Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 नोव्हेंबर 2026

    November 27, 2026

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026

    सरप्राइज!

    November 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, November 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 नोव्हेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 नोव्हेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 27, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 27 नोव्हेंबर 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 06 मार्गशीर्ष शके 1948; तिथि : तृतीया 09:48, चतुर्थी 30:39; नक्षत्र : आर्द्रा 15:08;
    • योग : शुभ 23:51; करण : बव 20:11;
    • सूर्य : वृश्चिक; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:51; सूर्यास्त : 17:59;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128

    संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 08:51

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर

    टीम अवांतर

    लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1888 रोजी बडोदा येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील मावळंगे येथील होते. राजापूर आणि इतर ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, मावळंकर 1902 मध्ये उच्च शिक्षणासाठी अहमदाबादला गेले. 1908 मध्ये त्यांनी अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून विज्ञान शाखेत बी.ए. ची पदवी मिळवली.

    मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ स्कूलमध्ये कायद्याचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी, 1909 मध्ये ते एक वर्ष कॉलेजचे दक्षिणा फेलो होते. 1912 मध्ये कायद्याची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी 1913 मध्ये वकिली सुरू केली. लवकरच, ते सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांसारख्या थोर नेत्यांच्या संपर्कात आले.

    हेही वाचा – कर्तव्य आणि ओझे : एक आध्यात्मिक चिंतन

    1913 मध्ये ते गुजरात एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव तर 1916 मध्ये गुजरात सभेचे सचिव झाले. मावळंकर 1919 मध्ये पहिल्यांदा अहमदाबाद नगरपालिकेवर निवडून आले. ते 1919-22, 1924-27, 1930-33 आणि 1935-37 दरम्यान अहमदाबाद नगरपालिकेचे सदस्य होते.

    पुढे महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळ आणि नंतर 1930 मिठाच्या सत्याग्रहात मावळंकर सहभागी झाले होते. 1934 मध्ये काँग्रेसने स्वातंत्र्यापूर्वीच्या विधान परिषदांच्या निवडणुकांवरील बहिष्कार सोडल्यानंतर, मावळंकर मुंबई प्रांतीय विधानसभेवर निवडून आले आणि 1937 मध्ये विधानसभेचे अध्यक्ष झाले. 1946 पर्यंत त्यांनी हे पद भूषविले. 1946 मध्ये, ते केंद्रीय विधानसभेवरही निवडून आले.

    भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 14-15ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्रीपर्यंत मावळंकर केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष होते. त्या दिवशी, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947च्या अन्वये , भारतीय विधानमंडळाची दोन सभागृहे, केंद्रीय विधान सभा आणि राज्य परिषद, यांचे अस्तित्व संपुष्टात आले आणि भारताच्या संविधान सभेने भारताच्या शासनाचे संपूर्ण अधिकार ग्रहण केले. स्वातंत्र्यानंतर लगेचच, 20 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेची संविधान-निर्मितीची भूमिका तिच्या कायदेविषयक भूमिकेपासून वेगळी करण्याच्या गरजेचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे मावळंकर यांनी अध्यक्षपद भूषवले.

    26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारल्यानंतर, संविधान सभेचे (विधिमंडळ) नाव बदलून हंगामी संसद असे ठेवण्यात आले आणि मावळंकर या हंगामी संसदेचे अध्यक्ष झाले. 1952 मध्ये पहिली लोकसभा स्थापन होईपर्यंत त्यांनी हे पद भूषवले.

    15 मे 1952 रोजी, स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, काँग्रेसकडून अहमदाबादचे प्रतिनिधित्व करणारे मावळंकर पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र जानेवारी 1956 मध्ये, मावळंकर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 27 फेब्रुवारी 1956 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज तुम्हाला धार्मिक आणि सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय काही नवीन संधीही मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंबंधीच्या समस्याही आज सुटतील. व्यवसायातील सकारात्मक बदलांमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.तुमच्या एकंदर प्रगतीमुळे तुमचे प्रतिस्पर्धी आश्चर्यचकित होतील. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींबाबत संयम बाळगा.

    वृषभ – कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. दुसरीकडे तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. ते आपले पथ्यपाणी नीट  सांभाळत आहेत का याची खात्री करा. आज हाती घेतलेले कोणतेही काम यशस्वी होईल. संध्याकाळचा मोकळा वेळ तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची आणि त्यांना डिनर डेटवर जाण्याची संधी देईल. तुम्ही ऐहिक सुखांचा आनंद घ्याल. आज मदतनीस किंवा नोकर त्रास देऊ शकतात. संध्याकाळी परिस्थितीत सुधारणा होईल, शिवाय शेजाऱ्यांकडूनही मदतीचा हात पुढे केला जाईल.

    मिथुन – आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असेल. एखाद्या गोष्टीवरून कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा. घाईघाईत केलेले काम अंगलटी येऊ शकते आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते. वाहनात बिघाड झाल्यामुळे अनपेक्षित खर्च होऊ शकतो. परराष्ट्र व्यवहारात यश मिळण्याची शक्यता आहे. काही जातकांच्या वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडीदाराशी शांतपणे संवाद साधा‌ संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राशी अनपेक्षितपणे भेट होऊ शकते.

