Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ‘आदर्श’ बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!
    मैत्रीण

    ‘आदर्श’ बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 4, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अबोल प्रतिभा, आदर्श प्रतिभा, प्रतिभावर आदर्शपणाचे ओझे, आनंदाला पारखी प्रतिभा, आयुष्याच्या ओझ्याखालील आनंद, आदर्श बनण्याचे ओझे, प्रतिभाची चिडचिड, प्रतिभाच्या मनाचा आक्रोश, प्रतिभाचे नीरस आयुष्य, प्रतिभाचे बेरंगी आयुष्य,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रेवती निलेश पांडे

    आज खिडकीतून लहान मुलांना रंगात न्हाऊन निघताना पाहिलं आणि मन थेट बालपणातल्या त्या गल्लीत गेलं… खरंच, धुळवडीची खरी मजा त्या निरागस वयातच होती. ते वयच मुळी ‘फुलपाखरी’ असतं… मुक्त, स्वच्छंदी आणि रंगीबिरंगी… लहानपणी होळीची खूप मजा होती, धुळवड तर अगदी पहाटेपासूनच सुरू व्हायची प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला बाहेर ओढायचं आणि सगळेच आपला रंग त्याला लावण्यासाठी तुटून पडायचे… आमच्या गल्लीत एक छोटी टाकी होती धुळवडीच्या दिवशी त्यातही रंग टाकायचो आणि प्रत्येकाला त्या टाकीत ढकलून द्यायचं… सगळा नुसता धिंगाणा! जसं जसं वय वाढत गेलं, तसं धुळवडीचं स्वरूप जरा सोफिस्टिकेटेड व्हायला लागलं आणि आता हा रंगाचा खेळ फक्त एक ‘छोट्या टिक्क्या’पर्यंत येऊन पोहोचला आहे…

    असो. पण आमच्या गल्लीतली ही होळी आठवताना मला धुळवडीच्या दिवशी अगदी लहानपणापासून कोरी-करकरीत राहिलेली प्रतिभा आठवते. तिच्याबरोबर आम्ही लहानपणी सुद्धा कधीच रंग खेळलो नाही. इतकंच काय, अगदी लहानपणापासून तिच्या अंगावर मी कधी रंगेबीरंगी कपडे सुद्धा बघितलेच नाहीत! ती म्हणायची, “बाबांना असेच ‘लाइट कलर्स’ आवडतात.” तिच्या आजीला, बाबांना आणि तिला स्वतःला कुठल्या गोष्टी आवडत नाहीत, याची एक भलीमोठी यादीच त्यांच्या घरात होती. तिला कधी आमच्याबरोबर स्नेहसंमेलनात किंवा गणेशोत्सवात नाचताना मी बघितलं नाही. ती आमच्याबरोबर कधी लगोरी, लंगडी वा फुगडी खेळलेली मला आठवत नाही!

    आम्ही शाळेत असताना ‘साइड फ्लिक्स’ची खूप फॅशन होती. मी आईकडे असा हेअरकट करण्यासाठी खूप हट्ट धरायचे, पण प्रतिभा मात्र केसांना नीट तेल लावून, चापून चुपून दोन वेण्या घालायची. आम्हा सगळ्या मैत्रिणींच्या घरच्यांसाठी प्रतिभा म्हणजे एक ‘आदर्श मुलगी’ होती. “बघा जरा प्रतिभाकडे, मुलीने असं असायला पाहिजे!” असे डायलॉग आम्ही अनेक वेळा ऐकले आहेत. प्रतिभाचा चेहरा अगदी कोऱ्या पाटीसारखा शांत होता. ती बोलायचीही फार कमी अगदी एखाद्या नवख्या व्यक्तीला मुकी वाटावी, इतकी कमी! आणि तेही अगदी हळू आवाजात. ‘स्मितहास्य’ काय असतं, हे खरंतर तिच्याकडे बघूनच कळायचं. त्याकाळी प्रतिभाचा औरा काही वेगळाच होता.

    हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!

