Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू
    ललित

    रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू

    स्नेहा सुतारBy स्नेहा सुतारMay 23, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, श्री जुईली प्रेमकथा, श्री जुईली विरहकथा, श्री जुईची प्रेमकहाणी, श्रीसाठी जुईलीचे झुरणे, जुईलीच्या मनाची तळमळ, अस्वस्थ जुईली, जुईलीची मैत्रीण रेवती, रेवतीचा जुईलीसाठी प्लॅन, रेवती जुईली जाणार पुण्यात
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 15

    रेवतीने गाडी सुपरमार्केटकडे थांबवली. “आलेच मी, इथेच थांब…” म्हणून तिने गाडी लावली आणि जुईलीला तिथेच थांबायला सांगून ती आत गेली. पाचेक मिनिटात परतली सुद्धा. हातातली कापडी पिशवी तिने गाडीत टाकली आणि गाडीवर बसून गाडी स्टार्ट केली.

    “बस चल पटकन…” म्हणून जुईली गाडीवर बसताच रेवती निघाली. “जुये, अगं तुला आता सुट्ट्या लागल्या ना दिवाळीच्या, की जरा पणजीत जाऊन येऊयात. लॅपटॉप दुरुस्तीला टाकूयात. जास्त काम नसेल, पण दुरुस्त होईपर्यंत आपण फिरून येऊयात कुठेतरी. नाहीतर मॉलमध्ये जाऊया.”

    “हं…”

    “नुसती हं हं करत रहा गो बाई जुई… बरं वाटतं मला. नाहीतर सायलंट मोडवर टाकल्यासारखं तुला.”

    “ही काय, बोलतेय ना!”

    “नको गोss नको बोलूस. बिल येईल तुला. माणसाने कसं शांतच राहावं. तुझा आदर्श घ्यावा. मी तर म्हणते संन्यास घ्यावा तू. कुठेतरी टेकडीवर जाऊन तापश्चर्या करावीस. म्हणजे कसं, तुझ्या पुण्याईने माझं तरी भलं होईल. तपश्चर्या करताना मात्र सांग देवाला, हे जे काही मी करते हिच्यासाठी ते सुद्धा जरासं राखून आहे म्हणून; नाहीतर लाटशील सगळं पुण्य स्वतःच! म्हणजे तू बघ आता फुल्ल त्या मोडमध्येच आहेस. शांत… तर त्यात उरकून घे काय ती तपश्चर्या तुझी.” रेवतीची अखंड बडबड सुरू असताना गाडी कधी कट्ट्यावर येऊन पोहोचली हे त्यांचं त्यांना कळलं नाही. गाडी थांबताच जुईली उतरली आणि गाडी स्टॅन्डला लावून, डीकीतली पिशवी घेऊन रेवती जुईलीच्या मागोमाग आली.

    संध्याकाळची वेळ असल्यामुळे गार वारा वाहत होता. त्या टेकडीवरचं छोटंसं मंदिर अगरबत्तीच्या वासाने नुसतं घमघमत होतं. जुईली आणि रेवती आधी मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करून आल्या. मंदिर टेकडीच्या टोकाला होतं. मंदिराबाहेर एक झाड होतं. त्या झाडाच्या बुंध्याला लागून संरक्षक भिंत होती आणि त्या भिंतीच्या पलीकडे दरी. तिथेच भिंतीला लागून बसण्यासाठी मोठा कट्टा केलेला होता. त्या कट्ट्यावर बसून मागे पाहिलं की टेकडीच्या पायथ्यापाशी असलेला पूर्ण गाव तिथून दिसायचा. त्या गावाच्या पलीकडे डोंगररांगा. किती सुंदर जागा होती ती! जुईली आणि रेवती अधून मधून इथे येत. कितीतरी वेळ कट्ट्यावर बसत. कित्तीतरी बोलत बसत. कितीतरी सूर्यास्त त्यांनी इथे बसून पाहिले होते. टेकडीवरचे देऊळ असल्यामुळे इथे जास्त कोणी येत जात नसत. क्वचित एखादं कुणी जवळच्या गावातलं यायचं आणि अगरबत्ती, दिवा लावून जायचं. त्यामुळे आवारात पूर्ण शांतता. आज मात्र कुठून तरी बारीक लाऊड स्पीकर ऐकू येत होता. स्पीकरवर अजित कडकडेंची गाणी लागलेली. कदाचित कसला तरी उत्सव असावा किंवा पूजा असावी जवळपास.

    हेही वाचा – वाढत चाललेला गुंता अन्…

    जुईली आणि रेवती येऊन कट्ट्यावर बसले. आता ऊन सौम्य झालं तरी कट्ट्याची फरशी अजूनही उबदार वाटत होती.

    “किती दिवसांनी आलो नव्हे आपण इथे?” रेवतीने जुईलीला म्हटलं. जुईलीने पुन्हा नुसतं ‘हं’ केलं.

