या नजरेला नजर देणं, पण एक चमत्कारिक अशी काहीतरी भावना सतत पाठलाग करतच असायची तिचा.

    शिक्षिका असणारी जाऊ, मोठ्या बहिणीसारखीच वाटायची तिला, त्या नव्या घरात आणि नव्या वातावरणात! अपरिचित जगात तिला रुळायला खूप मदत करायची ती.

    घरात दोन बाथरूम्स होत्या. एक दीर, जावेच्या खोलीत आणि दुसरी सगळ्यांसाठी सामायिक. तिची खोली वेगळी असली तरी, त्या खोलीला बाथरूम नव्हती जोडलेली. सुरुवातीला ती सामायिक असलेल्या बाथरूममध्येच आंघोळ करायची, पण फार कुचंबणा व्हायची तिची आंघोळ करून बाहेर आल्यावर, कारण त्याच वेळेला सासरे आणि दीर बाहेर बसलेले असायचे, चहा घेत, नाहीतर पेपर वाचत…

    सासूबाईंच्या हे लक्षात आल्यावर, त्यांनी तिला जावेच्या खोलीतल्या बाथरूममध्ये आंघोळ करायची सूचना केली. का कोणास ठाऊक, पण हे ऐकल्यावर दिराचा चेहरा थोडासा बदलल्यासारखा वाटला तिला. का ते नाही कळलं, पण तसं वाटलं खरं…

    सकाळी लवकर उठून, स्वयंपाकाला मदत करून, ऑफिसला जायच्या घाईत, आतल्या खोलीचं दार लावून आंघोळ आणि आवरणं, हे तिला जास्त सोयीस्कर होतं. थोडं मोकळेपणाने आवरता आणि वावरता यायचं. सुरक्षित वाटायचं, दार बंद केल्यावर…

    दिवस चालले होते असेच, नव्या नवलाईचे. दिराच्या नजरेकडे दुर्लक्ष करायला शिकली होती ती आता, पण खटकत असायचं तिला काहीतरी नेहमीच. काय ते कळत नव्हतं फक्त.

    एकदा एका रविवारी, आंघोळीला गेली असताना, तिला अचानक बाथरूममध्ये एका कोपऱ्यात दडवलेला  मोबाइल फोन दिसला. चरकली ती, तो फोन बघून. फोन काढून बघितल्यावर, त्याचा व्हिडीओ कॅमेरा सुरू असलेला दिसला आणि तिला घाम फुटला. सुन्न झाली ती. काहीच सुचेना, पण तिने आवरलं स्वतःला, कपडे सावरले आणि धावतच ती तिच्या खोलीत शिरली आणि दार लावून घेतलं.

    नवरा होता खोलीत, पेपर वाचत बसलेला. तिच्याकडे बघून त्याला जाणवलं, की काहीतरी गडबड आहे आणि ती रडायलाच लागली हमसाहमशी. अक्षरश: वेडीपिशी झाली होती ती. काय करावं सुचत नव्हतं तिला… हातातला फोन नवऱ्याला दाखवून ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण शब्दच फुटत नव्हता तिच्या तोंडातून. तिला जवळ घेऊन शांत करायचा प्रयत्न केला त्याने, पण त्याला झिडकारत ती कोलमडून पडली,  काय करावं हे न सुचून…

    तिच्या हातातला फोन त्याने हलकेच काढून घेतला आणि बाजूला ठेवला. पाणी दिलं तिला प्यायला आणि मग हळूहळू ती सावरली, बोलण्याच्या मन:स्थितीत आली. बाथरूममध्ये लपवलेल्या फोनबद्दल सांगताना, तिच्या मस्तकात तिडीक जात होती आणि ते ऐकल्यावर तिचा नवरासुद्धा नखशिखांत हादरला. फोन कोणी ठेवला असावा, हे अगदी स्वच्छ होतं. दिराशिवाय दुसऱ्या कोणाचंच हे काम असणं शक्य नव्हतं, त्या घरात!

    हेही वाचा – तो डंख कुरवाळला अन्…

    फोनला पासवर्ड होता त्यामुळे तो उघडून, आत काय दडलंय हे बघता येत नव्हतं आणि ते बघायची तिची इच्छाही नव्हती, पण ते आवश्यक होतं.

