“हमारी दो ज़िंदगियाँ होती हैं… एक जो हम हर दिन जीते हैं, दूसरी जो हम हर दिन जीना चाहते हैं…”
दिव्य प्रकाश दुबे यांच्या ‘अक्टूबर जंक्शन’ या कादंबरीच्या सुरुवातीला वाचलेली ही वाक्यं मनात कुठेतरी रेंगाळत राहिली होती. नुकतीच त्यांच्याच ‘मुसाफिर कैफ़े’ या कादंबरीतील पात्रांवर आधारित नेटफ्लिक्सची ‘मुसाफिर कैफ़े’ ही मालिका पाहिली आणि अचानक ‘अक्टूबर जंक्शन’ची ही दोन आयुष्यं पुन्हा आठवली.
कारण चंदरकडेही जणू ही दोन आयुष्यंच आहेत.
एक — जे तो प्रीतीसोबत जगतो… आणि दुसरं — जे त्याला सुधासोबत जगावंसं वाटतं.
सुधा त्याला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवते. त्याच्या आत दडलेली स्वप्नं जागी करते. आणि प्रीती? ती त्याच्या आयुष्यात राहून त्याच्या स्वप्नांना आपलंसं करते, त्याच्यासोबत चालते.
हेही वाचा – …म्हणून आजच मनासारखं जगावं!
कथा संपली आणि वाटलं, चंदरला सुधाच्या रूपात खरं प्रेम मिळालं, हे सत्य आहे. पण मग प्रीती आणि चंदरचं नातं खोटं म्हणता येईल का? किंवा कमी खरं म्हणता येईल का? बहुतांश लोकांच्या आयुष्यातही असंच होतं ना? कधी मनाला हवी असलेली व्यक्ती आयुष्यात राहत नाही. कधी परिस्थिती वेगळ्या वाटेवर घेऊन जाते आणि त्या वाटेवर चालताना एखादी व्यक्ती आपली होते. तिच्यासोबत जगताना काळजी निर्माण होते, जिव्हाळा निर्माण होतो, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणं सुरू होतं.
मग त्या नात्याला कमी कसं म्हणायचं? पहिल्यांदा भावना खरी होती, तीव्र होती म्हणून नंतर मनात निर्माण झालेली भावना अल्प किंवा खोटी असते का?
कदाचित नाही.
कारण प्रेम ही शेवटी एक भावना आहे. ती प्रत्येक नात्यात सारखी दिसेलच असं नाही. कुठे ती ओढ बनून येते, कुठे काळजी बनून, कुठे समर्पण बनून, तर कुठे एखाद्याच्या स्वप्नांमध्ये स्वतःचं आयुष्य सामावून घेण्याची इच्छा बनून.
भावना तीच असते. फक्त तिचं रूप बदलतं. म्हणून कदाचित प्रत्येक नात्याकडे ‘खरं की खोटं’ या एका प्रश्नातून पाहता येत नाही. कारण नात्यांना दोनच रंग नसतात. प्रत्येक नात्याच्या स्वतःच्या अनेक छटा असतात आणि म्हणूनच ‘मुसाफिर कैफ़े’ची मालिका संपताना अनेक शक्यतांपैकी एक शक्यता मनात येते — समजा सुधा पुन्हा चंदरच्या आयुष्यातून निघून गेली आणि प्रीती आणि चंदर एकत्र आले, तर चंदरच्या मनात प्रीतीसाठीही तीच भावना, तितक्याच तीव्रतेने राहील का, जशी सुधासाठी होती?
कदाचित नाही.
कारण प्रत्येक नात्याची भावना वेगळी असते. तिची तीव्रताही वेगळी असते. पण म्हणून ती भावना कमी खरी ठरत नाही. कारण, कधी कधी प्रेम नात्याला जन्म देतं, आणि कधी कधी नातं प्रेमाला जन्म देतं.
हेही वाचा – ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!
झूठे प्रेम के गीत
कभी-कभी अच्छा होता है
झूठे प्रेम के गीत गाना,
अपने मन को बहलाना,
बिखरे रिश्तों को सहलाना।
अधरों पर मधुमास सजाकर,
भीतर सावन को छिपाना…
कभी-कभी अच्छा होता है,
झूठे प्रेम के गीत गाना।
जीवन केवल श्वेत-श्याम
दो रंगों की तस्वीर नहीं।
सच्चा प्रेम, झूठा प्रेम—
क्या है गलत और क्या है सही?
तथ्य के निष्ठुर मौन से बेहतर
भ्रम की मधुर बाँसुरी बजाना।
कभी-कभी अच्छा होता है
झूठे प्रेम के गीत गाना।