    कर्क – काही जातक आजपासून शहाणपणाने आणि विवेकबुद्धीने नवीन कामाचा शोध सुरू करतील. कौटुंबिक मालमत्तेसंबंधीचे सुरू असणारे कोणतेही वाद एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीने मिटतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी थोडी अधिक मेहनत करावी लागेल. भाऊ आणि मित्रांच्या मदतीने नवीन संधी निर्माण होतील. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. जोडीदाराचा सल्ला कामाच्या ठिकाणी फायदेशीर ठरेल, त्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. संध्याकाळ स्वतःचे छंद पूर्ण करण्यासाठी घालवाल.

    सिंह – कामाच्या ठिकाणी कोणतेही वाद टाळा, कारण त्याचे रूपांतर कायदेशीर समस्यांमध्ये होऊ शकते. नोकरीच्या बाबत  अस्थिरता निर्माण झाल्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. कौटुंबिक समस्या संयमाने सोडवा; वडीलधाऱ्यांच्या मदतीने प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना पैशांची कमतरता भासू शकते. सायंकाळी अध्यात्माबद्दलची आवड वाढेल. आज स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

    कन्या – कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल.  काही अनावश्यक खर्च उद्भवतील, जे तुम्हाला सोसावे लागतील. वैवाहिक जीवन चांगले राहील आणि तुम्ही जोडीदारासोबत मुलांच्या भवितव्याबद्दल निर्णय घेऊ शकाल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या कार्यनिष्ठेमुळे लोक प्रभावित होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठीचे नवीन उपक्रम यशस्वी होतील. संध्याकाळी कुटुंबियांसोबत घरगुती कार्यक्रमाला उपस्थित राहाल.

    तुळ – आज तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही समाजकार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना शांतता आणि निवांतपणा लाभेल. व्यावसायिकांना चांगला नफा होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बदलणाऱ्या हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान समस्येकडेही लक्ष द्या.

    वृश्चिक – नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नशिबाची साथ मिळेल आणि व्यवसायात चांगला नफा होईल. संततीच्या नोकरीबद्दल चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे भविष्याबद्दलची तुमची चिंता कमी होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल आणि ते स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतील. वडिलांच्या पाठिंब्यामुळे कौटुंबिक व्यवसायातील कठीण परिस्थिती आणि समस्या हाताळण्यासाठी मदत होईल. संध्याकाळी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

    हेही वाचा – सरप्राइज!

    धनु – एखाद्या सदस्याच्या करिअरवरून कुटुंबात मतभेद होऊ शकतात; मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नातेसंबंध विनाकारण ताणले जातील. यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहा आणि आहाराकडे विशेष लक्ष द्या. उद्याच्या व्यवहारांमध्ये व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगावी, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एक भेटवस्तू आणू शकता, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. संध्याकाळ एखाद्या आध्यात्मिक कार्यामध्ये घालवाल.

    मकर – वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आज एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटून भविष्यातील योजनांवर त्यांच्याशी चर्चा कराल. राजकीय क्षेत्रातील जातकांना जनतेचा पाठिंबा मिळेल. तुमचे निर्णय घेण्याचे कौशल्य व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल, ज्यामुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कुटुंबात सुरू असलेले कोणतेही वाद आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला सुटकेचा निःश्वास टाकता येईल. संध्याकाळी एखाद्या मंदिरात बसून ध्यानधारणा कराल.

    कुंभ – व्यावसायिकांसाठी आजचा दिवस नवीन योजना घेऊन येईल. तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे संबंध सुधारतील. त्यांच्या कल्पनांना प्राधान्य देणे आज व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. तुमचे काम इतरांपेक्षा सरस ठरेल आणि व्यावसायिक व्यवहार यशस्वी होतील. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील दीर्घकाळच्या समस्यांचे निराकरण होईल. संध्याकाळ प्रियजनांसोबत संगीत आणि भोजनाचा आनंद घेत घालवाल.

    मीन – तुमच्या एखाद्या चांगल्या कामामुळे आज कुटुंबाला अभिमान वाटेल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे यशस्वी होतील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि ते आपल्या प्रतिस्पर्धकांवर मात करू शकतील. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना मोठ्या भावाकडून नोकरीसंबंधी बातमी मिळेल. जर तुम्ही कर्ज घेतले असेल, तर आज त्याची परतफेड कराल. संध्याकाळी पाहुणे येतील, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 नोव्हेंबर 2026

    November 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    घराची वास्तुरचना आणि हृदयाचे आरोग्य

    November 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 नोव्हेंबर 2026

    By Team AvaantarNovember 26, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 नोव्हेंबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 05…

    घराची वास्तुरचना आणि हृदयाचे आरोग्य

    November 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 नोव्हेंबर 2026

    November 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 नोव्हेंबर 2026

    November 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 नोव्हेंबर 2026

    November 27, 2026

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026

    सरप्राइज!

    November 26, 2026

     स्मार्ट गूगल की आई?

    November 26, 2026

    कर्तव्य आणि ओझे : एक आध्यात्मिक चिंतन

    November 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा अग्नीचा डोंगरु, नेघे कोणी बीजअंकुरु

    November 26, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 नोव्हेंबर 2026

    November 27, 2026

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026

    सरप्राइज!

    November 26, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.