Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…
    ललित

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    शोभा भडकेBy शोभा भडकेApril 19, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, आरुची पाठवणी, सियाची पाठवणी, आरूने शिवला बाजूला केले, शिव आणि राममध्ये मैत्री,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    भाग – 23

    आरू रडत होती, सगळ्यांना दिसत होतं… रामने जवळ घेण्याची ती वाट पाहत होती आणि राम तिच्याकडे पाठ फिरवून उभा होता! आरूला रडताना पाहून शिवला रामचा रागच आला.

    “राम काय चाललंय? आरू रडतेय, बघा ना तिच्याकडे…” सिया रामला ऐकू जाईल अशा आवाजात त्याच्या जवळ जात म्हणाली.

    “दादा, सोड ना तुझा राग आता… थांबव ना तिला!” पवन पण त्याला समजावत म्हणाला.

    “ए पोरी बास कर की आता! आसं किती येळ रडणार हाईस… पोरी एक ना एक दिस सगळ्याच पोरींना सासरी जायलाच लागतं, रीतच हाय ती. त्यातून कोन बी नाय सुटलं. आता तुझं लगीन झालंय तर तुझं हे लहान लेकरागत वागणं सोडून दि… आता लई झालं… डोळं पुस ते!” कलावती तिच्या गालावरून हात फिरवत भरल्या डोळ्यांनी तिला समजावत म्हणाल्या.

    आता लेक आपल्यासाठी परकी होणार… जन्मल्यापासून, अगदी पोटात एक अंकूर निर्माण होतोय ही जाणीव जेव्हा होते ना, तेव्हापासून एका आईचं त्या बाळासोबत सगळ्यात पवित्र आणि अनमोल असं नातं निर्माण झालेल असते.

    एका आईसाठी मुलगा, मुलगी दोन्ही सारखेच असतात… असं आपण कितीही म्हणत असलो तरी, ही गोष्ट नाकारू शकत नाही – मुलगी झाली हे कळल्यापासूनच या गोष्टीची जाणीव झालेली असते की, एक दिवस ती पाखरासरखी उडून जाणार आहे… फरक तर असतोच!

    …आणि जेव्हा ती वेळ आलेली असते, त्यावेळी त्या आई आणि मुलासाठी ती वेळ खरंच कठीण असते. सध्या कलावती यांना आपल्या लेकीचे गुण आठवून आज राग येत नव्हता, रडू येत होतं… यापुढे ती त्यांना रोज उठल्यापासून झोपेपर्यंत त्रास देणार नव्हती… प्रत्येक गोष्टीवर त्यांच्यासोबत वाद घालणार नव्हती… सोबत काळजीही होती! तिने आता जबादारीने वागावं, म्हणून तिला समज देत होत्या…

    हेही वाचा – शिवने रामकडे काय कबुली दिली?

    इकडे सुधा यांचीही वेगळी अवस्था नव्हती. सिया सुधाजवळ जाऊन त्यांना बिलगून रडत होती. आपल्या लेकीच्या आयुष्यात आता तरी सुख आणि सुखच असावं, अशी मनोमन देवाला प्रार्थना करत होत्या.

    आरूचं मात्र अजूनही रामकडे पाहून रडणं सुरू होतं.

    “आई, लग्न झालं म्हणून माझ्यात काही फरक पडणार नाही… मी जशी आहे तशीच राहणार!” रडत रडत आरू आईला म्हणाली… आणि हे दाखवून दिलं – मी तुझ्यासोबत वाद घालणं काही सोडणार नाही!

