Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…
    ललित

    इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरMarch 31, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, नेहाचा उद्धटपणा, नेहाचा राजबरोबर वाद, नेहाचा इंटरव्ह्यू, राजच्या ऑफिसमध्ये नेहा, नेहाचा बसप्रवास, नेहाचे दिवास्वप्न,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 1

    “एक्सक्यूज मी मिस, तुम्ही तुमची पर्स सीटवरून उचलता का प्लीज?” राजने बसमध्ये विंडो सीटपाशी बसलेल्या तरुणीला नम्रपणे विचारले. या आधीही दोन-तीन तरुणांनी इतरत्र जागा असतानाही हाच प्रश्न तिला विचारल्याने ती चिडली होती. “काय हो मिस्टर, संपूर्ण बसमध्ये तुम्हाला फक्त ही एकच जागा दिसली का? की सुंदर मुलगी दिसली की, तिच्या बाजूची जागा पटकवायची घाणेरडी पुरुषी प्रवृत्ती?” नेहाचा राग तिच्या लालबुंद झालेल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

    “अहो मॅडम, का ओरडता तुम्ही? त्यांनी तिकीट काढलं आहे, पर्स मांडीवर घ्या आणि त्यांना बसू द्या,” कंडक्टर साहेब समजावणीच्या सुरात म्हणाले.

    “कंडक्टर साहेब, हे घ्या माझ्या पर्सच्या तिकिटाचे पैसे. मी कुणालाही माझ्या बाजूला बसू देणार नाही,” निश्चयी सुरात नेहा म्हणाली.

    “कंडक्टर साहेब, असू द्या, असू द्या, मी उभा राहतो,” समजुतीच्या सुरात राज म्हणाला.

    खरंतर, राज स्वतःच्या गाडीने ऑफिसला जायचा. परवाच त्याने गाडी रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंगसाठी सर्व्हिस सेंटरला दिली. आज सकाळी त्याने सर्व्हिस सेंटरला फोन केला, त्यावेळी त्याला समजले की, त्याची गाडी तयार आहे, म्हणून त्याने त्याच्या मित्राकडून सर्व्हिस सेंटरपर्यंत लिफ्ट घेतली. राजला सोडून मित्र ऑफिसकडे रवाना झाला.

    “मी माझी गाडी एमएच 12 पी 5520 घ्यायला आलोय,” राजने रिसेप्शनिस्टला सांगितले.

    “सर, तुम्ही 2 मिनिटे बसा. मी गाडी तयार आहे का ते चेक करते.” पाच मिनिटे झाली, रिसेप्शनिस्ट फोनवर बोलत होती.

    “विचारले का तुम्ही?” राजने अधीरतेने विचारले.

    “सर, तुमची गाडी अजून तयार नाही. आज संध्याकाळपर्यंत तयार होईल.”

    “अहो, अर्ध्या तासापूर्वी मी फोन करून विचारले आणि तुम्हीच सांगितले ना मला, गाडी तयार आहे आणि म्हणूनच तर मी आलो गाडी घ्यायला!”

    “सर, थोडा गोंधळ झाला. एमएच 12 बी 5520 तयार आहे. माझा नंबर ऐकण्यात चूक झाली. एक्स्ट्रीमली सॉरी सर,” म्हणताना ती सुंदर तरुणी जास्तच लाघवी भासत होती. पुढे संभाषण वाढविण्यात अर्थ नव्हता. “गाडी तयार झाली की, प्लीज फोन करा,” सांगून राज निघाला. सकाळीच डोक्याला मन:स्ताप झाला.

    आज रिक्षा आणि कॅबचा संप असल्याने बस हा एकमेव पर्याय होता. नशीब, बसस्टॉप सर्व्हिस सेंटरसमोरच होता. मुळातच वैतागलेल्या राजला बससाठी तब्बल वीस मिनिटे थांबावे लागले आणि बसमध्ये चढताच त्या सुंदर तरुणीने अपमान केला. दिवसाची सुरुवात ठीक झाली नव्हती.

    एमआयडीसीच्या स्टॉपवर राज बसमधून उतरला. त्याने रस्ता क्रॉस केला. तेवढ्यात मागून मधूर आवाज आला, “प्लीज मला हा पत्ता सांगाल का?” राजने मागे वळून बघितले. तीच ती सौंदर्यवती होती, जिने राजला बसमध्ये तिच्या बाजूला बसू दिले नव्हते.