    दीर आणि जाऊ नव्हते, फक्त सासू, सासरे होते घरात आणि हे त्यांना एवढ्यात सांगणं प्रशस्त वाटत नव्हतं तिला. ते दोघं घरी यायची वाट बघायला हवी होती. ते आल्यावर काय बोलायचं, कसा विषय काढायचा, हे सगळं योजून ठेवलं होतं मनात…

    घरी आईबाबांना याची कल्पना देण्याआधी तिने आपल्या जवळच्या मैत्रिणीला फोन लावला आणि तिला एक अत्यंत मोलाचा सल्ला मिळाला – कुठल्याही परिस्थितीत, मोबाइल इतर कोणाच्याही हाती पडू न देण्याचा, अगदी नवऱ्याच्याही नाही!

    पटला तिला सल्ला आणि बाहेर जाऊन यायच्या बहाण्याने, फोन तिने त्याच मैत्रिणिकडे नेऊन ठेवला, सुरक्षित.

    भणभणतं डोकं आणि मन सोबत घेऊन क्षुब्ध ती, पोहोचली घरी. मग थोड्याच वेळात दीर आणि जाऊ पोहोचले. आपल्या समोर काय रामायण वाढून ठेवलंय, याची कल्पना नसलेले! नवऱ्याने तिला हे सगळं जरा शांत राहून हाताळायला सांगितलं होतं, पण तिला ते कदापिही मान्य नव्हतं. वडवानल पेटला होता उरात तिच्या. त्याचा यथोचित सत्कार करायचा होता तिला आणि त्याची साथ अपेक्षित होती, या संकटात.

    ते आल्यावर नेहमीप्रमाणे, पाणी आणून दिलं त्या दोघांना आणि मग थेट विषयालाच हात घातला तिने…

    “आज आतल्या खोलीतल्या बाथरूममध्ये आंघोळीला गेले असताना, मला लपवलेला एक मोबाइल सापडला तिथे. त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू होतं.”

    ती बोलून गेली.

    दिराच्या चेहेऱ्यावरचे रंग पालटले भरभर आणि भीतीची तीव्र भावना उतरली त्याच्या डोळ्यांत. जावेची नजर एकदा तिच्यावर आणि मग नवऱ्यावर स्थिरावली. नजरेत चीड आणि तिरस्कार भरून राहिलेला…

    “काय हो, ती काय म्हणतेय? तुमचा मोबाइल सापडला तिला म्हणतेय. एवढ्या खालच्या पातळीवर उतरलात तुम्ही?”

    तोपर्यंत सावरलेल्या दिराने हा आरोप सपशेल झिडकारला आणि स्वतःजवळचा मोबाइल दाखवत म्हणाला, “माझा फोन तर माझ्याजवळ आहे. ही उगाचच आरोप करतेय माझ्यावर. मला आणि आपल्या घराला बदनाम करायचा डाव आहे तिचा…”

    हे सगळं ऐकत असलेल्या सासू-सासऱ्यांना एकंदरीतच कल्पना आली, काय चाललंय याची. कितीही नाही म्हणत असला, तरी आपलं नाणं खोटं आहे, हे कळून चुकलं होतं त्यांना आणि त्यांनी सगळ्यांनाच ‘सबुरीचा सल्ला’ दिला.

    सासरे म्हणाले, “आण तो मोबाइल इकडे, आपण त्यातलं सगळं डिलीट करून टाकू. मिटवून टाकू हे सगळं इथेच. हे बाहेर पडलं तर आपली अब्रू येईल चव्हाट्यावर. या पुढे तो असं वागणार नाही, हे कबूल करून घेऊ त्याच्याकडून.”

    अपेक्षेने तिने नवऱ्याकडे बघितलं आणि तोही म्हणाला, “बाबा बरोबर बोलतायत. हे सगळं घरातच मिटायला हवं. मोबाइल दे बाबांकडे, आपल्या समोर सगळं डिलीट करून टाकू.”

    “मी मोबाइलही देणार नाही आणि त्यातलं काही डिलीटही करू देणार नाही. हे प्रकरण खूप गंभीर आहे. नाही वाटत मला, ते इथेच संपावं असं. या विकृतीला शिक्षा व्हायलाच हवी, असं म्हणत, जवळ पडलेली एक चप्पल भिरकावली तिने दिराच्या अंगावर, संतापाने थरथरत.”

