लाल मिरच्यांचे लोणचे
साहित्य
- लाल ढब्बू मिरच्या – पाव किलो
- ओवा – दोन चमचे
- कलौंजी – दोन चमचे
- बडीशेप – चार चमचे
- मेथी – दोन चमचे
- मोहरी – चार चमचे
- आमचूर – चार चमचे
- तिखट – एक चमचा
- हिंगाची पूड – तीन टी-स्पून
- गरम मसाला – दोन चमचे
- धणे – तीन चमचे
- हळद – दोन चमचे
- मोहरी किंवा रिफाइन्ड तेल – पाव किलो (अंदाजाने)
कृती
- ओवा, कलौंजी, बडीशेप, मेथी, मोहरी आणि धणे हे जिन्नस गरम करून आणि किंचित कुटून घ्यावेत.
- ओल्या लाल रंगाच्या ढब्बू मिरचीचे वरचे तोंड देठासकट काढावा. आतील दांड्याला बी चिकटलेले असते, तो दांडाच देठासकट काढावा.
- मिरच्यांमध्ये असलेले सर्वच बी काढून घ्यावे. ते बी, कुटलेले मसाल्याचे जिन्नस तसेच, आमचूर, मीठ, हिंगपूड, हळद, तिखट, गरम मसाला आणि गोडे तेल असे एकत्र कालवून ते मिश्रण पोकळ मिरच्यांत भरावे.
- तेल तापवून, गार करून, एका पातेल्यात घ्यावे आणि त्यात एक एक मिरची बुडवून घ्यावी.
- नंतर एका काचेच्या बरणीत त्या मिरच्या उभ्या ठेवाव्यात. मिरच्यांवर थोडे तेल घालावे आणि बरणी थोडे दिवस उन्हात ठेवावी.
हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी
गाजराचे लोणचे
साहित्य
- गाजराचे तुकडे अगर जाड किस – दोन वाट्या
- लसणीचा गड्डा – एक मध्यम आकाराचा
- मोहरीची डाळ – पाव वाटी
- लाल तिखट – पाव वाटी
- लिंबाचा रस – अर्धी लहान वाटी
- मीठ – चवीनुसार
- तेल – पाव वाटी
- मोहरी – एक चमचा
- हळद – पाव चमचा
- हिंग – अर्धा चमचा
- मेथी तळून त्याची पूड – पाव चमचा
कृती
- लसूण सोलून बारीक वाटून घ्यावा. तसेच, मोहरीची डाळ वाटून घ्यावी.
- त्यानंतर फोडणी करून घ्यावी आणि त्यात मेथी तळून तयार केलेली पूड, हिंग, हळद, लाल तिखट, लसणाची पेस्ट, वाटलेली मोहरीची डाळ, गाजराचे तुकडे किंवा जाड किस हे सर्व साहित्य घालून कालवावे आणि बरणीत भरून ठेवावे.
- हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकते.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
avaantar.recipe@gmail.com
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकाव
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


