Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, November 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?
    अध्यात्म

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीNovember 19, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, स्थिरप्रज्ञ आणि स्थितप्रज्ञ, स्थिरप्रज्ञ, स्थितप्रज्ञ, अद्वैत, स्थिरप्रज्ञ लोकसंग्रह, जगाची सेवा ईश्वर सेवा, Sthitaprajna, Sthiraprajna, terminology of spirituality
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    जर हे संपूर्ण जग मायेने बनलेले आहे, तर या मायेचा जन्म कधी झाला? तिचा आरंभ कुठे आणि कसा झाला?

    अध्यात्म याचे उत्तर पोटतिडकीने देते. मायेचा आरंभ शोधू नये,  शोधणारा काळात अडकतो, मात्र  स्वतःचा आरंभ शोधणारा काळाच्या पलीकडे जातो. तो कालातीत होतो. कारण काळ, वेळ आणि अवकाश या संकल्पनाच मायेचा भाग आहेत. मायेच्याच मोजपट्टीने मायेचे मोजमाप करता येत नाही.

    जेव्हा आपण स्वतःच्या खऱ्या किंवा मूळ स्वरूपाचा, आत्मस्वरूपाचा शोध घेतो तेव्हा तो काळ आणि स्थळ यांच्या सर्व मर्यादा ओलांडून त्या अनंत परब्रह्माशी एकरूप होतो. स्वतःला जाणणे म्हणजे काळाच्या पलीकडे असलेल्या शाश्वत ईश्वरी तत्त्वाचा अनुभव घेणे होय.

    अनेकांना अशी भीती वाटते की, ही माया आपल्या खऱ्या स्वरूपाला, म्हणजेच परब्रह्माला डागाळेल किंवा नष्ट करेल. परंतु सत्य अगदी वेगळे आहे. माया कधीच ब्रह्माला स्पर्श करू शकत नाही. ती केवळ आपण हा देह आहोत या चुकीच्या कल्पनेलाच स्पर्श करते.

    आकाशात काळे ढग येतात. विजा चमकतात. मुसळधार पाऊस पडतो. परंतु त्या पावसाच्या एका थेंबानेही आकाश कधी ओले होत नाही. किंवा डागाळत तर मुळीच नाही. आकाश त्या ढगांमधला थोडासा भाग देखील अंगाला चिकटून घेत नाही. ‌आकाश सदैव अलिप्त आणि निर्विकार राहते.

    परब्रह्मही अगदी आकाशासारखेच आहे.

    माया केवळ देह आणि मनावर परिणाम करते. आपण स्वतःला हा नश्वर देह मानतो तेव्हाच मायेच्या जाळ्यात अडकतो. आपण स्वतःला त्या अथांग चैतन्यरूप आकाशाशी एकरूप मानतो तेव्हा मायेचे कोणतेही वादळ आपल्याला स्पर्श करू शकत नाही. शिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर मायेशी युद्ध करावे लागते किंवा तिला पराभूत करावे लागते, असा समजही चुकीचा आहे. निसर्गाकडे पाहिले तर प्रकाशाला अंधाराशी कधीच संघर्ष करावा लागत नाही. प्रकाश प्रकट झाला की अंधार आपोआप नाहीसा होतो.

    ब्रह्मज्ञान आणि माया यांचे नातेही अगदी असेच आहे. अंधार ही स्वतंत्र बाब किंवा वस्तू नसते. अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव असतो. अंधाऱ्या खोलीत दिवा लावला की,  अंधार खिडकीतून पळून जात नाही किंवा तो दिव्याशी युद्ध करत नाही. तो त्याच क्षणी संपून जातो. अंधार प्रकाशात विरघळतो असेही नाही. तो नाहीसा होतो. कारण त्या ठिकाणी प्रकाश जन्मलेला आहे. त्या ठिकाणी प्रकाश अवतरलेला आहे. ज्ञान आले की अज्ञान नाहीसे होते. अज्ञानाची जागा ज्ञान घेते असे नाही. तसेच अंतःकरणात आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित झाला की, अज्ञानाची आणि मायेची रात्र आपोआप संपते. तिथे संघर्ष राहत नाही. केवळ अखंड प्रकाश उरतो.

    याचा अर्थ जगातून माया कायमची नष्ट होते का?  तर तसाही अर्थ अजिबात नाही. मायेचा नाश होत नाही. नष्ट होतो तो तिच्याविषयीचा असलेला आपला गैरसमज.

