Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुन:श्च हरीओम

    November 2, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – प्रभाव, करिअर

    November 2, 2026

    उद्धार

    November 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, November 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!
    मैत्रीण

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    रेवती निलेश पांडेBy रेवती निलेश पांडेMay 28, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी लघुकथा, मी मराठी, अभिजात मराठी, राधा आणि धारा, राधा आणि रुक्मिणी, भावविश्वातील राधा, वास्तवातील रुक्मिणी, शब्दांच्या पलीकडची प्रेमभावना, सामाजिक व्यवस्था
    फोटोो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक विषय फार गाजत होता — राधा ही ऐतिहासिक व्यक्ती होती की नव्हती?  एक गट ब्रह्मवैवर्त पुराण आणि इतर संदर्भ देत राधेचे अस्तित्व मान्य करत होता, तर दुसरा गट महाभारतात राधेचा स्पष्ट उल्लेख नाही, तसेच श्रीमद्भागवतात केवळ एका विशेष गोपीचा उल्लेख आढळतो, ती कदाचित राधा असावी असे म्हणत होता.

    हे सर्व वाचताना मला कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचायचे नव्हते. कारण मला त्या वादापेक्षा एक वेगळाच प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटू लागला. रुक्मिणीचा स्पष्ट उल्लेख श्रीमद्भागवत, हरिवंश आणि इतर अनेक ग्रंथांत आढळतो. सत्यभामाही कृष्णाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तरीसुद्धा संतांच्या अभंगांत, गवळणच्या गोडव्यात, कवींच्या कवितांत आणि लेखकांच्या शब्दांत राधाच इतकी पुन्हा पुन्हा का उमटत गेली असावी?

    कदाचित काही व्यक्ती इतिहासात असतात आणि काही लोकांच्या भावविश्वात… आणि कधी कधी भावविश्वात जिवंत राहणाऱ्या व्यक्ती इतिहासापेक्षाही अधिक प्रभाव टाकून जातात.

    इथे मी रुक्मिणी आणि राधेची तुलना करत नाही. दोघींच्याही भूमिका तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एकीकडे वास्तव, जबाबदारी आणि सामाजिक व्यवस्था आहे; तर दुसरीकडे मनाच्या अतिशय आत दडलेली, शब्दांच्या पलीकडची प्रेमभावना आहे… कदाचित अपूर्ण गोष्टी मनात जास्त काळ घर करून राहतात! जे सहज मिळून जातं ते आयुष्याचा भाग होतं; पण जे पूर्णत्वाला जात नाही, ते आठवण बनून मनात रेंगाळत राहतं… आणि कदाचित सर्जनशीलतेचं मूळही इथेच दडलेलं असावं!

    पूर्णत्व शांत करतं; पण अपूर्णता सतत मनाशी संवाद साधत राहते. ती प्रश्न निर्माण करते, आठवणी जाग्या ठेवते, आणि माणसाला व्यक्त व्हायला भाग पाडते. म्हणूनच कदाचित अनेक महान कविता, अभंग, गवळणी आणि प्रेमकथा या पूर्णत्वातून नाही, तर अपूर्णतेतून जन्माला आल्या असतील.

    हेही वाचा – ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!

    खरंतर “राधा” हा शब्द “धारा” या शब्दाचा उलटा आहे. धारा म्हणजे ठरलेला प्रवाह. समाजाने आखून दिलेली दिशा. लग्न, संसार, कर्तव्य, मर्यादा, व्यवहार… आणि त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने शांतपणे वाहणारी भावना म्हणजे कदाचित राधा.

    पूर्ण झालेल्या कथा जगल्या जातात, अपूर्ण राहिलेल्या कथा लिहिल्या जातात. म्हणूनच कदाचित संतांच्या शब्दांत, गवळणींच्या सुरांत आणि कवितांच्या ओळींमध्ये राधा पुन्हा पुन्हा जन्म घेत राहिली असेल. कारण राधा ही कदाचित केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर मनात आयुष्यभर न संपणारी एक भावना आहे.

    हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!


    धारा आणि राधा

    ही म्हणजे वास्तव भूमिका आणि मर्यादेचे भान
    ती म्हणजे अफाट अनाकलनीय शुद्ध प्रेमाचे दान
    ही म्हणजे खांद्यावर कर्तव्याचा भार
    ती म्हणजे मुरलीचे सूर अलवार
    ही म्हणजे कुंकू जोडवे मंगळसूत्र
    ती म्हणजे सखा सहेला परममित्र
    ही म्हणजे सामाजिक व्यवस्था
    ती म्हणजे आंतरिक अवस्था
    ही म्हणजे धारा
    ती म्हणजे राधा

    Avatar photo
    रेवती निलेश पांडे

    विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

    Related Posts

    तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख

    October 29, 2026 मैत्रीण

    माहेर… जिथे लेकीचं वय वाढतं, पण मन लहानच राहतं!

    October 24, 2026 मैत्रीण

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख

    By तृप्ती देवOctober 29, 2026

    सकाळचे साडेसात वाजले होते. स्वयंपाकघरातून कूकरच्या सलग तीन शिट्ट्या झाल्या, पाठोपाठ फोडणीचा खमंग वास घरभर…

    माहेर… जिथे लेकीचं वय वाढतं, पण मन लहानच राहतं!

    October 24, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    अष्टमी

    October 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पुन:श्च हरीओम

    November 2, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – प्रभाव, करिअर

    November 2, 2026

    उद्धार

    November 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आधणीं घातलिया हरळ, होती अमृताचे तांदुळ

    November 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 नोव्हेंबर 2026

    November 2, 2026

    Bookshelf : ‘सेतू’… कथानकाची घट्ट वीण असलेली कादंबरी

    November 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 491
    • अवांतर 217
    • आरोग्य 167
    • पंचांग आणि भविष्य 659
    • फिल्मी 77
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1035
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पुन:श्च हरीओम

    November 2, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – प्रभाव, करिअर

    November 2, 2026

    उद्धार

    November 2, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.