Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » तो भेटलाच नसता तर…
    ललित

    तो भेटलाच नसता तर…

    सुरेखा मोंडकरBy सुरेखा मोंडकरSeptember 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सुरेखा मोंडकर, लेखिका सुरेखा मोंडकर, त्याचे अचानक भेटणे, एकतर्फी प्रेम, तरुणपणातील प्रेम, अव्यक्त प्रेम, तिला गृहित धरणे, तरुण विधवेची व्यथा, प्रेमात अविवाहित,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    खूप दिवसांनी… नाही… खूप वर्षांनी तो दिसला. गोरापान, बळकट शरीर, घनदाट केसांनी कपाळावरून थोडीशी माघार घेतलेली. तांबूस तपकिरी मऊशार केसात काही रुपेरी-चंदेरी तारा सैरभैर झाल्या होत्या. नाकावर सोनेरी काड्यांचा चष्मा स्थिरावला होता. एवढाच काय तो फरक! देखणा तसाच, लवभर कमी नाही. प्रौढपणी शशी कपूर दिसायचा तसाच दिसत होता.

    तो तिच्याकडेच बघत होता. चेहऱ्यावर ओळख नव्हती. तोच आहे ना? की त्याच्यासारखा दिसणारा दुसरा कोणी? पुढे निघून जावं का? की विचारावं त्याला? आधीच वीस एक वर्षांनी दिसतोय. आजचा क्षण गमावला तर कोण जाणे पुन्हा भेटेल की नाही?

    जुन्या घरात त्यांच्या दोन्ही कुटुंबांचा दाट घरोबा. एकमेकांकडे जाणं येणं. जेवणं खाणं. तिची मुलं तर त्याच्या अंगाखांद्यावर लोळायची. वयाने मोठा असला तरी, मित्र होता तो त्यांचा… एक जबाबदार मित्र! अनेकवेळा मोठ्या विश्वासाने त्याच्यावर मुलं सोपवून ती आपलं एखादं काम पटकन करून यायची. त्या काळात अचानक अनेक जबाबदाऱ्या अंगावर कोसळल्यावर  तिला त्याचा अबोल विनाअट निश्चित आधार बहुमोल वाटायचा…

    हेही वाचा – माणूस नावाचं रसायन!

    घर बदलल्यावर काही दिवस संपर्क राहिला. तो तर नव्या घरात कधी आलाच नाही. कधी चुकूनही भेटला नाही. तिच्या कुटुंबावर जीव लावला होता त्याने… इतकं असूनही मुलांना कसा भेटला नाही? असा कसा विसरला? तिला अचंबा वाटायचा. हळूहळू जनरहाटीप्रमाणे अंतर पडत गेलं. वेगळ्या मार्गांवर वेगळी कामं… वेगळे परिवार… वेगळे सवंगडी… आयुष्य बेफाम धावत सुटलं…

    आजची संधी सोडायची नाही. ती पुढे झाली… जवळ गेली. आता त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू उमललं, ते पण माफक… पूर्वीसारखं खळखळून नाही.

    “ओळखलंस? की विसरलास?”

    “विसरेन कसा?”  तिच्या डोक्यावरून पलीकडे कुठेतरी दूरवर पहात तो म्हणाला.

    “कोणी यायचंय का? वाट पाहातोहेस का कुणाची?”

    “चक्! वाट पाहून थकलो.”

    संभाषण पुढे सरकत नव्हतं. एवढ्या वर्षांनी भेटल्यावर एकदम अचानक विषय तरी कसे सुचणार? जरा निवांतपणा हवा.

    “घाईत नाहीस ना? वेळ आहे का तुला? बसूया कुठेतरी?”

    तिला वाटलं होतं, कुठेतरी चहा-कॉफी घेत थोड्या गप्पा मारूया. जरा हाल-हवाल विचारूया. तो समोरच्या सार्वजनिक बागेकडे वळला. एका सिमेंटच्या बाकावर ती बसली. तो अंतर राखून अगदी एका टोकाला बसला…

    संवाद होत नव्हता. सगळं ठप्प झालं होतं.

