Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, November 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » हायकू…थोडक्यात पण बरंच काही!
    ललित

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    रेवती निलेश पांडेBy रेवती निलेश पांडेNovember 19, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी साहित्य, अभिजात मराठी, रेवती पांडे, लेखिका रेवती पांडे, हायकू, कवी निलेश कवडे, तितिक्षा, काव्यसंग्रह
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    एखाद्या लेखकासाठी त्याचं पुस्तक हे त्याचं अपत्यच असतं. सृजनाचा तो एक सुंदर आविष्कार असतो. एखाद्या लेखकाकडून त्याचं पुस्तक मिळावं, विशेषतः कविता संग्रह मिळावा, यासारखा दुसरा आनंद नाही. एखादी व्यक्ती आपल्या अपत्याची ओळख ज्या कौतुकाने करून देते, त्याच आत्मीयतेने लेखकही आपल्या पुस्तकाची ओळख करून देत असतो. नुकताच श्री. निलेश कवडे सर यांच्याकडून त्यांचा नवप्रकाशित ‘तितिक्षा’ हा काव्यसंग्रह प्राप्त झाला आणि सवयीप्रमाणे त्याचं पारायण सुरू झालं.

    ‘तितिक्षा’ हा शब्दच मुळात अर्थगर्भ आहे. सुख-दुःख, अनुकूल-प्रतिकूल परिस्थिती यांचा शांतपणे स्वीकार करण्याची आणि संकटांच्या काळातही मनाचा समतोल टिकवून ठेवण्याची क्षमता म्हणजे तितिक्षा. केवळ सहन करणं नव्हे, तर परिस्थितीने विचलित न होता धैर्याने तिचा सामना करणं,  हा या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. त्यामुळे संग्रहाचं शीर्षकच वाचकाला विचारप्रवृत्त करतं.

    काव्यसंग्रह सुंदर आहेच; परंतु मुक्तछंदात कविता लिहिणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला छंदोबद्ध कविता आणि गझल यांचे विशेष अप्रूप वाटते. निलेश कवडे सर हे मुळात गझलकार असल्याने त्यांच्या लेखनात भावनांची एक हळवी किनार जाणवते. या संग्रहातील मला विशेष भावलेला काव्यप्रकार म्हणजे हायकू.

    हेही वाचा – कोऽहम्?

    हायकू हा जपानी काव्यप्रकार. पारंपरिक हायकूची रचना तीन ओळींची असते. त्यात पहिल्या ओळीत पाच, दुसऱ्या ओळीत सात आणि तिसऱ्या ओळीत पुन्हा पाच अक्षरे असतात.

    या संग्रहातील मला सर्वाधिक भावलेला हायकू आहे,

    माझ्यापर्यंत

    पोहोचत नाहीत

    माझ्यासहित

    या हायकूतील शेवटचा ‘माझ्यासहित’ हा शब्द विशेष अर्थपूर्ण आहे. एखाद्या व्यक्तीचे विचार किंवा तिचं वागणं आपल्यापर्यंत पोहोचत नाही, हे समजण्यासारखं आहे. परंतु कवी इथे स्वतःलाही त्यात सामावून घेतो. माणसाला आयुष्यभर सोबत करणारी व्यक्ती म्हणजे तो स्वतःच;  तरीही अनेकदा स्वतःचे विचार, स्वतःचं वागणंही त्याला समजत नाही. आपण असं का वागलो, असा विचार आपल्या मनात का आला, याची उकल आपल्यालाच करता येत नाही. स्वतःला जाणून घेण्याच्या प्रवासात स्वतःच अनोळखी राहण्याचा हा विरोधाभास कवीने एका शब्दातून किती सहजपणे व्यक्त केला आहे!

    आणखी एक हायकू मनाला स्पर्शून जातो.

