नमस्कार!
आत्तापर्यंत आपण वसंत ऋतूतील आहार, विहार आणि घरगुती उपाय पाहिले. पण जर तुम्हाला वारंवार सर्दी, जुनाट खोकला, ॲलर्जी, सायनस किंवा दम्याचा (Asthma) त्रास असेल, तर फक्त घरगुती उपायांनी हा त्रास मुळापासून जात नाही, हे लक्षात घ्या. अशा वेळी या वाढलेल्या कफाला शरीराबाहेर काढण्यासाठी आयुर्वेदाने एक ‘ब्रह्मास्त्र’ सांगितले आहे, ते म्हणजे ‘वमन पंचकर्म’!
‘वमन’ म्हणजे नक्की काय?
जशी आपण सणावाराला घराची ‘महास्वच्छता’ (Deep Cleaning) करतो, तशीच ‘वमन’ म्हणजे शरीराची आतून केलेली शास्त्रोक्त स्वच्छता आहे. हिवाळ्यात साठलेला कफ वसंताच्या उन्हामुळे आपोआप वितळत असतो. हा वितळलेला दूषित कफ औषधी काढे देऊन उलटीवाटे (शास्त्रोक्त पद्धतीने) शरीराबाहेर काढणे म्हणजेच वमन होय.
हेही वाचा – Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?
वसंत ऋतूत वमन का करावे?
- दम्यावर रामबाण : अस्थमा आणि ॲलर्जीच्या रुग्णांसाठी हे ‘अमृत’ आहे. वमन केल्याने श्वासनलिका मोकळी होते आणि वर्षभर दम्याचा त्रास लक्षणीयरीत्या कमी होतो.
- त्वचारोग आणि लठ्ठपणा : शरीरातील अतिरिक्त चरबी (मेद) आणि दूषित घटक बाहेर पडल्यामुळे वजन कमी होते आणि त्वचेवर तेज येते. PCOD आणि थायरॉईडमध्येही हे अत्यंत फायदेशीर आहे.
- इम्युनिटी बुस्टर : आजार नसलेल्या निरोगी व्यक्तीनेही वमन केल्यास पुढील वर्षभर कफाचे आजार होत नाहीत आणि प्रचंड उत्साह वाढतो.
हीच योग्य वेळ आहे!
वसंत ऋतूचा हा काळ (पुढील काही आठवडे) वमन करण्यासाठी सर्वोत्तम आहे. ही वेळ निघून गेल्यास पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल. वमन हे एका दिवसाचे कर्म नसून त्यासाठी 7-8 दिवसांची पूर्वतयारी (स्नेहन-स्वेदन) लागते.
पुढील लेखात काय पाहणार?
पुढल्या आणि शेवटच्या भागात आपण या संपूर्ण वसंत मालिकेचा सारांश आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक खास निरोप घेणार आहोत!
हेही वाचा – Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय
क्रमश:
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