    आता ती कशी आहे, काय करते… काही काही माहिती नाही. सोशल मीडियावर तर नाहीच आहे आणि ते अगदी अपेक्षित देखील आहे! पण अचानक काही दिवसांपूर्वी एक मैत्रीण भेटली, ती सांगत होती, प्रतिभा आणि ती एकाच सोसायटीत राहतात. प्रतिभाकडे बघितलं की, भीती वाटते म्हणत होती. ज्या चेहऱ्याकडे बघून एकेकाळी ‘स्मितहास्य’ काय असतं, हे समजायचं, आज तिथे फक्त कडवटपणा आहे. ती आता फक्त अबोल नाही, तर ‘विचित्र’ झाली आहे!

    गल्लीतली मुलं आता सायकल चालवताना पडली किंवा खेळताना ओरडली, की प्रतिभा खिडकीतून त्यांच्यावर ओरडते. “काय हे मुलांचे लाड? आमच्या काळी असं चालत नसायचं!” असं म्हणत ती समोरच्याच्या आनंदावर विरजण घालते. कुणातही तिला काही चांगले दिसत नाही!

    तिची ही चिडचिड म्हणजे खरं तर तिच्या अतृप्त मनाचा आक्रोश आहे, असं मला वाटतं. तिने आयुष्यभर इतरांच्या आवडीनिवडी जपल्या — बाबांचे हलके रंग, आजीची शिस्त यात मात्र स्वतःला ती शोधू शकली नाही. आज जेव्हा ती इतर मुलींना मनसोक्त हसताना, किंवा रंगात न्हाताना बघते, तेव्हा तिच्यातल्या त्या दबलेल्या ‘लहान प्रतिभा’ला खूप वेदना होतात! आयुष्यभर ‘आदर्श’ बनण्याच्या ओझ्याखाली तिचा नैसर्गिक आनंद दबला गेला.

    प्रतिभामुळे मला एक गोष्ट समजली मुलींना ‘आदर्श’ बनवण्यापेक्षा त्यांना ‘आनंदी’ बनवणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण वेळेत न जगलेले रंग, पुढे जाऊन आयुष्यात नीरस बेरंगी करून टाकतात…

    हेही वाचा – सारंग आणि चित्रा यांच्या नात्यातील धुसर छटा…


    एक अबोलीचं फूल

    लांब सडक केशसंभार कधी

    वाऱ्यासवे झुलला नाही

    तिच्या अंगणातील चाफा

    आषाढातही फुलला नाही

    तिच्या अकल्पित मौनाची

    कित्येकांना पडे भूल

    ती वेणीमध्ये माळायची

    अबोलीचे फूल

    शरदाचे चांदणे पांघरुन

    कधी अंगणात निजली नाही

    खिडकीतूनच पाहिला पाऊस

    कधी स्वच्छंद भिजली नाही

    कधी कुणाच्या बोलक्या डोळ्यांची

    अबोल भाषा उमगली नाही

    कोरड्या डोळ्यात तिच्या

    कधी भावकमले उमलली नाही

    अतिसंकोचल्या डोळ्यांना

    जणू बहराचे होते सोवळे

    वणव्यासम तिने जाळले

    अनेक ऋतू कोवळे

    अबोलीची फुले जपण्यात

    वर्षामागून वर्षे सरली

    मोहोर सारे कोमेजून गेले

    सुरकुत्यांची जाळी उरली

    सुकलेल्या फुलांचा ती आता

    हिशोब मांडत बसते

    अन बागेतल्या बहराशी

    उगीच भांडत असते…


    मोबाइल – 8552893399

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    May 28, 2026 मैत्रीण

    10 साल जवान कर दिया…

    May 11, 2026 मैत्रीण

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    By रेवती निलेश पांडेMay 28, 2026

    काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक विषय फार गाजत होता — राधा ही ऐतिहासिक व्यक्ती होती…

    10 साल जवान कर दिया…

    May 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026

    Bookshelf : ‘सेपियन’… वेगवेगळ्या कोनांतून घडते आपलेच दर्शन

    June 10, 2026

    Dnyaneshwari : जें चळे ना ढळे, सरे ना मैळे

    June 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 324
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 449
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 220
    • मैत्रीण 20
    • ललित 692
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.