    तिचं बोलणं ऐकून कलावती रडता रडताच खुदकन हसल्या आणि तिला मिठीत घेतलं. सखाराम भाऊ सुद्धा डोळे पुसत त्यांच्याजवळ आले… ते काही म्हणणार तोच लीला आजी कडक आवाजात म्हणाल्या, “पुरे आता, खूप झालं… आराधना,  तू आता सरपोतदार घराण्याची सून आहेस. तर, हे असं मोठमोठ्याने रडणं शोभत नाही. इथून पुढे घराण्याचा मान राखणं तुझी जबादारी आहे…”

    “…आणि आता पाठवणीची तयारी करा, सांजवेळेला नवीन सुनेचा गृहप्रवेश झाला पाहिजे.”

    आरूने लीला आजीचे धारधार शब्द ऐकून रडणं तर बंद केलं… आणि तिला याचीही जाणीव झालं की, तिचं लग्न झाल आहे आणि ती कितीही म्हणाली की, तिच्यात काही बदल होणार नाही. पण लग्नानंतर बदल तर होतोच ..

    रामने आपली नाराजी सोडलीच नाही… त्याने ना तिला जवळ घेतलं, ना तिच्याकडे पाहिलं… असं सगळ्यांना वाटत असलं तरी तसं नव्हतं… तो तिला दूर जाताना पाहूच शकत नव्हता. त्याच्यासाठी सगळं काही बदलणार होतं… लहानपणापासून ‘दादा दादा’ करत त्याच्या मागे फिरणारी… आई रागावली तर, तिच्यासोबत भांडून भांडून थकून, मग त्याच्या कुशीत शिरून स्फूंदत राहणारी… अंगणात इकडून तिकड बागडणारी… प्रत्येक गोष्टीची भूणभूण त्याच्या कानाशी येऊन करणारी… त्याची लहानगी आरू आता कधीतरीच त्याला भेटणार होती… उठलं की तिचा चेहरा आणि आवाज त्याला ऐकायला, पाहायला मिळणार नव्हता!

    त्याच्यासाठी हा प्रसंगच खूप कठीण होता. त्याने जर तिच्याकडे पहिलं असतं तर, तो स्वतःला रोखूच शकला नसता आणि त्याला रडताना पाहून आरूने काय केलं असतं, ते कोणी सांगूच शकत नाही! “मी माझ्या दादाला सोडून येणार नाही,” असं म्हणून ती अडून बसली असती, याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्याला तिच्यासमोर रडायचं नव्हतं, कमजोर पडायचं नव्हतं.

    मनात भावना उचंबळून आल्याने त्याचा कंठ दाटून आला होता… पण तो हाताच्या मुठी आवळून स्वतःला  कंट्रोल करत होता.

    ओटी भरण्यासाठी बायका आरू आणि सियाला आत घेऊन गेल्या. आता तिथे पवन आणि आकाश पाहुण्यांची जेवण वगैरे व्यवस्थित झाली की नाही, ते पाहायला गेले. शिवने आकाशला सांगितलं होतं की, रामने जरी लग्नाची सगळी जबादारी घेतली असली तरी, तूही त्यांना लागेल ती मदत कर. त्यामुळे त्याचा बॉस आहे, हे विसरुन तो पवनला मदत करत होता…

    पवनला कसंतरीच वाटत होतं… ज्यांच्या हाताखाली आपण ऑफिसमध्ये काम करतो, त्यांना कसं काम सांगायच?

    पण आकाशने आपल्या मोकळ्या स्वभावाने पवनला कम्फर्टेबल करत, मैत्रीचा हात पुढे केला. पवन तर आधी संकोचला, पण मग हसत हातात हात दिला… आणि आता दोघे खूप जुने मित्र असल्यासारखे वागत होते.

    000

    दिनकर राव एका ठिकाणी सोफ्यावर जाऊन बसले… सखाराम आणि आरूचे मामा बाकीची कामे बघायला गेली… आता तिथे फक्त राम आणि शिव उभे होते. राम त्याच्याच विचारात उभा होता, तोच त्याच्या खांद्यावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवला… तसं त्याने मागे वळून पाहिलं… तर, शिव त्याच्याकडे आश्वासक नजरेने पाहत होता… तो रामची अवस्था समजू शकत होता.  खरंतर, सध्या दोघांचं दुःख एकच प्रकारचं होतं. दोघांचंही आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम होतं, त्यांच्यासाठी… त्यांच्या सुखासाठी काहीही करायची तयारी होती.

