Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » विद्यार्थी प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी
    शैक्षणिक

    विद्यार्थी प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 15, 20251 Comment2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, School admission, शाळा प्रवेश, मुख्याध्यापिका जबाबदारी, शिक्षिका जबाबदारी, Principal responsibility, teacher responsibility, School fees, शाळा फी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रश्मी परांजपे

    मागील लेखात आपण विद्यार्थ्यांप्रती शाळेच्या जबाबदाऱ्यांबाबत प्राथमिक माहिती घेतली. या आणि पुढील काही लेखांत आपण शाळेच्या जबाबदाऱ्या टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत. शाळेच्या जबाबदाऱ्या म्हणजे पर्यायाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि सेविका यांच्या जबाबदाऱ्या होत. विद्यार्थीकेंद्रित शिक्षणामध्ये या जबाबदाऱ्या जाणून घेताना आपण शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नियोजित उपक्रम, विद्यार्थ्यांची सुरक्षा अशा अनेक बाबींचा विचार करणार आहोत.

    शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश. आता आपण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी या मुद्द्यापासून सुरुवात करूयात.

    शालेय वर्ष जूनमधे सुरू होते आणि प्रवेश प्रक्रिया साधारणतः जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. मुख्याध्यापिकेला प्रवेशाबाबतचे नियोजन एक महिना अगोदर सुरू करावे लागते. यातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

    हेही वाचा – विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी

    1. नवीन प्रवेश देताना प्रवेश फी, वर्ग फी, सत्र फी तसेच विविध उपक्रम फी तसेच फी भरण्यासाठी विशिष्ट कालावधी या सर्व बाबी मुख्याध्यापिकेला शालेय समितीत ठरावांद्वारे मंजूर करून घ्याव्या लागतात.
    2. प्रवेश अर्जातील तपशील तसेच पालकांची लागणारी माहिती लक्षात घेऊन अर्जाचा मसुदा आणि अर्ज छपाई संख्या या बाबी देखील मुख्याध्यापिकेला शालेय समितीकडून मंजूर करून घ्यावा लागतात.
    3. प्रवेशाची पूर्वतयारी झाल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची तारीख तसेच पालकांनी प्रवेशासाठी भेटण्याची वेळ निश्चित करून याबाबत सूचना शाळेच्या बाह्य-फलकावर मोठ्या अक्षरात लिहावी. सूचना सुवाच्च अक्षरात तसेच व्याकरणदृष्ट्या अचूक असावी. सूचना पुसली जाणार नाही, याची काळजी घेतानाच, पण तसे झाल्यास सूचना परत लिहिण्याची जबाबदारी एखाद्या शिक्षकेवर सोपवावी.
    4. शालेय प्रवेशाबाबतची सूचना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी मुख्याध्यापिकेने जाहिरात करण्याच्या विविध मार्गांचा यथायोग्य विचार करून अवलंब करावा.
    5. पालकांनी प्रवेशासाठी पाल्याला सोबत आणणे अनिवार्य करावे.
    6. प्रवेशासाठी पाल्याचा जन्मदाखला अत्यावश्यक असल्याने पालकांना जन्मदाखला आणण्यास आवर्जून सांगावे. जन्मतारखेवरून मुलाचा वर्ग – खेळगट / शिशुगट / बालगट – ठरवता येतो.
    7. प्रवेशासाठी एकदम जास्त पालक आल्यास त्यांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी.
    8. पालकांना प्रवेशाबाबत आवश्यक माहिती दिल्यावर पालकांकडून प्रवेश अर्ज भरून घेणे, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे तसेच फी भरणे या प्रक्रिया पूर्ण करण्यात येतात.
    9. शाळेने प्रवेश अर्ज तसेच सादर केलेल्या कागदपत्रांची नोंद करून पालकांना पोचपावती देणे तसेच फीची पावती देणे आवश्यक आहे. हे सर्व झाल्यावर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते.
    10. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात माहितीपत्रक घेण्यासाठी बोलवावे.

    याबाबतचे अन्य मुद्दे आपण पुढील लेखात जाणून घेऊयात.

    क्रमश:

    हेही वाचा – शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी


    (लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)

    मोबाईल – 9881943593

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सर्व विद्यार्थ्यांना गाणे गाऊ द्या

    July 19, 2026 शैक्षणिक

    सर्व विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करायला शिकवूया

    July 4, 2026 शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026 शैक्षणिक

    1 Comment

    1. भरत अनिखिंडी on September 16, 2025 10:14 am

      फार छान तपशील वार माहिती सांगोपांग विचार करून मुख्याध्यापिका दायित्व याचे सुंदर विवेचन

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    सर्व विद्यार्थ्यांना गाणे गाऊ द्या

    By Team AvaantarJuly 19, 2026

    डॉ. किशोर महाबळ सर्व विद्यार्थी बुद्धिमान असतात फक्त त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रकार वेगळा असतो, हे सांगण्याचा…

    सर्व विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करायला शिकवूया

    July 4, 2026

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026

     ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती

    July 25, 2026

    विठ्ठल विठ्ठल… दोन बहिणींची पंढरीची वारी

    July 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वारियाची धांव, तैसे सरळ भाव

    July 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 372
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 505
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 804
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.