Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!
    फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJune 12, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, लबाड वांग्याची भाजी, लबाड वांगी, फसवी वांगी, ना वांग ना चिकन, वांग्याविना वांग्याची भाजी, विदर्भ स्पेशल भाजी, विदर्भ स्पेशल लबाड वांगी, लबाड वांगी तर्री
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘लबाड वांगे’ ऐकून हसायला आले ना? परंतु हीच खरी या भाजीची मेख आहे. विदर्भात आमरसाचा बेत असला की, पाटवडीची भाजी, भरली वांगी, शेव टमाटर भाजी, गोळा आमटी, मूग वड्यांची भाजी किंवा लबाड वांग्याची तर्रीदार भाजी आवर्जून केली जाते. गोड रसाच्या भरपेट जेवणाचा सुबक तोल सांभाळण्यासाठी या भाज्या अगदी उत्तम पर्याय आहेत. सोबतीला मऊ लुसलुशीत पोळ्या किंवा गरमागरम पुऱ्या असतील, तर मग जेवणाची रंगत काही वेगळीच! आमरस आणि अशा मसाल्याच्या भाज्या आणि अशा सुग्रास बेताचा विचार एकदम पारंपरिक आणि भारी आहे.

    विदर्भातील स्वयंपाकाचा आणि पारंपरिक सुगरणपणाचा हा एक अप्रतिम नमुना आहे. एरवी देखील भाजी नसेल तर ही फसवी वांगी किंवा लबाड वांगी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत, कांदा आणि लिंबू घेऊन अगदी सुंदर चवीचा अनुभव देते! या भाजीच्या नावात वांग्यांचा उल्लेख आढळत असला तरी प्रत्यक्षात मात्र यामध्ये वांग्याचा उपयोग अजिबात केलेला नाही. वांग्यांचे नावच फक्त या भाजीला देण्यात आलेले आहे, कारण यातील बेसनाच्या गोळ्याला वांग्याचा आकार दिलेला दिसतो. ही बेसनाची वांगी चिकनच्या लेगपीससारखी पण दिसतात. अशाच फसव्या कृतीमुळे या भाजीला ‘लबाड वांगी’ म्हटले जाते. चला तर मग पाहूया याची खमंग रेसिपी!

    रस्सा आणि गोळ्यांसाठी साहित्य

    • बेसन – 2 वाट्या
    • मोठा कांदा – 1
    • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट – मूठभर
    • सुके खोबरे – मूठभर
    • भिजवलेली हरभरा डाळ – मूठभर
    • धणे – 2 टेबलस्पून
    • जिरे – 1 चमचा
    • खसखस – 4 टेबलस्पून
    •  सुक्या लाल मिरच्या – 4 ते 5
    • आलं-लसूण पेस्ट – 2 चमच
    • कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
    • लाल तिखट – 4 चमचे
    • हळद – 2 चमचे
    • गरम मसाला (किंवा गोडा मसाला) – 2 चमचे
    • मीठ – चवीनुसार
    • तेल – दीड पळी
    • मोहरी – एक टीस्पून
    • हिंग – चिमूटभर

    कृती

    मसाल्याचे सारण

    1. कढईत थोडे तेल टाकून चिरलेला कांदा (अर्धा कांदा मसाल्यासाठी आणि अर्धा फोडणीसाठी ठेवावा), धणे, खोबरे, जिरे, खसखस आणि सुक्या लाल मिरच्या खमंग भाजून घ्याव्यात.
    2. हे मसाले थंड झाल्यावर मिक्सरवर वाटून घ्यावेत. यातच मूठभर भिजवलेली हरभरा डाळ टाकून तिचा जाडसर भरडा करून घ्यावा.
    3. नंतर या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचे कूट, एक चमचा तिखट, एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकजीव करावे. खसखस, खोबरे आणि हरभरा डाळीच्या जाडसर भरड्यामुळे या सारणाला खूप छान चव येते.

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… मिरचीची भाजी- भाकरी

    बेसनाची ‘वांगी’

    1. एका मोठ्या बाऊलमध्ये दोन वाट्या बेसन घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ आणि जिरेपूड घालून घट्ट गोळा भिजवावा. त्याला तेलाचा हात लावून बाजूला ठेवावे.
    2. आता बेसनाचे छोटे गोळे करून हातावरच वाटीसारखा आकार द्यावा. त्यात तयार मसाल्याचे सारण भरावे.
    3. चारही बाजूंनी कडा दाबत आधी मोदकासारखा आकार देऊन तोंड बंद करावे. नंतर हातावरच लांबट अंडाकृती आकार देऊन छोट्या वांग्यासारखे किंवा वरचे टोक निमुळते करून देठासारखा आकार द्यावा.
    4. ही तयार झालेली बेसनाची वांगी एका तेलाचा हात लावलेल्या चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावीत.

    तर्रीदार रस्सा

    1. कढईत दीड पळी तेल तापवून त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी द्यावी. उरलेला बारीक चिरलेली अर्धा कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत परतावा.
    2. कांदा परतल्यावर दोन चमचे आलं-लसूण पेस्ट टाकावी. ती परतली की त्यात एक चमचा हळद, दोन चमचे तिखट आणि सारणाचा उरलेला मसाला टाकावा.
    3. थोडे पाणी टाकून मसाल्याला तेल सुटू द्यावे. तेल सुटले की, गरम मसाला घालून रश्श्यासाठी गरजेनुसार पाणी वाढवावे.
    4. रश्श्याला छान उकळी आली की, त्यात वाफवलेली बेसनाची वांगी सोडावीत. वांगी उकळून वर आली की, ती पूर्ण शिजली असे समजावे. मंद गॅसवर भाजी थोडी उकळू द्यावी.
    5. वरून छान कोथिंबीर पसरवून गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत वाढावी!

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!

    खास टिप्स

    • सारणाचा मसाला उरला तर तो भाजीच्या रश्श्यात वापरावा. जास्त उरल्यास हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा. मसाला आधीच भाजलेला असल्यामुळे हा फ्रीजमध्ये आठवडाभर छान टिकतो आणि इतर कोणत्याही आमटीसाठी वापरता येतो.

    तर कशी वाटली ‘लबाड वांग्याची’ ही पारंपरिक रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    September 7, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल… घनुले!

    September 4, 2026 फूड काॅर्नर

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    August 28, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    By Team AvaantarSeptember 7, 2026

    नीलिमा खडतकर बेसन-काजू बर्फी साहित्य बेसन – 3 कप तूप – 2 कप दूध -…

    Recipe : विदर्भ स्पेशल… घनुले!

    September 4, 2026

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    August 28, 2026

    Recipe : चटपटीत कैरी लोणचे आणि भोकरांचे लोणचे

    August 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    बदला

    September 15, 2026

    वधू-वर सूचक मंडळ

    September 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 436
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 584
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 922
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.