    हेही वाचा – गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    ज्ञानी पुरुषालाही हे जग दिसते. निसर्ग दिसतो. माणसे दिसतात. व्यवहारही दिसतो. परंतु तो या दृश्य विश्वाला अंतिम सत्य मानत नाही. त्याला हे सर्व परमेश्वराची अद्भुत लीला वाटते. जसे नाटक पाहताना रंगमंचावरील प्रसंग वास्तव नाहीत हे माहीत असूनही आपण त्याचा आनंद घेतो, तसेच ज्ञानी पुरुष या मायेच्या खेळाकडे साक्षीभावाने पाहतो. तो त्यात सहभागी होतो, पण त्यात गुंतत नाही.

    रात्री गाढ झोपेत पडलेले स्वप्न खूपच खरे वाटते. त्या स्वप्नात आपण हसतो, रडतो, घाबरतो, धावतो. पण जागे झाल्यावर ते स्वप्न कुठे गेले असा प्रश्न कोणी विचारत नाही. कारण जागृती, वास्तवाची जाण हेच त्याचे उत्तर असते. ब्रह्मज्ञानही अगदी असेच असते. ते मायेचे स्पष्टीकरण देत बसत नाही. ते मायेचे स्थानच पूर्णपणे बदलून टाकते.

    यथा स्वप्ने जगद्भाति

    प्रबोधे नैव दृश्यते।

    तथा मायाकृतो भेदो

    ब्रह्मबोधे न विद्यते॥

    (गीताव्रत साधना)

    जसे स्वप्नामध्ये हे संपूर्ण जग खरे आणि जिवंत असल्याचा भास होतो, पण जागे झाल्यावर त्या स्वप्नाचा किंचितही मागमूस राहत नाही, तसेच मायेने निर्माण केलेले सर्व भेद, अनेकत्व आणि वेगळेपण खऱ्या ब्रह्मबोधानंतर पूर्णपणे विरघळून जाते.

    स्वप्नात आपण पाहिलेला गोष्टीतला राजा स्वतःला भिकारी समजून दुःख भोगत असेल, वेदनेने व्याकुळ होऊन रडत असेल. पण ते तो स्वप्नात असतानाच रडेल. तो जागे झाल्यावर तो त्या दुःखासाठी रडत बसणार नाही. कारण त्याला आपले खरे स्वरूप समजलेले असते.

    आपली स्थितीही अशीच आहे. संसाराच्या स्वप्नात आपण स्वतःला मर्यादित, असहाय आणि दुःखी मानतो. परंतु आत्मज्ञानाची जागृती होताच हे स्पष्ट दिसते की, आपण कधीच अपूर्ण नव्हतो. आपण साक्षात त्या अखंड परमानंदस्वरूप चैतन्याच्याच रूपाचे प्रकटीकरण आहोत. हे समजले की,  त्या एकाच क्षणात जन्मोजन्मीचे अज्ञान विलीन होते आणि उरते ते केवळ एक अखंड, अद्वैत चैतन्य. जिथे कोणताही भेद राहत नाही.

    हेही वाचा –  सुसंगती… साधनेचा सुंदर मार्ग

    “परब्रह्म शोधण्याची आवश्यकता नाही. शोध संपला की, जे उरते त्याला परब्रह्म म्हणतात.”

    मनुष्य आयुष्यभर कशाचा ना कशाचा शोध घेत असतो. मन सतत बाह्य जगाकडे धावत राहते. पण एक क्षण असा येतो की, हा अखंड चाललेला शोध थांबतो. मन शांत होते. विचारांची गर्दी विरते. त्या निःशब्द खोल शांततेत कोणतीही धावपळ उरत नाही. त्या वेळी जी अथांग, निर्विकार, प्रसन्न आणि स्वयंप्रकाशी शांतता अनुभवास येते, तीच साक्षात परब्रह्म होय.

    परब्रह्म हे आपल्या अस्तित्वाचेच मूलस्वरूप आहे. म्हणून काही मिळवायचे नसते. केवळ बाहेरचा शोध थांबवून प्रेमपूर्वक स्वतःमध्ये स्थिर व्हायचे असते. त्या स्थिरतेतच, अमात्र आणि कैवल्य स्थितीचा अनुभव येतो, तिथेच ब्रह्मानुभव प्रकट होतो.

    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी

    November 19, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि, मनुष्यत्वचि होय आदि

    November 18, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : माजीं वेदांचा पाला दाट, तो करी सुविद्येचा झडझडाट

    November 17, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी

    By Team AvaantarNovember 19, 2026

    अध्याय पंधरावा परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि, मनुष्यत्वचि होय आदि

    November 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माजीं वेदांचा पाला दाट, तो करी सुविद्येचा झडझडाट

    November 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उकलतेनि उन्मेखें, प्रज्ञाकुशलतेंची तिखें

    November 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी

    November 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 नोव्हेंबर 2026

    November 19, 2026

    अंजू

    November 18, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.