    एका क्षणाला तिला वाटलं जाऊदे, उठून जाऊया. इतक्या वर्षांनी काही मृदू उरलं नाहीये… तेव्हा किती बोलका होता. न थांबता अखंड बडबड! ऐन विशीत होता तेव्हा. वाढत्या वयाने, अनुभवांनी, परिस्थितीने बरंच काही शिकवलेलं दिसतंय. अबोल गंभीर झाला होता.

    “आता सांग, आई-बाबा कसे आहेत? कुठे असतात? तू कुठे असतोस? बायको काय करते?”

    अजुनही तो मोकळा झाला नव्हता. तिच्याकडे न बघता आरपार कुठेतरी पहात म्हणाला,

    “चेन्नईला असतो. आईबाबा माझ्याकडेच असतात. लग्न नाही केलं.”

    विचारलेल्या प्रश्नांना थोडक्यात जेवढ्यास तेवढी उत्तरं! काही सांगितलं नाही असं नाही आणि सर्व सांगितलं असं पण नाही!!

    मध्यंतरी उडत उडत तिच्या कानावर आलं होतं – त्याचं प्रेम होतं एकीवर, पण त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता, म्हणून सगळ्या जगापासून तो तुटत गेला होता.

    नकळतपणे तिच्या तोंडून गेलं, “का रे, लग्न का नाही केलंस?”

    “खरंच तुम्हाला माहिती नाही?”

    आता प्रथमच त्याने तिच्याकडे पाहिलं. नजरेला नजर भिडवली. तिने प्रश्नार्थक चेहरा केला. थोडावेळ तो घुटमळला… बेचैन झाला. त्यालाही तो क्षण गमवायचा नव्हता. सर्व शक्ती एकवटल्यासारखा मोठ्ठा श्वास घेऊन म्हणाला,

    “मला तुम्ही हव्या होता. माझं तुमच्यावर प्रेम होतं… आहे! का नाही तुम्ही माझ्यावर प्रेम केलं? का नाही लग्नाला तयार झालात?”

    हा वेडा आहे का? किती वाह्यात बोलतोय… बेताल… तिला कड्यावरून खोल खोल दरीत गटांगळ्या खाल्यासारखं झालं. पोटात खड्डा पडला. हातापायाला कापरं भरलं. बर्फाची शिरशिरी सबंध शरीरभर पसरली.

    तो आवडायचा तिला… एक सच्छील प्रामाणिक, मेहनती, प्रेमळ, सरळमार्गी मुलगा म्हणून! त्या संकटांच्या काळात त्याचा आधारही वाटायचा. त्याच्याबद्दल कोणत्याही हळव्या नाजूक भावना कधी तिच्या मनात निर्माण झाल्या नव्हत्या. एक चांगला शेजारी… मुलांचा ज्येष्ठ मित्र… एवढंच तिला वाटायचं. नात्याचं कोणतंही नाव नव्हतं. त्याच्या आईवडिलांना माहिती असेल आपल्या मुलाच्या मनात काय चाललंय ते?

    नकळत अनावधानाने आपल्याकडून त्याला तसे काही चुकीचे संदेश तर नाही गेले? आपण सावध नव्हतो का? आपल्या मोकळेपणामुळे, पारदर्शी स्वभावामुळे त्याचा गैरसमज तर नाही झाला? त्याच्या भावना आपल्याला आधी कशा लक्षात नाही आल्या? आपण आपलंच दु:ख गोंजारण्यात मग्न होतो… तेव्हाच लक्षात आलं असतं तर, त्याच्या भावना, विचार सुस्पष्ट करायला काहीतरी प्रयत्न केला असता.

    ती गोठून गेली होती. काय बोलावं तिला समजत नव्हतं. त्याच्या भावनांचा अपमान करावासा पण वाटत नव्हतं. त्याची नजर पुन्हा शून्यात गेली… दृष्टीहीन झाली. तो कुठेतरी बघत होता आणि कुठेच बघत नव्हता. भूतकाळात डोकावत होता का?