    “कोणता पत्ता हवा आहे आपल्याला?” राजने शक्य तितक्या आदराने विचारले.

    “महेश स्टुडिओचा.”

    हेही वाचा – दिसलीस तू फुलले ऋतू…

    “तुम्ही सरळ जा, पहिला चौक सोडा, नंतर दुसऱ्या चौकातून उजवीकडे वळा, त्यानंतर पहिल्या चौकातून डावीकडे वळा. प्रथम भाटिया इंटरनॅशनल कंपनी लागेल आणि त्यानंतर लगेचच महेश स्टुडिओ. साधारणतः 10-12 मिनिटांचे चालत अंतर आहे.”

    गोरापान वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा, आकर्षक पंजाबी ड्रेस, लांब मोकळे केस, डोळ्यांवर छानसा गॉगल, हलकासा मेकअप आणि महेश स्टुडिओत जायचं म्हणजे नक्कीच कोणीतरी मॉडेल असणार, राजने अंदाज बांधला. शूटिंग असेल, कपडे आणि मेकअप खराब होऊ नये म्हणूनच तिने तिच्या बाजूला कोणालाही बसू दिले नाही, या विचाराने राजचा त्या सौंदर्यवतीवरील राग क्षणात मावळला. तिला “ग्रेट डे” विश करून तो झपझप पावले टाकत मार्गस्थ झाला.

    आज नेहाचा “भाटिया इंटरनॅशनल” या नामांकित कंपनीत प्लॅनिंग ऑफिसरच्या जागेसाठी इंटरव्ह्यू होता. कॅबचा बंद असल्यामुळे तिला नाईलाजाने बसने यावे लागले. राजने नेहाला पत्ता इतका व्यवस्थित सांगितला की, पुढे कोणालाही न विचारता नेहा भाटिया इंटरनॅशनल कंपनीमध्ये पोहोचली. राजशी जरा जास्तच रागात बोलल्याचा नेहाला मनोमनी पश्चाताप झाला. “आपण निदान सॉरी तरी म्हणायला हवे होते,” नेहा स्वतःवरच चिडली.

    इंटरव्ह्यूला चार मुलं आणि चार मुली असे एकूण आठ उमेदवार आले होते. एचआर ऑफिसर वरदने सर्वांचे स्वागत केले आणि कंपनीची थोडक्यात माहिती देऊन सर्वांना पहिल्या इंटरव्ह्यू राऊंडसाठी पाठविले.

    पहिल्या राऊंडचा निकाल जाहीर करताना वरदने घेतलेल्या पहिल्या चार नावांत नेहाचे नाव नव्हते. पहिल्याच राऊंडला बाद झाल्याने नेहा नाराज झाली. तेवढ्यात वरदने सांगितले की, “मी नावं घेतली ते चार उमेदवार पहिल्या राऊंडमध्ये बाद झालेत.” म्हणजे नेहाची विकेट शाबूत होती.

    दुसऱ्या राऊंडअखेर वरदने घेतलेल्या दोन नावांमध्ये पहिले नाव नेहाचे होते. पर्स उचलून नेहा नाराजीने जायला निघाली… “थांबा मॅम, ही दोन नावं पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट झालेल्या उमेदवारांची आहेत,” म्हणत वरदने नेहाला सुखद धक्का दिला.

    पुढच्या राऊंडअखेर, “नेहा, तुम्ही फायनल इंटरव्ह्यूसाठी थांबा,” वरदने सांगितले.

    आतापर्यंतचा कामाचा अनुभव, सध्याचा पगार, पगाराची अपेक्षा या गोष्टींची वरदने नोंद घेतली आणि नेहाला फायनल इंटरव्ह्यूसाठी जनरल मॅनेजर साहेबांकडे पाठविले. साहेबांच्या सेक्रेटरीने नेहाचे मोठ्या आपुलकीने स्वागत केले.

    “नेहा, साहेब एका मीटिंगमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला थोडं थांबावे लागेल,” सेक्रेटरीने सांगितले. पाण्याचा ग्लास आणि कॉफीचा मग ऑफिस बॉयने नेहासमोर ठेवला.

