Tuesday, July 1, 2025
Homeअवांतरआयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याकरिता आवश्यक माहिती

आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याकरिता आवश्यक माहिती

सीए रसिका महाबळ

परिचय

भारत सरकार दरवर्षी नागरिकांकडून प्रत्यक्ष कर (आयकर – Income Tax) स्वरुपात उत्पन्नाचा एक भाग गोळा करते, ज्याचा वापर सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी होतो. करदात्यांनी स्वतःहून आपली आर्थिक माहिती सरकारला सादर करावी, यासाठी ‘आयकर विवरणपत्र/ इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)’ हे माध्यम आहे. प्रथमच रिटर्न भरणाऱ्यांना प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची वाटू शकते, म्हणूनच हा लेख त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर आहे.

आयकर विवरणपत्र/ इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय?

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हा एक फॉर्म आहे, ज्याद्वारे आपण आपल्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आयकर/ इन्कम टॅक्स विभागाला सादर करता. यात वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती, खर्च, सूट (exemptions), वजावट (deductions), कर आणि अधिभार भरण्याची माहिती दिली जाते.

कोणाला रिटर्न भरावे लागते?

खालील व्यक्तींनी ITR भरणे अनिवार्य आहे:

  1. ज्या व्यक्तींचे सर्व स्रोतांद्वारे (from all the sources) एकूण वार्षिक उत्पन्न खालील मर्यादेपेक्षा जास्त आहे, जुन्या करप्रणाली (Old tax regime) अंतर्गत
  • ₹ 2.5 लाख (60 वर्षांखालील)
  • ₹ 3 लाख (60-80 वयोगटातील)
  • ₹ 5 लाख (80 वर्षांवरील)
  1. ज्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न खालील मर्यादेपेक्षा जास्त आहे, नवीन करप्रणाली (New tax regime) अंतर्गत

₹ 3 लाख (वयाच्या मर्यादेची अट लागू नाही)

  1. जर TDS / TCS कापला गेला असेल.
  2. जर परदेशी जायचं असेल तर/ पासपोर्ट/ व्हिसा एप्लिकेशन करायचे असेल
  3. व्यवसाय किंवा व्यवसायात नफा/ तोटा झाला असेल.
  4. रिफंड मिळवायचा असेल तरीही ITR आवश्यक आहे.
  5. ज्यांना कर्जासाठी (loan)/ टेंडरसाठी अर्ज करायचा असेल

हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान

रिटर्न भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पॅनकार्ड
  • आधारकार्ड
  • आधार आणि पॅनकार्ड लिंक पाहिजे (आयकर कायद्याखाली)
  • ई-मेल आयडी
  • मोबाइल नंबर
  • बँक स्टेटमेंट
  • फॉर्म 16 (नोकरी करणाऱ्यांसाठी)
  • फॉर्म 26AS / Annual Information Statement (AIS)/ Tax Payer Information Summary (TIS) (TDS तपासणीसाठी)
  • इतर उत्पन्नाचे पुरावे (भाडे, व्याज, भांडवली नफा इत्यादी)
  • सूट मिळण्यासाठी 80C ते 80U अंतर्गत पुरावे
  • व्यावसायिक उत्पन्नासाठी खात्यांची माहिती (Profit and Loss/ Balance sheet)

उत्पन्नाचे 5 प्रमुख प्रकार (5 Heads of Income)

  1. पगार (Salaries)/ निवृत्तीवेतन (Pension)
  2. घर, सदनिका या मालमत्तेद्वारे उत्त्पन्न (Income from House Property – Rental income)
  3. पेशा/ व्यवसायातील नफा/ तोटा (Profits and Gains from Business or Profession)
  4. भांडवली नफा, मालमत्तेच्या विक्रीतून झालेला नफा/ तोटा (Capital Gains/ loss)
  5. इतर उत्पन्न – व्याज, बक्षीस, डिव्हिडंड (Income from Other Sources)

हेही वाचा – Skin Care : त्वचा आणि तिचे प्रकार

ITR फॉर्मचे प्रकार (ITR-1 ते ITR-7)

  • ITR-1 (SAHAJ) : भारतीय निवासी, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹ 50 लाखांपर्यंत – पगार, घरभाडे (हाऊस प्रॉपर्टी), व्याज, डिव्हिडंड
  • ITR-2 : वार्षिक उत्पन्न ₹ 50 लाखांपेक्षा जास्त- भांडवली नफा (capital gain/ loss), परदेशी उत्पन्न, अनेक मालमत्ता, crypto income (if reported as capital gain)
  • ITR-3 : ITR 2 चे सगळे उत्पन्न, व्यवसाय/ प्रोफेशन उत्पन्न (non-presumptive), पार्टनर ऑफ फर्म, crypto income (if reported as business income)
  • ITR-4 (SUGAM) : भारतीय निवासी आणि एचयूएफ (HUF)- ITR 1चे सगळे उत्पन्न, Presumptive income
  • ITR-5 : LLP, Partnership Firm, AOP/ BOI
  • ITR-6 : कंपन्यांसाठी (Section 11ला लागू नसलेले)
  • ITR-7 : Trusts, NGOs (section 139(4A) to 139(4D))

जुनी आणि नवीन करप्रणाली (Old Vs New Regime)

जुनी प्रणाली (Old Regime) :

  • वजावट (deductions) उपलब्ध (80C (LIC, PPF), 80D (Mediclaim), 80E (education loan interest) इत्यादी)
  • सॅलरी हेडमध्ये standard deduction ₹ 50,000
  • कर दर थोडेसे अधिक

नवीन प्रणाली (New regime) :

  • बहुतांश वजावटी (deduction) रद्द; (फक्त section 80CCD(2), 80JJAA, 80CCH(2)च्या अंतर्गत असणाऱ्या वजावट मिळतात)
  • सॅलरी हेडमध्ये standard deduction ₹ 75000/-
  • सुलभ आणि कमी करदर

नवीन करप्रणाली (New tax regime – under section 115BAC) 01 एप्रिल 2023पासून ही ‘default’ प्रणाली आहे.

तर जुनी करप्रणाली (old tax regime) घ्यायची असेल तर फॉर्म 10-IEA भरावा लागतो रिटर्न फायलिंगच्या आधी

FY 2024-25साठी कर स्लॅब

नवीन करप्रणाली (New tax regime) – वयाच्या मर्यादेची अट लागू नाही –

ITR भरण्याच्या अंतिम तारखा (FY 2024-25साठी)

निष्कर्ष :

प्रथमच ITR भरताना योग्य फॉर्म निवडणे, उत्पन्नाचे प्रकार समजून घेणे आणि सवलतींचा, वाजवटींचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण स्वत: रिटर्न भरू शकता किंवा तज्ज्ञ सल्लागाराची (Chartered Accountant) मदत घेऊ शकता. वेळेत आणि योग्य पद्धतीने रिटर्न भरल्यास दंड टाळता येतो, तसेच भविष्य काळात आर्थिक व्यवहार करताना (जसे की व्हिसा, कर्ज, क्रेडिटकार्ड घेताना) उपयोग होतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!