Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘पानिपत’… युद्धाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी कादंबरी

    September 27, 2026

    निसर्गाचे संगीत

    September 27, 2026

    गणपती गेले गावाला…

    September 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गणपती गेले गावाला…
    ललित

    गणपती गेले गावाला…

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीSeptember 27, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नीता कुलकर्णी, लेखिका नीता कुलकर्णी, नीता चंद्रकांत कुलकर्णी, गणेशोत्सव 2026, गणपती उत्सव 2026, गणेश विसर्जन, गणेश सेवा, मैत्रिणींच्या गप्पा, गणपतीचा नैवेद्य, मैत्रिणींचे अथर्वशीर्ष
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    गौरी-गणपतीचा सण फार आनंदात साजरा केला होता. घरात नुसती गडबड… बाहेर तर धूम चाललेली होती. गणपतीचे विविध देखावे, आरास, लाइटिंग हे बघायला फार मजा येत होती. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक येऊन गेले. अथर्वशीर्षांची आवर्तनं चालू होती. सगळीकडे विलक्षण उत्साह भरलेला होता. बघता बघता अनंत चतुर्दशी आली… गणपतीच विसर्जन झालं… फुलांच्या माळा, दिवे, चौरंग हे सगळं रात्री आवरून झालं.

    आज रोजच्या सारखी सकाळी बागेत चालायला गेले. मैत्रिणी आल्याच होत्या. त्यांच्याबरोबर बाकावर बसले. गप्पा सुरू झाल्या… इतक्यात राधा आली आणि म्हणाली,

    “ए, सारखं गोड खाणं चाललंय… आधी चार चार चकरा मारा आणि मग गप्पा…”

    तशा सगळ्या म्हणाल्या,

    “आम्ही नाही येणार… अगं, दमलो आम्ही. आज नुसत्या बसणार आहोत… तुझी तू जा बाई…”

    “ए, असं काय गं… एक तरी चक्कर मारूया की!” ती म्हणाली. पण आज कोणी उठलं नाही. मी पण बसले.

    “बरं बाई, मी एकटीच जाते…” असं म्हणत ती गेली.

    “काय, कसा साजरा झाला सण?” आपटे ताईंनी विचारलं.

    सुजाता म्हणाली, “आधी माझ्या मोदकांची गंमत सांगते ती ऐका… आमच्या सूनबाई मला प्रेमाने म्हणाल्या, ‘आई तुम्ही युट्यूबवर मधुराज रेसिपिज् नेहमी बघत असता… यावेळच्या व्हिडीओत तिने उकडीचे मोदक सोप्या पद्धतीने सांगितले आहेत. बघितलेत ना?’ पुढे ती काय बोलणार हे माहिती होतं… म्हणून मीच तिला गोड आवाजात म्हटलं, ‘असं का! ते बघून मग तूच ट्राय कर यावेळेस…’ तिची अशी तंतरली…”

    हेही वाचा – माझा गणपती बाप्पा

    “मग काय झालं?”

    म्हणाली, “नको नको, आई ते काय दिसायला चांगले दिसतात… चव कशी कळणार? तुम्ही नेहमी करता तसे करा, तुमचेच छान होतात…”

    सगळ्या हसत सुटल्या…

    करूणा वहिनी म्हणाल्या, “आम्ही दोघी सासू-सुना एकमेकींना चांगल्या ओळखून आहोत. आम्ही घरी मोदक करायच्या भानगडीत पडत नाही सरळ आधीच मोदकांची ऑर्डर देऊन येतो…”

    जोशी काकू म्हणाल्या, “आमच्याकडे सगळ्यांना तळणीचे मोदक आवडतात. आदल्या दिवशी डबाभर केले की, झालं काम!”

    “पण काही म्हणा, गौरी-गणपतीच्या सणानंतर घर एकदम रिकामं… मोकळं मोकळं वाटतंनाही का गं?”

    “हो, हो… हे मात्र अगदी खरं आहे. त्या दिवसांत किती चैतन्य असतं घरात!”

    आज आम्हाला सगळ्यांना ते जाणवतं होतं. कानडे आजी भावूक झाल्या होत्या. मऊ आवाजात म्हणाल्या, “खरंतर, दरवर्षी माझे उकडीचे मोदक छान होतात. यावर्षी काय झालं कळलं नाही, बरेच मोदक हसले… उघडेच झाले! गणपतीला तसाच नैवेद्य दाखवला…”

    तांबे आजी म्हणाल्या, “अगं, ते हसले नाही काही, कसे झाले आहेत ते बघण्यासाठी बाप्पाने चव घेऊन बघितली तुझ्या मोदकांची! म्हणूनच ते उघडले…”

    “असं असेल?” कानडे आजींनी निरागसपणे विचारले.

