Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात
    फूड काॅर्नर

    Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरApril 22, 2026Updated:April 22, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेख, टेस्टी तोंडलीभात, टेस्टी मसालेभात, मसालेदार मसालेभात, लग्नाच्या पंक्तीतील मसालेभात, लग्नकार्याची ओळख मसालेभात, लग्नकार्यातील तोंडलेभात
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वीच्या काळात म्हणजे साधारणपणे 1960 ते 1990च्या काळात लग्नसमारंभांमध्ये पंगतीला वरण भात, मसालेभात,  पातळ भाजी, एखादी सुकी भाजी, चटण्या, कोशिंबीरी, कढी किंवा मठ्ठा, पापड-कुरड्या (अख्खे नाही बरं, एकत्र चुरा केलेल्या), गोडाला बुंदीचा लाडू किंवा जिलेबी असा मेन्यू ठरलेला असायचा. त्यामध्ये आचारी सांगेल तसंच व्हायचं. यामध्ये कुठलाही बदल दिसायचा नाही. परंतु आधुनिक जीवनशैली लोक अनुसरत गेले आणि या लग्नातील पंगतींच्या गंमतीजमती मागे पडून सोफेस्टिकेटेड बुफे पद्धत अगदी शहरांपासून ते खेडेगावांपर्यंत अवलंबिली जाऊ लागली. पंगतीला बसायलाही लोक आजकाल गावठीपणा समजतात.

    यामध्ये मसालेभात अर्थात तोंडलीभाताला विशेष महत्त्व होते. कधी कधी याची जागा बटाटा घ्यायचा. हळूहळू यामध्ये फुलकोबी आणि मटारने आपले विशेष स्थान निर्माण केले म्हणण्यापेक्षा कायम केले, खरंय ना? आजकाल मसालेभात म्हटला की, त्यामधे फुलकोबी आणि मटार हेच जाणार, असे समीकरणच ठरले आहे. पण खर सांगू? हा फुलकोबी आणि मटार घातलेल्या मसालेभातापेक्षा तोंडली आणि शेंगदाणे घातलेला मसालेभात सरस ठरतो. त्याच्या जोडीला जर कढी किंवा मठ्ठा असेल तर काही विचारायलाच नको! पूर्वी लग्नामध्ये आचारी अस्सा काही मसालेभात बनवायचे की, साध्या भाताला फारशी मागणी नसायची. तोंडल्याच्या या मसालेभाताबरोबर मठ्ठयाच्या किती वाट्या पोटात रीचवल्या जायच्या ते समजायचे नाही. बहुतेक सर्व महाराष्ट्रीयन लग्नात हा अस्सल खडे मसाले असलेला तोंडलीभात पंगतीमध्ये विराजमान असायचा. मसाल्यांचे प्रमाण योग्य असेल तर मसालेभाताची चव अफलातून लागते.

    तोंडली आणि शेंगदाणे घातलेला मसालेभाताची जागा पुलाव, फ्राइड राईस वगैरे तरी नाही घेऊ शकत. या इतिहासजमा होत चाललेल्या तोंडलेभातलाही उजाळा देण आवश्यक आहे. मंडळी हा तोंडल्याचा मसालेभात एकदा करून तर पाहा… एकदा याची चव जीभेवर रेंगाळली तर तो तुम्ही वारंवार कराल. याच्या घमघमाटाने वातावरण दरवळून जाईल आणि पोटातील कावळे याचा आस्वाद घ्यायला आतुरतील.

    साहित्य

    • तांदूळ (कुठलाही चालतो) – 2 वाट्या
    • तोंडली – पाव किलो
    • तमालपत्र – २
    • कलमी – एक इंच (दोन तुकडे)
    • चक्रीफूल – २
    • मसाला वेलची – २
    • काळे मिरे – चार ते पाच
    • लवंग – तीन-चार
    • आलं – एक इंच (ऐच्छिक)
    • हिरव्या मिरच्या – पाच ते सहा
    • लसूण – सात- आठ पाकळ्या
    • कोथिंबीर – एक वाटीभर (चिरलेली)
    • ओल खोबरं – एक वाटीभर (भातावर वरून घ्यायला)
    • धणे – एक चमचा
    • जिरे – एक चमचा
    • भिजलेले शेंगदाणे – दोन मूठ
    • तेल – एक पळीभर
    • गोडा मसाला – दोन चमचे
    • लाल तिखट – दोन चमचे
    • मीठ – चवीनुसार
    • हिंग – एक लहान चमचा
    • कढीपत्ता – पाच ते सात पाने
    • हळद – एक चमचा

    हेही वाचा – Recipe : अतिशय खमंग अन् सर्वांच्या पसंतीचं थालिपीठ!

    कृती

    1. प्रथम तोंडली स्वच्छ धुवून त्याचे उभे काप करावेत.
    2. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची एकत्रित पेस्ट करून घ्यावी. या पेस्टमध्ये तुम्ही थोडं सुकं खोबरं बारीक केल तरी चालतं.
    3. धणे हातावर रगडून बारीक करावे किंवा मिक्सरमध्ये भरडून घ्यावे.
    4. तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घ्यावे.
    5. आता एका मोठ्या पसरट भांड्यात एक पळीभर तेल गरम करून त्यात एक-एक चमचा मोहरी आणि जिरं टाकावे. एक छोटा चमचा हिंगही टाकावा.
    6. त्यानंतर, कढीपत्त्याची सात आठ पाने, दोन तेजपान, कलमीचे दोन तुकडे, मिरे, लवंग, चक्रीफूल, मसाला वेलची आणि भरडलेले धणे टाकावे आणि दोन सेकंद परतून घ्यावे. ज्यामुळे या खड्या मसाल्यांचा स्वाद तयार होईल.
    7. नंतर त्यामध्ये उभी चिरलेली तोंडली टाकावी आणि मंद आचेवर थोडी परतून घ्यावीत.
    8. तोंडली परतल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचे वाटण टाकावे.
    9. थोडे परतल्यावर तांदूळ टाकून आणखी परतून घ्यावे आणि नंतर थोडे पाणी टाकावे.
    10. आता यामध्ये एक चमचा हळद, दोन चमचे तिखट, दोन चमचे गोडा मसाला आणि मीठ टाकून एकदा छान परतून घ्यावे.
    11. नंतर यामध्ये भिजवलेले शेंगदाणे टाकावे आणि तांदळाच्या दुप्पट पाणी घालून आणि झाकण ठेवून भात शिजू द्यावा. वाटल्यास वरच्या ताटलीवर पाणी घालून ठवू शकता.
    12. भात तुम्हाला किती फडफडीत किंवा मऊसर हवा, त्यानुसार पाणी घालावे.

    हेही वाचा – Recipe : उपवासाचे दहीवाले आलू करून पाहिले आहेत का?

    टीप्स

    • तोंडलेभात शिजला की, वरून दोन चमचे साजूक तूप सोडावे आणि अर्धे लिंबू पिळावे जेणेकरुन भात छान मोकळा होतो.
    • सर्व्ह करताना भातावर ओले खोबरे आणि कोथिंबीर पेरून सर्व्ह करावा.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026 फूड काॅर्नर

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    By माधवी जोशी माहुलकरApril 19, 2026

    पोहे हा प्रकार जवळपास सर्वांच्याच आवडीचा आहे! पोह्यांचे विविध प्रकार महाराष्ट्रात प्रचलित आहेत. अगदी मुलगी…

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    April 23, 2026

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!

    April 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 276
    • अवांतर 183
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 574
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026
    Most Popular

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.