नीलिमा खडतकर
व्हेजिटेबल्स-सोया पॅटिस
साहित्य
- चणे – अर्धा कप (भिजवलेले)
- फ्लॉवर – अर्धा कप (चिरलेला)
- गाजर – अर्धा कप (बारीक चिरलेले)
- सोया चंक्स – अर्धा कप
- चिरलेले बीट – पाव कप
- बारीक रवा – अर्धा कप
- बेसन – पाव कप
- हिरव्या मिरच्या – 2-3
- चिरलेली कोथिंबीर – 1 टेबलस्पून
- आल्याचा तुकडा – अर्धा इंच
- चाट मसाला – एक टीस्पून
- लाल तिखट – एक टीस्पून
- जिरेपूड – एक टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- तेल – दोन पळी
कृती
- प्रथम भिजवलेले चणे, चिरलेला फ्लॉवर, गाजर आणि बीट दोन-तीन मिनिटे थोडे उकडून मऊ करून घ्यावेत.
- गरम पाण्यात थोडे मीठ घालून पाच मिनिटे सोया चंक्स भिजत ठेवावेत, नंतर सोया चंक्स पाण्यातून काढून छान पिळून घ्यावेत.
- हे सोया चंक्स मिरची, आले आणि कोथिंबीर घालून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावेत.
- उकडलेल्या भाज्या आणि चणे देखील मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावेत.
- दोन्ही वाटण एकत्र करून त्यात चाट मसाला, लाल तिखट, जिरे पूड, मीठ आणि बेसन घालून छान गोळा करून घ्यावा.
- आता आधी छोट्या गोळ्या करून चपटे पॅटिस करून घ्यावेत.
- नंतर प्रत्येक पॅटिस रव्यामध्ये घोळवून तव्यावर थोडे थोडे तेल घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छान लालसर खरपूस भाजून घ्यावेत.
- अशा प्रकारे प्रोटिनने भरपूर असे चटपटीत व्हेजिटेबल-सोया पॅटिस तयार.
- पुदिना चटणी किंवा सॉससोबत गरम गरम सर्व्ह करावेत.
हेही वाचा – Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या
टीप
- या पॅटिसमध्ये आपण दुसऱ्या भाज्या देखील घालू शकता, जसे – मटार, बटाटा इत्यादी.
- भिजवलेल्या चण्याऐवजी मूग देखील घेऊ शकता.
खाकरा भेळ
साहित्य
- साधा जिरा खाकरा – 4-5
- कांदा – 1 (बारीक चिरलेला)
- टोमॅटो – 1 (बारीक चिरलेला)
- रॉक स्टार – 1 टीस्पून
- चाट मसाला – 1 टीस्पून
- लाल तिखट – 1/2 टीस्पून
- खारे शेंगदाणे – दोन टेबलस्पून
- मसाला चणा डाळ – दोन टेबलस्पून
- बारीक शेव – दोन टेबलस्पून
- अर्ध्या लिंबाचा रस
- हिरव्या मिरच्या – 2
कृती
- चार-पाच जिरा खाकऱ्याचा हाताने बारीक चुरा करून घ्यावा. (इथे साधा जिरा खाकरा घेतला आहे, आवडी प्रमाणे आपण घेऊ शकता).
- कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. त्यात भेळेसाठी लागणार सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. लाल तिखट, मीठ, चाट मसाला देखील त्यात घ्यावे.
- आता एका मोठ्या भांड्यात प्रथम खाकऱ्याचा चुरा घालवा, नंतर त्यात भेळेचे सर्व साहित्य घालावे.
- वरून लिंबाचा रस घालून हे सर्व छान मिसळून घ्यावे.
- अशा रीतीने चटपटीत खाकरा भेळ खायचा तयार.
हेही वाचा – Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे
टीप्स
- आवडीनुसार इतर पदार्थही आपण घालू शकता – जसे बारीक चिरलेली काकडी, डाळिंबाचे दाणे इत्यादी.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
पुरवठा संख्या – 2-3 व्यक्तींसाठी