    आर्त आरोळी

    कवीला ऐकू आली

    कविता झाली

    दुःख प्रत्येकाच्याच वाट्याला येतं; मात्र प्रत्येकाची त्याला प्रतिसाद देण्याची पद्धत वेगळी असते. काही माणसं दुःखामुळे संवेदनाहीन होतात, तर काहींच्या जाणिवा अधिक तीव्र होतात. इतरांना जिथे केवळ एक घटना दिसते, तिथे कवीला त्या घटनेमागची वेदना ऐकू येते. एखाद्या मनाची आर्त हाक जेव्हा कवीच्या संवेदनशील मनापर्यंत पोहोचते, तेव्हा त्या वेदनेला शब्द मिळतात आणि त्यातून कविता जन्माला येते. आर्ततेचं कवितेत झालेले हे रूपांतर केवळ तीन ओळींत किती सुंदरपणे व्यक्त झाले आहे!

    आणखी एक रचना पाहा,

    इच्छांनी माझे

    जगणे कठीण झाले

    वाढले ओझे

    माणसाच्या इच्छा त्याला जगण्याची प्रेरणा देतात; पण त्याच इच्छा कधी जगण्याचे ओझे बनतात, हे कळतही नाही. अपेक्षा, आकांक्षा आणि त्या पूर्ण करण्याची धडपड यांत माणूस स्वतःचे सहज जगणेच हरवून बसतो. इच्छांच्या ओझ्याचं हे वास्तव किती साध्या शब्दांत व्यक्त केलं आहे!

    कॉमन मॅन.

    जणू सत्तेभोवती

    फिरता फॅन

    हा हायकूही असाच उपरोधिक आहे. सत्तेभोवती फिरणाऱ्या सामान्य माणसाचे स्थान आणि सत्तेच्या प्रभावाभोवती घुटमळणारी व्यवस्था यांचं चित्र या हायकूतून उभं राहतं.

    तर,

    झाला विकास

    डोंगर भुईसपाट

    पक्षी उजाड

    या हायकूतून विकासाच्या संकल्पनेवरच एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. विकासाच्या नावाखाली डोंगर सपाट केले जातात, वृक्षतोड होते आणि पक्ष्यांचे अधिवास नष्ट होतात. अलीकडे विकासकामांसाठी होणारी वृक्षतोड पाहिली की या तीन ओळी केवळ कविता राहत नाहीत, तर आपल्या भोवतालच्या वास्तवाचं विदारक चित्र बनतात.

    हेही वाचा – दोन हात मायेचे, दोन हात संरक्षणाचे

    आजच्या धावपळीच्या काळात एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवण्याचा कालावधी कमी होत चालला आहे. अशा काळात तीनच ओळींत एखादा गहन विचार, सूक्ष्म भावना किंवा आयुष्याचे एखादे वास्तव इतक्या प्रभावीपणे मांडणारा हायकू विशेष भावतो. शब्दांची संख्या कमी असली तरी आशयाची खोली किती मोठी असू शकते, याचा प्रत्यय या रचना देतात. हायकू म्हणजे खऱ्या अर्थाने थोडक्यात बरंच काही सांगण्याची कला!

    Avatar photo
    रेवती निलेश पांडे

    विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

    Related Posts

    अंजू

    November 18, 2026 ललित

    एका सल्ल्याने बदलले आयुष्य

    November 18, 2026 ललित

    मुखवटे

    November 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अंजू

    By डॉ. विवेक वैद्यNovember 18, 2026

    “अंजू, नाश्त्याचे आटोपले का सर्वांचे?” “अंजू, नवऱ्यामुलीचा मेकअप झाला का?” “अंजू, आज सकाळी दिलेलं रूखवताचं…

    एका सल्ल्याने बदलले आयुष्य

    November 18, 2026

    मुखवटे

    November 17, 2026

    भीतीचीही सवय होते!

    November 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी

    November 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 नोव्हेंबर 2026

    November 19, 2026

    अंजू

    November 18, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.