    पण थोडा फरक होता, शिवला सियापासून दूर राहायची सवय होती, पण रामचं तसं नव्हतं! त्याने कधीच आरूला स्वतःपासून दूर केल नव्हतं! जेव्हा तो शिकायला पुण्याला होता, तेव्हाही तो आठ दिवसाला गावी जायचा आणि दिवसातून कितीतरी वेळा फोनवरून त्यांचं बोलण व्हायचं. तिला साधी सर्दी जरी झाली, तरी तो रात्र रात्र जागायचा तिच्या उशापाशी बसून असायचा… ” शिव,” राम त्याला बोलणारच होता की, शिवने रामला पुढे होऊन मिठी मारली आणि म्हणाला,

    “आरूच्या डोळ्यांत इथून पुढे पाणी येणार नाही, असा शब्द देतो तुम्हाला जिजू!” रामला आश्वस्त करत, पाठीवर थोपटून म्हणाला.

    रामनेही समाधानाने हासत, त्याच्या पाठीवर हात ठेवला…

    “थँक्यू शिव… विश्वास ठेवतोय तुझ्यावर; तो विश्वास तुटू देऊ नकोस… आणि हो, तू जे केलंस त्याची भनक् सुद्धा आरूला लागू देऊ नकोस….” राम त्याला सावध करत म्हणाला.

    रामचे शब्द ऐकून शिव झटक्यात बाजूला झाला आणि त्याच्याकडे पाहू लागला…

    “काय झालं? असं का बघतोयस?” रामने डोळे बारीक करून विचारलं.

    “जिजू… ते म्हणजे… आरुला माहीत आहे सगळं!” शिवने नजर न मिळवता अडखळत सांगितलं.

    “काय! कसं कळलं तिला? नाही ते शक्य नाही… तुझा गैरसमज झाला असेल…” राम अविश्वासाने त्याच्याकडे पाहून म्हणाला.

    “नाही… ते काल रात्री आपल बोलणं…” शिव बोलतच होता की, भावना आणि पूर्वी त्यांच्याजवळ आल्या.

    “जिजू, दादा तुम्हा दोघांना बोलावलंय चला पटकन…” दोघी सोबतच म्हणल्या आणि मग दोघी हसू लागल्या, राम आणि शिव पण हसले… आणि त्यांच्यासोबत गेले.

    इकडे दोघींची ओटी भरून झाली होती… शिव आणि राम आले तसं दोन्ही जोड्यांचं गठबंधन केलं गेलं. शिवकडून जास्त कोणी पाहुणे उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संबंधित लोकांपासून हे लग्न गुप्त ठेवलं गेलं होतं.  तसेच सगळी पाहुणे गावी असल्यामुळे त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं. म्हणून आरूच्या चुलत वहिनीने दोन्ही जोड्यांच गठबंधन केलं. त्यानंतर त्यांनी लग्नमंडपात मांडलेल्या गणेशमूर्तीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.

    हेही वाचा – शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    आता सगळे बाहेर आले होते… बाहेर दोन गाड्या सजल्या होत्या… पवनने त्याच्या मित्रांची फोर-व्हीलर आणली होती, राम आणि सियासाठी!

