Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » निरामय आरोग्य प्राप्तीसाठी वेळ काढावाच लागेल!
    आरोग्य

    निरामय आरोग्य प्राप्तीसाठी वेळ काढावाच लागेल!

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 13, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रविंद्र परांजपे

    मागील लेखात आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची आहे, ही प्राथमिक बाब समजून घेतली. मनात आरोग्याची इच्छा असेल तर, मार्ग नक्कीच सापडतो, ही बाब देखील आपण लक्षात घेतली. पण प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसत नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, निरामय आरोग्य प्राप्तीची नुसती इच्छा पुरेशी नाही तर, त्यासाठी आणखीन एक मुलभूत बाब आवश्यक आहे… आणि ती म्हणजे स्वतःसाठी पर्यायाने आरोग्यासाठी वेळ काढणे आणि हाच या लेखाचा विषय आहे.

    वेळेची उपलब्धता

    आपल्या सर्वांनाच, आपल्यातील प्रत्येकाला एका दिवसाचे 24 तास उपलब्ध आहेत. आता या उपलब्ध वेळेचा विनियोग करण्याचे प्रत्येकाचे गणित वेगवेगळे असते.

    हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…

    वेळेचा विनियोग

    सर्वसाधारणपणे उपलब्ध वेळेचा विनियोग कसा करायचा? वास्तविक, विनियोग कसा होतो, याबाबत आपण आयुष्यातील विविध टप्प्यांतील काही ठळक आणि महत्त्वाच्या घटना तसेच  प्रसंग घेऊन अनुषंगिक उदाहरणे पाहूयात.

    • शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यास, परीक्षा तसेच विविध स्पर्धा यांची तयारी यात व्यतीत होतो. शिवाय, आजकाल बहुतांश विद्यार्थ्यांचा एकंदरीतच स्क्रीनटाइम वाढत असल्याचे दिसून येते. यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले रहावे, असे वाटत असले तरी त्यासाठी वेळच मिळत नाही.
    • नोकरी-व्यवसाय करणारे पुरुष तसेच महिला कामात अशा तर्‍हेने व्यग्र असतात की, त्यांना स्वतःसाठी वेळ काढण्याचा विचार करायलाही वेळ नसतो. यदाकदाचित, वेळ काढला तरी, तो वेळ टीव्हीवरील विविध मनोरंजनपर कार्यक्रम पाहण्यात तसेच मोबाइलवरील व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्युब आणि तत्सम नानाविध अॅप्स हाताळण्यात जातो. मोबाइलचे व्यसन तर, दिवसेंदिवस आरोग्यास घातक ठरत आहे. परंतु आधुनिक जीवनातील रहाटगाडग्यात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणे अशक्यप्राय वाटते.
    • गृहिणी तर दैनंदिन घरगुती तसेच कौटुंबिक कामात एवढ्या व्यग्र असतात की, दिवसभरात होणाऱ्या शारीरिक हालचालींमुळे आरोग्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज त्यांना वाटत नाही आणि यामुळे त्या आरोग्यासाठी वेळ काढत नाहीत.
    • निवृत्तीनंतरच्या काळात ज्येष्ठ पुरुष आणि महिला यांच्याकडे भरपूर वेळ उपलब्ध असतो. परंतु वयाच्या या टप्प्यात व्यक्तींच्या मनात आरोग्याबद्दल वेगवेगळी धारणा असते. काही जणांना वाटत असते की, आयुष्यात कधी गोळी-औषध घेतले नाही, मग आत्ता आरोग्याची काळजी कशाला करायची? काही जणांना उतारवयात आरोग्यासाठी काही करण्याची गरज वाटत नाही. थोडक्यात, वेळ उपलब्ध असून देखील वेळेचा विनियोग आरोग्यासाठी होतोच असे नाही.

    वरील विवेचनावरून महत्त्वाची बाब लक्षात येते की, कारण खरे असो अथवा सबब काही असो, आरोग्यासाठी सहसा वेळ काढण्याची गरज वाटत नाही आणि वाटल्यास वेळ काढला जात नाही. वास्तविक, स्वतःच्याच आरोग्यासाठी वेळ नसणे अथवा वेळ न काढता येणे, ही खरोखरच चिंताजनक बाब आहे.

    हेही वाचा – आरोग्यम् धनसंपदा…

    मागील आणि या लेखावरून एक मुलभूत बाब लक्षात येते की, आरोग्य निरामय ठेवण्यासाठी मनापासून इच्छा तसेच पुरेसा वेळ काढणे नितांत आवश्यक आहे. आपल्याला जीवनात सुखसमृद्धी आणि समाधान हवे असल्यास आरोग्यासाठी पुरेसा वेळ काढायलाच पाहिजे.

    क्रमशः

    (लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहेत. संकल्पनेतील त्यांची ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही तीन मार्गदर्शनपर माहितीपूर्ण उपयुक्त पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. तसेच, यूट्युब चॅनेलवरील उपलब्ध योगा विडीओ देखील खरोखरच उपयुक्त आहेत. पुस्तकसंच घेतल्यास विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना अवश्य संपर्क करावा.)

    मोबाइल – 9850856774

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026 आरोग्य

    गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…

    May 7, 2026 आरोग्य

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    By रविंद्र परांजपेMay 9, 2026

    मागील लेखात आपण ध्यान साधनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण…

    गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…

    May 7, 2026

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 612
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026
    Most Popular

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.