Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026

    तीन तिगाडा काम बिगाडा…

    June 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Mental Health : आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव
    आरोग्य

    Mental Health : आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 23, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, MentalHealth, मानसिकआरोग्य, MentalStress, Tension, ताणतणाव, Stress_Redressal, Lifestyle, जीवनशैली, परीक्षेचा ताण, नोकरीचा ताण, व्यवसाय ताण, Exam stress, job stress, business stress
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रविंद्र परांजपे

    मागील लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ आरोग्यदायी संतुलित जीवनशैली अमलात आणणे नितांत आवश्यक आहे, हे वास्तव लक्षात घेतले. या लेखात आपण आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव याबाबत जाणून घेणार आहोत.

    पूर्वी फक्त वयस्कर लोकांना मनोविकार समस्या असायच्या. आता मात्र किशोरवयीन तसेच तरुण-प्रौढ या सर्वांनादेखील मानसिक ताणतणावांनी ग्रासलेले असल्याचे कटू वास्तव निदर्शनास येते. मानसिक ताणतणाव कोणालाच चुकलेला नाही. प्रत्येकालाच ताणतणावमुक्त जीवन जगावेसे वाटते.

    वयोमानानुसार वर्गीकरण

    आयुर्वेदात मनुष्याचे आयुर्मान 100 वर्षे धरून वयाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत.

    • बाल अवस्था : जन्मापासून 16 वर्षांचा कालावधी
    • मध्य अवस्था : 17 ते 70 वर्षांचा कालावधी
    • वृद्ध अवस्था : 70 वर्षांनंतर सुरुवात

    आपल्या जीवनशैलीत कालानुरूप बदल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आयुर्वेदातील अवस्थांमधे वयोमानानुसार कालसुसंगत बदल करून पुढीलप्रमाणे वर्गीकरण करणे यथार्थ होईल :

    • किशोरवयीन मुले आणि मुली – 16 वर्षांपर्यंत
    • तरुण-प्रौढ पुरुष आणि महिला – 17 ते 60 वर्षे
    • ज्येष्ठ पुरुष आणि महिला – 60 वर्षे पुढील.

    हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव निवारणाची आवश्यकता

    वयोमानानुसार मानसिक ताणतणाव

    1. किशोरवयीन मुले आणि मुली – साधारणतः तीन वर्षांपासून यांच्या शिक्षणास आरंभ होतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात वयोमानानुसार टप्प्याटप्प्याने वाढ होत असते. या कालावधीत विद्यार्थी पुढील प्रकारचे ताणतणाव अनुभवत असतात.
    • मनातील भीती आणि असुरक्षितता
    • अभ्यास आणि परीक्षेचा ताण
    • घरातील विपरीत वातावरणातून येणारी अस्वस्थता
    • मोबाइलच्या घातकी व्यसनातून उद्भवणारे दुष्परिणाम आणि ताण
    • वयोमानानुसार होणाऱ्या मनोकायिक बदलांतून येणारे ताण
    1. तरुण-प्रौढ पुरुष आणि महिला – वय वर्षे 17 ते 60 यामधील पुरुष व महिला यांना सर्वसाधारणपणे पुढील मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते :
    • नोकरी, व्यवसायातील ताणतणाव
    • वयपरत्वे उद्भवणाऱ्या शारीरिक तक्रारी तथा मानसिक समस्या
    • नातेसंबंधातील समस्या आणि उद्भवणारे ताणतणाव
    • आर्थिक अडचणींमुळे येणारे ताणतणाव
    • व्यसनाधीनतेच्या विपरीत परिणामांमुळे आलेले ताणतणाव (एकंदरीतच अवाजवी स्क्रीनटाइम हे देखील एक व्यसनच म्हणता येईल)

    हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव निवारणार्थ…

    1. ज्येष्ठ पुरुष आणि महिला – वयाच्या साठीनंतर ज्येष्ठ पुरुष आणि महिला यांना विशेष करून पुढील ताणतणावांचा सामना करावा लागतो :
    • शारीरिक व्याधी-विकारांमुळे उद्भवणारे ताणतणाव
    • निद्रानाशातून येणारे ताणतणाव
    • एकाकी जीवनातील ताणतणाव
    • कौटुंबिक वातावरणातून उद्भवणारे ताणतणाव
    • आर्थिक समस्यांमुळे आलेले ताणतणाव

    वयोमानानुसार येणाऱ्या निवडक ताणतणावांचा उल्लेख अगदी वानगीदाखल केला आहे. आजच्या धकाधकीत ताणतणावांचे स्वरूप आणि त्यातून उद्भवणाऱ्या मनोकायिक समस्या ही खरोखरच चिंताजनक बाब झाली आहे.

    ताणतणावांवर यशस्वीरीत्या मात करून ताणतणावमुक्त जीवन जगणे अवघड असेल, पण अशक्य मात्र अजिबात नाही. ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न हवेत आणि प्रयत्न प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रद्धा, संयम आणि सातत्य असणे आवश्यक आहे.

    क्रमशः

    (लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून त्यांच्या ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकात त्यांनी मानसिक ताणतणाव निवारणार्थ निवडक उपयुक्त उपाययोजनांबद्दल सर्वांगीण सर्वसमावेशक सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे; तसेच मानसिक आरोग्य संवर्धनासाठी वयोमानानुसार किशोरवयीन, तरुण-प्रौढ आणि ज्येष्ठ यांना विशेष मार्गदर्शन केले आहे. पुस्तकासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)

    मोबाइल – 9850856774

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026 आरोग्य

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026 आरोग्य

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरJune 6, 2026

    एक गृहस्थ पाठदुखीसाठी ओपीडीत आले होते, खिशावरच्या बिल्ल्यावरनं ते रिक्षाचालक असल्याचं लक्षात आलं, लक्षणजन्य औषधं…

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026

    तीन तिगाडा काम बिगाडा…

    June 6, 2026

    …होई का असे तुलाच स्मरताना?

    June 6, 2026

    Dnyaneshwari : ऐसा जो भक्तु होये, तयाचें त्रिधातुक हें जैं जाये

    June 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 जून 2026

    June 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 320
    • अवांतर 189
    • आरोग्य 118
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 444
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 219
    • मैत्रीण 20
    • ललित 682
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026

    तीन तिगाडा काम बिगाडा…

    June 6, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.