Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeआरोग्यनिरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक...

निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक…

 

रविंद्र परांजपे

मागील तीन लेखांत आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून प्रबल इच्छा असणे, पुरेसा वेळ काढणे तसेच पैशांचा यथायोग्य विनियोग करणे या तीनही बाबींची नितांत आवश्यक आहे, हे ध्यानात घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक’ या मुलभूत मुद्द्याविषयी जाणून घेणार आहोत.

मानसिकता म्हणजे काय?

सोप्या भाषेत मानसिकता म्हणजे मनोवृत्ती. एखाद्या व्यक्तीच्या मनातील विचार, भावना, एखाद्या गोष्टीकडे अथवा प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसेच व्यक्तीचे प्रत्यक्ष वर्तन आणि कृती या सर्व बाबींचा समावेश मानसिकता या संज्ञेत करता येईल.

मानसिकता बदलणे का आवश्यक आहे?

मानसिकता बदलण्याची गरज समजून घेण्यासाठी आपण सद्यमानसिकता काय आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आरोग्यासंबंधित मानसिकता कशी असते, हे जाणून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूयात.

हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…

सद्यमानसिकता

आपल्या सर्वांनाच आरोग्य चांगले रहावे असे वाटत असते. परंतु बहुतांश लोकांच्या बाबतीत ही भावना मनातच रहाते. काही जण मात्र संवादातून अशी भावना व्यक्त करतात, परंतु ही भावना केवळ वाटण्यापुरतीच असते आणि तिला कृतीची जोड क्वचितच आढळून येते… आणि हे कटू वास्तव मला बर्‍याच जणांच्या प्रतिसादांवरून अनुभवास आले. अशी मानसिकता दर्शविणाऱ्या काही प्रतिक्रिया पुढील प्रमाणे-

नोकरी-व्यवसाय करणारे पुरुष तथा महिला

  • मला व्यायामाचे / योगाचे फायदे माहीत आहेत… पण दिवसभरात एवढी धावपळ होते की, मला व्यायामासाठी वेळ काढायला तर सोडाच, पण विचार करायलाही सवड मिळत नाही.
  • बरेचदा काम एवढं असते की, ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबून काम संपवावे लागते.
  • कित्येकदा तर सुट्टीच्या दिवशी काम घरी आणून पूर्ण करावे लागते.
  • आठवड्यातील काही दिवस घरून काम करत असताना तर, वेळेची मर्यादा पाळणे अवघड जाते.
  • कामाच्या गडबडीत जेवणाची वेळ पाळणे जमत नाही आणि उशिरा जेवण होते.
  • घरी आल्यावर भूक लागल्यावर काही तरी खाल्ले जाते आणि त्यामुळे साहजिकच रात्रीचे जेवण उशिरा होते.

हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी वेळ काढावाच लागेल!

गृहिणी

  • सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील आवराआवर तसेच स्वयंपाक-पाणी करताना एवढं थकायला होते की, व्यायाम / योगा करायची गरजच वाटत नाही आणि गरज वाटली तरी त्यासाठी दिवसभराच्या कामात फुरसतच मिळत नाही.
  • घरातील सर्वांचा सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण होईपर्यंत मला नाष्टा आणि जेवणासाठी उशीरच होतो. तसेच रात्रीची जेवणं देखील उशिराच होतात.
  • घरातील सर्वांची जेवणं झाल्यावर उरलेले अन्न वाया जाऊ नये म्हणून शिळे अन्न खाल्ले जाते.

एकूणच दिवसभरात वेळ मिळत नाही, असा सर्वसाधारण प्रतिसाद असतो. तसेच माझ्या निदर्शनास आलेल्या काही बाबी पुढीलप्रमाणे :

  • उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याऐवजी योग / व्यायाम थंडीत सुरू करण्याचा विचार आहे. पण थंडी सुरू झाल्यावर, ‘एवढ्या थंडीत सकाळी लवकर उठायला होत नाही.’
  • सणवारात योग / व्यायाम करणे अजिबातच शक्य नाही. (सणवार तर एकामागोमाग एक येत असतातच.)
  • दिवसभरात तसेच रात्री उशिरापर्यंत बहुतांश लोकांचा बराचसा वेळ मोबाइलवर व्यतीत होतो, परिणामी योग / व्यायाम करायला सवड मिळत नाही.
  • वरील सर्व अडचणींवर मात करून काही जण योग / व्यायाम सुरू करतात, परंतु लवकरच अडचणी मनावर हावी होतात आणि योग / व्यायाम कार्यक्रमास खीळ बसते. शेवटी अशा व्यक्ती आरंभशूर ठरतात.
  • तसेच, फक्त योगा डे प्रीत्यर्थ योगा करणारेही आहेत.

या सर्व अडथळ्यांच्या शर्यतीतून बाहेर पडून निरामय आरोग्याचे ध्येय गाठण्याचा एकुलता एक मार्ग म्हणजे – मानसिकता बदलणे.

हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी पैशाचा यथायोग्य विनियोग आवश्यक

मानसिकतेत बदल आवश्यक

प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी दिवसभरात यथायोग्य किमान एक तास राखून ठेवायला हवा आणि त्या वेळेत यथाशक्ती योग/व्यायाम केला पाहिजे व त्यात सातत्य ठेवायला हवे… आणि यासाठी स्वतःच्या मानसिकतेत बदल करणे नितांत आवश्यक आहे.

तात्पर्य, निरामय आरोग्यासाठी आवश्यक असणारी सकारात्मक मानसिकता आश्वस्त करण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करणे खरोखरच गरजेचे आहे आणि तसे केले तरच आपली नियोजित निरामय आरोग्याची वाटचाल सुकर होणार आहे.

क्रमशः


(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते “निरामय आरोग्य संकल्पना” यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा.)

मोबाइल – 9850856774

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!