    “चल तुला एक गंम्मत दाखवते.” रेवतीने पिशवी उघडली आणि त्यातून तिने दोन मोठ्ठाल्या सिल्कच्या कॅडबऱ्या काढल्या. सोबत हर्षेजचे दोन चॉकलेट शेक. “हा बघ आपल्या दुःखावरचा जालीम उपाय.” जुईलीच्या पुढ्यात सगळं नाचवून रेवती म्हणाली. “मी हल्लीच कुठेतरी वाचलं, चॉकलेट म्हणे आपलं स्ट्रेस कमी करतं. म्हणून हा उपाय… घे सुरू कर.” सिल्कचं व्रॅपर काढून तिने एक चॉकलेट जुईलीच्या हातात दिलं.

    जुईलीला हसूच आलं. काय येडंय हे रेवू! जुईली हसल्याबरोबर रेवतीने टाळीच वाजवली. “बघ, बोला था ना… चॉकलेट हातात घेतल्याबरोबर स्ट्रेस बारीकसं उडून गेलेलं बघितलं मी आत्ता.” जुईलीला अजूनच हसू आलं.

    जुईली जरा सैलावली. दोघी कट्ट्यावर बसून चॉकलेट खात गप्पा गोष्टी करू लागल्या.

    “बरं तर आता मला सांग जुये, तुला ताप आला की, तू काय करते? उपाय करतेस, गोळ्या, औषधं, डॉक्टर करतेस की, अशीच बसून राहतेस?” रेवतीने विचारलं.

    “काही पण काय… गोळ्या घेते. नाही कमी झालं तर मग डॉक्टर.”

    “मग आता हे जे तुझं चाललंय त्याच्यावर उपाय काय? स्वतःला हरवून बसणारेस?”

    “रेवू मला कळतंय गं सगळं… कळतंय पण वळत नाही, असं झालंय पण माझं!”

    “अगं जुये, यात काय वळायचं… सोप्पं आहे. माझ्याकडे आहे एक उपाय… म्हणतेस तर सांगेन.”

    “सांग ना यार… मी काय करू सांग. मला सुचत नाही गं काही. मॅड व्हायला आलेय मी असं वाटतं एकेकदा.”

    “गप गं! झालीस सुरू? जुये तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार… मग तू काय करणारेस आयुष्यासाठी तुझ्या? तुला तो हवाय? तर मग जा त्याला कॉलरला धरून घेऊन ये, नाहीतर मग विसरून तरी जा त्याला.”

    “अगं रेवती एवढं सोपं आहे का हे दोन्ही?”

    “नाहीये? तू प्रयत्न केलायस?”

    “किती मेसेजेस केले, फोन केले. नाही ना तो उचलत किंवा रिप्लाय देत…”

    “आणि तू जर समोर गेलीस तर? काय होईल?”

    “समोर? म्हणजे? तो आलाय गोव्यात?”

    “तोच का यावा गोव्यात? तुला जाता येत नाही त्याच्याकडे?”

    “अगं पण कसं… असं उठले आणि सुटले थोडीच…”

    “मैं हूं ना… तू टेन्शन मत ले भिडू!”

    “म्हणजे? कोड्यात नको गं बोलू रेवते… नीट सांग काय ते.”

    “ऑग्गं माझी घाईजुली. कित्ती ते…”

    “आता सांगतेस की देऊ एक?”

    “अगं जुये… आपण जायचं. पुण्याला.”

    “काय? खरंच?”

    “हो! आपण जायचं. त्याच्याकडे जायचं आणि त्याला भेटून जाब विचारायचा.”

    “अगं पण…”

    “पण आणलीस मधे तर हे जमणार नाहीच. उठायचं आणि सुटायचं आता. काकीला सांग माझ्यासोबत चाललीस युनिव्हरसिटीत, काम आहे मला. एकटी जायला नकोय म्हणून मी तुला बोलावतेय म्हणून सांग. माझं काम आहेच गं… पण आपण हेही करून येऊ…”

    हेही वाचा – सदाफुली… पण विरहात मलूल झालेली!

    जुईलीचा चेहरा खुलला… रेवतीने कट्ट्यावर शेजारी ठेवलेला हर्षेजचा बॉक्स तिने स्वतःच उचलला. स्ट्रॉ आत सरकवून तिने एकेक घोट घेत रेवतीचं सगळं ऐकून घेतलं. मग हसून तिने रेवतीकडे बघितलं आणि म्हणाली, “वैसे… आयडिया बुरा तो नहीं है!”

    आणि दोघीही खुदकन हसल्या. पलीकडे सूर्य अस्ताला जात होता… दुरून चाललेल्या लाऊडस्पीकरवर आता लता दिदींचे स्वर ऐकू येत होते…

    हाचि नेम आता…

    न फिरे माघारी…

    क्रमश:
    स्नेहा सुतार

    Related Posts

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026 ललित

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026 ललित

    ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली…

    May 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    By मधुर सुनील कुलकर्णीMay 23, 2026

    मी स्कूटर पार्क केली आणि बिल्डिंगच्या लिफ्टपाशी आले. लिफ्ट वर गेली होती आणि दहाचा आकडा…

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026

    ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली…

    May 22, 2026

    मन माऊली सकळांची…

    May 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026

    रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू

    May 23, 2026

    Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें

    May 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 मे 2026

    May 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 306
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 428
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 646
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026
    Most Popular

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.