आराधना जोशी
बाहेरील आवरणासाठी साहित्य
- बेसन – अर्धी वाटी
- ज्वारीचे पीठ – अर्धी वाटी
- बारीक रवा – पाव वाटी
- हळद – पाव टीस्पून
- तिखट – 1 टीस्पून
- चाट मसाला – 1 टीस्पून
- काळी मिरी पावडर – अर्धा टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
भाज्यांच्या मिश्रणासाठी साहित्य
- गाजर – 1 मध्यम
- कोबी – 1 वाटी
- हिरवा वाटाणा – अर्धी वाटी
- हिरवी सिमला मिरची – अर्धी वाटी
- लसूण – 2 पाकळ्या
- आलं – एक इंच
- कोथिंबीर – मूठभर
- तेल – टोस्ट भाजण्यापुरते
हेही वाचा – Recipe : वांग्याचे खानदेशी भरीत
चटणी साहित्य
- हिरवी मिरची – 1
- कांदा – अर्धा मध्यम आकाराचा
- कोथिंबीर – मूठभर
- पुदीन्याची पाने – कोथिंबीरीचा पाव भाग
- घट्ट दही – 2-3 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी
तयारीस लागणारा वेळ : 15 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे
एकूण वेळ : 25 मिनिटे
कृती
- एका बाऊलमध्ये आवरणासाठी वर दिलेल्या साहित्यातील पाणी वगळता इतर सर्व साहित्य एकत्र करा.
- आता यात लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवून घ्या. या पिठाचा आपण ब्रेड तयार करणार आहोत. त्यामुळे पीठ सहज पसरेल इतपत पाणी त्यात घाला. पण पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.
- आता हे मिश्रण थोडावेळ बाजूला ठेवा.
- चटणीसाठी दिलेले सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये त्याची चटणी वाटून घ्या.
- आता भाज्यांच्या साहित्यातील गाजर, कोबी व्हेज कटरमधून बारीक करून घ्या. मग त्यात मटार आणि चिरलेली सिमला मिरची घालून कटरमधून बारीक करून घ्या.
- आता या बारीक केलेल्या भाज्या भिजवून बाजूला ठेवलेल्या मिश्रणात घाला.
- बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला. सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
- आता गॅसवर चालणाऱ्या टोस्टरला एका बाजूने थोडेसे तेल लावा.
- या टोस्टरमध्ये वरील तयार केलेले मिश्रण घालून व्यवस्थित पसरवून घ्या.
- टोस्टर बंद करून दोन्ही बाजू गॅसवर नीट भाजून घ्या. याला साधारण 7 ते 8 मिनिटे लागतील. अर्थात, गॅसची आच आणि टोस्टरच्या जाडपणावर हा वेळ कमी जास्त होऊ शकतो.
- गरमागरम टोस्ट हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
- ब्रेडचा वापर न करता तयार होणारा हा व्हेज टोस्ट एकदा करून बघा.
विशेष आहार माहिती : शाकाहारी, लो कार्ब, मिलेट बेस
हेही वाचा – Recipe : ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा
टीप्स
- चटणीच्या साहित्यात साखर दिलेली नाही. पण आवडत असेल आणि साखर चालत असेल तर एक टीस्पून साखरही चटणी वाटताना घाला.
- इलेक्ट्रीक टोस्टरपेक्षा गॅसवर चालणाऱ्या टोस्टरमधील सॅण्डविच अधिक कुरकुरीत होते.
- टोस्टरला तेल लावल्यानंतर टोस्टचं मिश्रण घालण्याआधी थोडेसे तीळ घालून मग मिश्रण घालून, भाजून घेतले तर कॅल्शिअमचा थोडासा डोस सहज पूर्ण होईल.
- घरात व्हेजिटेबल कटर नसेल तर, सर्व भाज्या बारीक चिरून किंवा मिक्सर काढून घेऊ शकता.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.