    तिचा ठाम निर्धार पाहून घरचे सगळेच हवालदिल झाले आणि एकदम वातावरणच बदलून गेलं घरातलं. तिच्यावर फोन देण्यासाठी दबाव येऊ लागला. सासरे, दीर, सासू आणि चक्क स्वतःच्या नवऱ्याकडून. एकच जमेची बाजू म्हणजे, तिची जाऊ उभी राहिली, ठामपणे तिच्यासोबत.

    घरात मोबाइल न ठेवता तो सुरक्षित जागी ठेवला, हे फार चांगलं केलं हे पटलं तिला आता आणि “आता मी पोलिसांत तक्रार करणार,” असं तिच्या तोंडून निघाल्यावर, अगदी अनपेक्षितपणे नवऱ्याकडून हात उगारला गेला.

    स्वतःचा नवराच असा फिरल्यावर मात्र ती बिथरली आणि पायात चपला सरकवून, नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडली.

    “अगं थांब जरा, मी पण येतेय तुझ्यासोबत…” म्हणत जेव्हा जाऊ पण तिला सामील झाली, तेव्हा सगळंच काही संपलेलं नाही, याची जाणीव तिला होऊन ती थोडी आश्वस्त झाली.

    मोबाइल नेऊन ठेवलेल्या मैत्रिणिकडे जाऊन बाबांना फोन केला तिने आणि हादरलेले आईबाबा, धावतपळत मैत्रिणीच्या घरी पोहोचले. पोलीस स्थानकात, सायबर गुन्हा नोंदवल्यावर पोलिसांनी फोन सुरू केला त्यांच्या पद्धतीने आणि आतलं चित्रीकरण पाहून सगळेच हादरले. तिच्या आंघोळ आणि कपडे बदलण्याच्या व्हिडीओसोबतच, कित्येक इतर अनेक अश्लील फोटो आणि व्हिडीओ होते त्यात आणि ते पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

    हेही वाचा – Mother and son : आईची कहाणी

    गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करून,  दिराला पोलिसांनी अटक केली आणि तो गजाआड झाला. हे तर त्याच्या कर्माचे भोग होते. यथावकाश त्याला शिक्षा होणारच होती, पण यामुळे एक नव्हे तर, दोन संसारात माती कालवली गेली होती… तिच्या नवऱ्याचा दोष नव्हता यात काहीही, पण आयत्यावेळी तिच्यासोबत उभं राहायचं नाकारून, त्याने त्यांच्या नात्याचाच गळा घोटला होता अगदी अनपेक्षितपणे. नंतर आला तो क्षमा मागायला, पण आता तिला त्याच्यावर विश्वास ठेवणं कदापि शक्य नव्हतं. झाला तेवढा तमाशा पुरे होता.

    तिचे आणि जावेचे आईबाबा खंबीरपणे त्या दोघींच्या मागे उभे राहिले आणि मग थोड्याच दिवसात एक नव्हे  तर दोन, घटस्फोटांची मागणी करणारी पत्रं रवाना झाली, एकाच पत्त्यावर.

    स्वतःच्या पायावर ठामपणे उभ्या असलेल्या, नव्या युगातल्या दोन मुली सज्ज झाल्या होत्या संघर्षासाठी आणि स्वसन्मानासाठी. समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल, याचा विचार झुगारून देऊन, पुन्हा नव्याने जगण्यासाठी!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026 ललित

    नात्यातील निरगाठी

    June 8, 2026 ललित

    ‘देवळाबाहेरच्या देवां’ना ओळखण्याची गरज!

    June 8, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    By Team AvaantarJune 8, 2026

    अतुला प्रणव मेहेंदळे “प्राजक्ता, गोडाचा छान मंद सुवास येतोय गं! काय बनवते आहेस एवढं? मला…

    नात्यातील निरगाठी

    June 8, 2026

    ‘देवळाबाहेरच्या देवां’ना ओळखण्याची गरज!

    June 8, 2026

    आता पूर्वी अन् पवनची प्रेमकहाणी फुलू लागली…

    June 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026

    नात्यातील निरगाठी

    June 8, 2026

    Dnyaneshwari : तरि व्यक्त आणि अव्यक्त, हें तूंचि एक निभ्रांत

    June 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जून 2026

    June 8, 2026

    ‘देवळाबाहेरच्या देवां’ना ओळखण्याची गरज!

    June 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 322
    • अवांतर 190
    • आरोग्य 118
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 447
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 219
    • मैत्रीण 20
    • ललित 687
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026

    नात्यातील निरगाठी

    June 8, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.