    नेहाने आई-बाबांना फोन करून सांगितले की, “थोड्याच वेळात माझा फायनल इंटरव्ह्यू आहे. एकूण आठ उमेदवारांपैकी मी एकटीच फायनल इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले आहे, त्यामुळे हा जॉब मला नक्की मिळेल.” आई-बाबांनी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहाला दिल्या.

    नेहा आई-बाबांची एकुलती एक मुलगी. बाबा खासगी कंपनीतून निवृत्त झालेत. घरची परिस्थिती बेताची होती. कर्ज काढून त्यांनी नेहाच्या शिक्षणाचा खर्च केला. एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधून उत्तम गुण मिळवून नेहा पास झाली. छान नोकरी मिळाली. आता लग्न उरकून टाकू म्हणून आई-बाबांनी स्थळं शोधणं चालू केलं; परंतु नेहा इतक्या लवकर लग्न करायला तयार नव्हती. तिला करिअर करायचे होते.

    गेल्या सहा महिन्यांपासून नेहाला जॉब नव्हता. नेहाची या आधीची कंपनी एक छोटी कंपनी होती; परंतु नेहाचे रिपोर्टिंग डायरेक्ट सीईओंना होते, त्यामुळे नेहाच्या हुशारीला भरपूर वाव मिळाला आणि नेहानेही त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. स्टार ऑफ द मंथ, एम्प्लॉयी ऑफ द इयर अशी अनेक बक्षिसे पटकावत आणि चोख काम करून सर्वांकडून प्रशंसा मिळवत कंपनीत भक्कम स्थान निर्माण केले.

    हेही वाचा – आभास… की वास्तव?

    नेहाचे प्रमोशन झाले, पगार वाढला, केबिन मिळाली, गाडी मिळाली, सवलती वाढल्या, काम वाढले, कामाचा ताण वाढला, कामाच्या वेळा वाढल्या आणि त्याचबरोबर सीईओंकडून अपेक्षितपणे नको ती किळसवाणी मागणी आली. नेहा कॉम्प्रमाइज करायला तयार नव्हती. तिने तडकाफडकी नोकरी सोडली, हातात दुसरी कोणतीही नोकरी नसताना!

    गेल्या सहा महिन्यांत नेहाने अनेक इंटरव्ह्यू दिलेत. बऱ्याच ठिकाणी ती फायनल राऊंडलादेखील सिलेक्ट झाली; परंतु प्रत्येक वेळी तिला नोकरी नसल्याचा गैरफायदा घेण्यात येऊन कमी पगार किंवा खालची पोस्ट ऑफर करण्यात आली. नेहाने तशी कोणतीही ऑफर स्वीकारली नाही.

    नेहाची कॉफी पिऊन झाली आणि तिने समोर बघितले तर काय आश्चर्य! निळा कोट आणि हातात पिवळे हेल्मेट घेऊन साहेबांच्या केबिनकडे जाणारा तरुण तोच होता, ज्याचा नेहाने बसमध्ये बसायला जागा न देऊन अपमान केला होता आणि तरीही ज्याने नेहाला महेश स्टुडिओचा पत्ता अगदी व्यवस्थित सांगितला होता. त्याने जर मला इथे बघितले आणि माझ्या रागीटपणाबद्दल साहेबांना सांगितले तर, हाता-तोंडाशी आलेली नोकरी जाईल, नेहा घाबरली. तो तरुण स्वतःच्याच तंद्रीत असल्याने त्याची नजर चुकविण्यात नेहाला यश मिळाले होते.

    निळा कोट आणि हेल्मेट बघितल्यावर नेहाला वाटले तो तरुण नक्कीच सुपरवायझर असावा आणि मी जर ऑफिसर म्हणून या कंपनीत रुजू झाले तर, कदाचित तो माझ्या हाताखाली असेल. मी खुर्चीवर बसेन आणि तो आजसारखा कायम उभा राहील, न रागावता ‘मॅम, मॅम’ करेल. नेहा दिवास्वप्नात रमली असतानाच साहेबांच्या सेक्रेटरीने नेहाला सांगितले, ‘तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे.’

    क्रमश:

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026 ललित

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026 ललित

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    By सतीश बर्वेMay 30, 2026

    ध्यानीमनी नसताना त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. “मिसिंग यु अ लॉट…” ते वाचून मी मनातल्या मनात…

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 313
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 436
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026
    Most Popular

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.