    “अगं, नाही तर काय? तू इतकी सुगरण. कधी असं झालं होतं का? उलट प्रचिती दाखवली गं तुला…”

    कानडे आजींना हे ऐकून बरे वाटले. त्यांनी श्रद्धेने हात जोडले… मला हे फारच आवडलं… मोदक बिघडले तरी त्याला भावनिक टच देऊन आजींनी सहजपणे त्यांची समजूत काढली होती… हे मी खरंच लक्षात ठेवीन!

    असं बरंच काही शिकण्यासाठी तर मी इथे येते… सहज गप्पांतून मोलाचं असं काहीतरी गवसतं… आपोआप लक्षात राहतं.

    “ए, खाण्याच्याच काय गप्पा चालल्या आहेत? अथर्वशीर्षाची किती आवर्तन केली? कुठल्या  आरत्या म्हटल्या? ब्रह्मणस्पती सूक्तम् एकदा तरी म्हटलं का?” सुमतीने विचारल..

    “आता आमची परीक्षा नको घेऊस बाई! गणरायाची केली आम्ही सेवा, जमेल तेवढी…”

    नंदा म्हणाली, “अगं, माझ्या घरी सासू-सासरे, त्यात नातवाला सांभाळायचं… मग मी आदल्या दिवशीच गणपतीला सांगितलं – ‘बाबा रे, उद्या मला काही जमणार नाही. मी आजच एकवीस आवर्तन करते…’”

    “असू दे, केलीस ना दुसऱ्या दिवशी? पहिल्या दिवशी सगळेच म्हणणार… उलट दुसऱ्या दिवशी शांतपणे गणोबाने तुझी आवर्तन ऐकली असतील…” तांबे आजींनी असं म्हटल्यावर, नंदा मनापासून हसली..

    सुरेखा म्हणाली, “गप्पा किती वेळ चालल्या आहेत? आज काय घरी कामं नाहीत का? निघूया गं…”

    हेही वाचा – गौरीमायला निरोप…

    उठल्या सगळ्या… तांबे आजी म्हणाल्या, “जरा थांबा ग.. उभ्या राहा… हात जोडा… आज निघताना अथर्वशीर्ष म्हणूया.”

    ‘आत्ता म्हणायचं? झाले की गणपती!’ असा प्रत्येकीचा चेहरा…

    आजी शांतपणे म्हणाल्या, “गणपतीचं विसर्जन झालंय… पण त्या पार्थिव मूर्तीचं जलतत्त्वात विसर्जन करून… असं कधी विसर्जन होतं का? तो अनादी, अनंत आहे. तो या  विश्वातल्या कणाकणात व्यापून राहिलेला आहे… तो असतोच आपल्या आसपास… आताही आहेच. आज त्या परमतत्वासाठी म्हणूया…”

    उभं राहून सगळ्यांनी हात जोडले आणि अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली…

    हरी ओम् नमस्ते गणपतये

    त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि

    त्वमेव केवलम् कर्तासि…

    डोळे मिटून शांतपणे अथर्वशीर्ष म्हणताना आज बाप्पा समोर दिसत होता… ‘असाच तुझा वरदहस्त डोक्यावर असू दे रे… आहे त्यात आम्ही समाधानी आहोत. तुझ्याकडे आता काही मागणं नाही बघ…’ असं म्हणून प्रसन्न मनाने आम्ही सगळ्याजणी घरी निघालो…

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    Bookshelf : ‘पानिपत’… युद्धाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी कादंबरी

    September 27, 2026 ललित

    निसर्गाचे संगीत

    September 27, 2026 ललित

    ग म भ न

    September 26, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : ‘पानिपत’… युद्धाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी कादंबरी

    By डॉ. अस्मिता हवालदारSeptember 27, 2026

    आठशेहून जास्त पाने असलेली विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ कादंबरी हातात घेतल्यावर वाचायला भरपूर वेळ लागणार,…

    निसर्गाचे संगीत

    September 27, 2026

    ग म भ न

    September 26, 2026

    बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!

    September 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘पानिपत’… युद्धाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी कादंबरी

    September 27, 2026

    निसर्गाचे संगीत

    September 27, 2026

    गणपती गेले गावाला…

    September 27, 2026

    Homeopathy : भारतात होमिओपॅथी आली तरी कशी?

    September 27, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर 2026

    September 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें

    September 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 450
    • अवांतर 214
    • आरोग्य 152
    • पंचांग आणि भविष्य 601
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 952
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘पानिपत’… युद्धाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी कादंबरी

    September 27, 2026

    निसर्गाचे संगीत

    September 27, 2026

    गणपती गेले गावाला…

    September 27, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.