    आपली दुखावलेली नजर गोळा करून त्याने पुन्हा तिच्यावर रोखली…

    “तुम्ही एकट्या कशा दोन मुलांना वाढवणार होता? मला चांगली नोकरी तर लागणारच होती. तुमच्यावर कोणताही आर्थिक भार पडणार नव्हता. का नाही थोडा पुढाकार घेतलात? का नाही मला दिलासा दिलात? आता पण दोन्ही मुलं परदेशी. एकट्याच ना तुम्ही इथे? तुमचं आणि माझं पण आयुष्य वैराण… ते फुलवणं शक्य होतं!”

    हेही वाचा – वाकडं बोट

    ती भानावर आली होती, पण अजूनही धक्का ओसरला नव्हता. बोलण्याची थोडीफार स्थिती आली होती. किती गोष्टी हा गृहीत धरतोय! त्याची इच्छा म्हणजेच सर्व?  तिच्या इच्छेला काहीच किंमत नव्हती?

    “चूप, एकदम चूप! आपल्या वयात किती अंतर आहे, ह्याचं जरातरी भान ठेव!”

    “असा वयातील फरक कितीतरी जणांमध्ये असतो. चित्रकार देऊस्कर, दिलीपकुमार, मिलिंद सोमण, अनुप जलोटा… वीस-पंचवीस वर्षांचं अंतर असूनही झालीच न त्यांची लग्नं? संसार?”

    “या सर्व जोड्यांमध्ये दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. नवरा बायकोपेक्षा वयाने मोठा आहे. इथे मी, एक स्त्री तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे.”

    “बायको मोठी असलेली उदाहरणं पण सांगतो…”

    “नको!”

    त्याच्याशी बोलणं व्यर्थ होतं. ती उठून उभी राहिली. हे त्याचे विचार तेव्हांच कळले असते, तर कदाचित त्याला तेव्हाच समज देता आली असती. प्रेम एकतर्फी असून चालत नाही, दोन्ही बाजूंनी असावं लागतं. तिच्या मनात तर अजूनही, कोणाही बद्दल नाजूक भावना उमलल्या नव्हत्या. त्याच्या बद्दलही नाहीत… मनातले विचार उघडेबंब नसतात, हे किती बरं आहे!

    पर्स खांद्याला लटकावून ती वळली. निरोप घ्यायला पण थांबली नाही. इतकी वर्षं त्याचं नखही दिसलं नव्हतं. आता तरी का भेटला? भेटायलाच नको होता.

    तो लक्ष ठेवून होता का? तिला जी भेट सहज वाटत होती, ती त्याने प्रयत्नपूर्वक घडवून तर आणलेली नव्हती? आयुष्य चांगलं चाललं होतं, एकटेपणाचे ताणेबाणे सोसायला ती इतक्या वर्षांत शिकली होती. या वावटळीला ती कसं तोंड देणार होती?

    एकीने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नव्हता, ही केवळ हुल नव्हती!

    ‘ती’ कोण होती, ते तिला कळलं होतं… पूर्ण उद्ध्वस्त झाली होती ती!

    Avatar photo
    सुरेखा मोंडकर

    लेखिका सुरेखा मोंडकर या M A, B Ed, माजी मुख्याध्यापिका (मराठी माध्यम हायस्कूल) आहेत. याशिवाय, समाजकार्यकर्ती, Rotarian, आकाशवाणी कलाकार, हौशी नाट्यकर्मी (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), कथाकथनकार, समुपदेशक (मानसशास्त्र), निसर्ग/ बागप्रेमी, यूट्यूबर आणि दोन इंजिनीअरिंग कंपनीच्या संचालिका देखील आहेत.

    Related Posts

    नकारातून साकार

    September 29, 2026 ललित

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026 ललित

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    नकारातून साकार

    By दिलीप कजगांवकरSeptember 29, 2026

    राजने आई-बाबांना शिवाजीनगर बसस्थानकावर लाल परीमध्ये बसवलं आणि तो घरी परतला. घरी येताना त्याच्या मनात…

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026

    मॅग्नोलिया

    September 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026

    तो भेटलाच नसता तर…

    September 29, 2026

    केतू… आपला आतला आवाज

    September 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अनादि जे मुक्तता, आपुली असे पंडुसुता

    September 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 453
    • अवांतर 214
    • आरोग्य 152
    • पंचांग आणि भविष्य 605
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 958
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.