    सिया आणि आरू आपापल्या फॅमिलीजवळ गेल्या. सिया सुधाच्या समोर जात, त्यांना मिठी मरली. सुधाला पण आपल्या भावना रोखणं कठीण झाल होतं. वातावरण एकदम भावूक झाले होते.. सियाने आजी, समर पूर्वी यांच्या देखील गळ्यात पडून रडत होती… दुसऱ्यांदा तिची पाठवणी होत होती…

    मागच्या वेळी मनात फक्त दुःख आणि दुःखच घेऊन आई-बाबांचं घर तिने सोडलं होतं… पण आजच्या या आई, वडील, बहीण, भाऊ यांना सोडून जाण्याच्या दुःखाबरोबरच रामची आयुष्यभरासाठी मिळालेली सोबतीचा आनंद होता. आज तिच्या डोळ्यातून आनंद आणि दुःखाचे अश्रू वाहात होते. ठरवूनही तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.

    शिवने तिला पुढे होऊन मिठीत घेतलं, तसं तिला जास्तच भरून आलं. त्याच्यामुळेच आजचा हा दिवस – जो कधी येईल याची आशाच सोडून दिली होती तिने, ज्याची कधी आयुष्यात परत भेट होईल की, नाही त्याची शाश्वती नव्हती – आज तो तिच्यासोबत होता… तेही तिचा नवरा म्हणून! आजच त्यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती…

    ती व्यक्ती आज फक्त आणि फक्त शिवमुळे तिच्या आयुष्यात आली होती… तिला सगळं आठवून जास्तच रडू येत होतं. आरू आता शांत झाली होती. रामने तिच्याकडे अजूनही पाहिलं नव्हतं… त्याची नजर आता सियावर होती, तिला रडताना पाहून त्यालाही वाईट वाटत होतं आणि ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

    आरू त्याच्याकडेच पाहात होती आणि आता आपल्या दादाचा चेहरा पाहून तिलाही वाईट वाटू लागलं… वहिनी रडतेय म्हणूण दादाला त्रास होतोय ते पाहून तिने स्वतःचं रडणं आवरतं घेतलं आणि सियाजवळ आली. कारण, आता वहिनी रडायची थांबली तरच दादाचा चेहरा खुलेल, हे लक्षात आलं… कारण तीही दादाला असं पाहू शकत नव्हती, तो तिच्यावर नाराज आहे, हेही ती विसरुन गेली.

    हेही वाच ा-

    “ओ, काय चाललंय तुमचं? आमच्या वहिनीला रडवताना काहीचं कसं वाटत नाही तुम्हाला?  लई झालं, व्हा बाजूला… वहिनी बास हां आता, अजिबात रडायचं नाही… तुम्हाला रडताना पाहून माझा दादा पण रडेल काही वेळाने!” आरू सियाचे डोळे पुसत हसत म्हणाली.

    तिचं बोलणं ऐकून सिया खुदकन हसली… शिव भुवया उंचावून तिच्याकडे पाहात होता – जेव्हा ती त्याला बाजूला व्हा म्हणाली! आतापर्यंत ती त्याच्याकडे पाहायला देखील तयार नव्हती आणि आता इतक्या हक्काने त्याला बाजूला सारलं होतं… जणू काय सिया त्याची बहीण नसून फक्त तिची वहिनी आहे!! बाकीचे पण तिच्या या कृतीने अवाक् झाले होते आणि शिवकडे पाहून हसत होते… कारण त्याच्याशी अशा प्रकारे कोणीच बोललं नव्हतं आणि आरू सहज त्याला बोलून गेली… यापूर्वीही आरू त्याच्याशी अशा प्रकारे बोलली होती.

    शिवने रामकडे पाहिलं तर भुवई उंचावून त्याने त्याला इशारा केला – “बघ ही अशी आहे!” तो डोळ्यांनीच सावध करत होता.

    क्रमशः
    Avatar photo
    शोभा भडके

    मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

    Related Posts

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026 ललित

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026 ललित

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    By मधुर सुनील कुलकर्णीApril 19, 2026

    पुण्याहून आलेलं, साठेकाकांचं पत्र मी वाचलं. अश्रूंनी पत्रातील अक्षरं धूसर व्हायला लागली. माझ्या हातातले पत्र…

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 272
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 390
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 563
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026
    Most Popular

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.