Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मनावरचा घाव
    ललित

    मनावरचा घाव

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरAugust 18, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मी मराठी, अभिजात मराठी, दिलीप कजगांवकर, लेखक दिलीप कजगांवकर, सदानंदांचा सत्कार, टी-शर्टमध्ये सदानंद यांचा सत्कार, मुलाकडून पित्याचा अपमान, शर्टविना सदानंदांचा सत्कार, मुलाची पित्याबद्दल बेपर्वाई, पित्याचे ऋण,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सदानंद आणि सावित्रीबाई पुण्याला राहात होते. राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा चेन्नईत कामाला होता. सुमारे 10 वर्षांपूर्वी प्रायव्हेट कंपनीतून निवृत्त झालेल्या सदानंदांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती…

    आज पालकमंत्र्यांकडून सदानंदांचा त्यांच्या उत्कृष्ट लिखाणाबद्दल सत्कार होणार होता. सावित्रीबाईंनी सदानंदांचा पांढरा शर्ट आणि निळी पॅंट कालच बाहेरून इस्त्री करून आणली होती. कार्यक्रमाला जाण्यासाठी सदानंद फ्रेश झाले आणि ते शर्ट घालणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की, इस्त्री करून आणलेल्या शर्टवर इस्त्रीचा डाग होता आणि शर्टला एक मोठं भोक देखील पडलं होतं. आता काय करायचं? सदानंद विचारात पडले.

    तेवढ्यात सावित्रीबाई म्हणाल्या, “राजचा एक नवीन शर्ट कपाटात आहे, पांढऱ्या रंगाचाच आहे. तो घाला. उद्या मी शर्ट स्वच्छ धुवेन आणि इस्त्री करून ठेवेन.”

    “सावित्री, आपण राजला विचारले पाहिजे, त्याला हे कदाचित आवडणार नाही,” असे म्हणत सदानंदांनी राजला फोन केला.

    “मी दोन दिवसांनी पुण्याला येणार आहे, एक महत्त्वाची कॉन्फरन्स अटेंड करायला. माझ्या शर्टला अजिबात हात लावू नका. तुम्ही माझा शर्ट घालून खराब कराल… आणि काय हो, माझ्या कपड्यांवर का डोळा ठेवता तुम्ही?” राजने नको तितका पाणउतारा केला. शेवटी दाटलेल्या भावना दडवत सदानंदांनी जड अंतःकरणाने फोन ठेवला.

    राजने अर्ध्या तासाने फोन केला, “आई, माझं कॉन्फरन्सला यायचं रद्द झालं आहे. बाबांना सांग, माझा शर्ट घालायला हरकत नाही.”

    “राज, बाबा आत्ताच बाहेर गेलेत. अरे, प्रेस करून आणलेल्या त्यांच्या पांढऱ्या शर्टवर इस्त्रीचा डाग आणि एक मोठं भोकही पडलं होतं, म्हणून मीच त्यांना सुचवलं. ते नाही म्हणत होते रे, पण मीच आग्रह केला. पोरा, तू त्यांचा खूप अपमान केलास. अरे, स्वतःची हौस-मौज न करता त्यांनी तुला मोठं केलं. तुझ्या शिक्षणाचा खर्च करताना ते एकच शर्ट-पॅंट वापरायचे. विसरलास का रे त्यांचा त्याग?” म्हणताना सावित्रीबाई हुंदका आवरू शकल्या नाहीत.

    हेही वाचा – इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    शेवटी सदानंद टी-शर्ट घालून कार्यक्रमाला गेले. पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. स्टेजवर सगळे झगमगत्या कपड्यांत… आणि सदानंद एकटेच साध्या टी-शर्टमध्ये होते पण तरीही, त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं.

    सत्काराचे फोटो व्हायरल झाले. त्यातील एक फोटो राजच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या त्याच्या मुंबईच्या मित्राने बघितला. “काय रे तुमचे पुणेकर! ड्रेसिंग सेन्स नावाची गोष्टच नाही का? मंत्र्यांकडून होणाऱ्या सत्काराला कसले कपडे घातले बघ,” म्हणत त्याने फोटो राजला दाखवला.

    साध्या टी-शर्टमधल्या हसऱ्या बाबांना बघून राजच्या डोळ्यात पाणी आलं, कारण याला तोच जबाबदार होता. काय फरक पडला असता बाबांनी त्याचा शर्ट फक्त तास-दोन तास घातला असता तर?

    हृदयी तप्त लोहाचे सळ

    साहू जातील एकवेळ,

    परी दुष्ट शब्दांची जळजळ

    मरणांतीही क्षमेना…

    कपड्यावरील डाग निघून जातात कपडे धुतले की, पण मनावरील घाव…? ते कसे पुसले जातील?

    हेही वाचा – नेहाला पाहिजे असलेले पद राजने नाकारले, पण…

    ओशाळलेल्या राजने आईला फोन केला. “मी 2000 रुपयांचा एक छान शर्ट बाबांसाठी पाठवतो.”

    “नको बेटा, आताच आम्ही 2000 रुपयांत चार शर्ट ऑर्डर केले आहेत. आता यापुढे कधी कुणापुढे हात पसरून अपमान करून घ्यावा लागणार नाही,” सावित्रीबाई म्हणाल्या…

    “राज, तुझा तो मौल्यवान शर्ट अगदी जसाच्या तसा ठेवला आहे रे तुझ्या बाबांनी, तू काळजी करू नकोस… हो, पण स्वतःची काळजी घे पोरा, आम्ही ठीक आहोत. आमचा विचार करू नकोस. सदैव सुखी रहा.”

    राजने फोन ठेवला आणि बाबांच्या सत्काराचा तो टी-शर्टमधील फोटो पाहत आसवांना मनसोक्त वाट करून दिली.

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026 ललित

    माझं गाव अन् बालपणीचे मित्र

    August 18, 2026 ललित

    इंद्रधनुष्य

    August 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सहानुभूती आणि विश्वास

    By ॲड. कृष्णा पाटीलAugust 18, 2026

    न्यायालय म्हणजे फक्त कायद्याची भाषा बोलण्याची जागा नसते, तिथं रोज माणसांच्या आयुष्याची असंख्य पानं उलटली…

    माझं गाव अन् बालपणीचे मित्र

    August 18, 2026

    इंद्रधनुष्य

    August 17, 2026

    साताजन्माचे नाते

    August 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 ऑगस्ट 2026

    August 19, 2026

    मनावरचा घाव

    August 18, 2026

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 400
    • अवांतर 205
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 540
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 859
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    भूक लागत नाही?

    August 19, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.