Wednesday, November 12, 2025

banner 468x60

Homeआरोग्यनिरामय आरोग्यासाठी दिनचर्या : रात्री झोपण्याची वेळ महत्त्वाची

निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : रात्री झोपण्याची वेळ महत्त्वाची

रविंद्र परांजपे

निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण मागील लेखात दिनचर्येपासून मार्गदर्शनाचा श्रीगणेशा केला. दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून केल्यास त्याचे मिळणारे फायदे देखील आपण जाणून घेतले. पूर्वापार प्रचलित असलेल्या उक्तीचे आपण पुन्हा स्मरण करूया. लवकर निजे, लवकर उठे, तयास ज्ञान, सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा लाभे. या उक्तीची सुरुवात रात्री लवकर झोपावे, अशी आहे. या लेखात आपण लवकर झोपण्याविषयी माहिती घेऊया.

रात्री लवकर झोपणे

दररोज रात्री वेळेवर झोपणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे रात्री 9:30 ते 10 या दरम्यान झोपी जावे. रात्री 10 वाजेपर्यंत कफाचा काळ असल्याने त्या वेळेपर्यंत झोपणे निरामय आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच हितावह असते.

फार दिवसांपूर्वी मी रात्री लवकर झोपण्याविषयी वाचले होते. रात्रीच्या झोपेचा कालावधी मोजताना झोपायची वेळ ते रात्री 12 वाजेपर्यंतचा वेळ दुप्पट धरावा. म्हणजे एखादी व्यक्ती रात्री 10 वाजता झोपून दुसरे दिवशी सकाळी 6 वाजता उठली, तर व्यक्तीची झोप आठ तास नाही तर, 10 तास होते. यातील गणिती भाग वगळला तरी, हे मात्र खरे आहे की, आपण रात्री 10 वाजता झोपी गेलो तर सकाळी जाग लवकर म्हणजेच 6 वाजण्यापूर्वीच येते. मला असा अनुभव नेहमीच येतो.

रात्री लवकर झोपण्याचे फायदे

रात्री लवकर झोपण्याचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत :

1. पुरेशी झोप झाल्याने खचितच आरोग्य लाभ मिळतात.

2. लवकर जाग आल्यामुळे लवकर उठण्याचे फायदे आपसूकच अनुभवास येतात.

हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सकाळी लवकर उठावे

थोडक्यात सांगायचे झाल्यास, लवकर झोपल्यामुळे लवकर उठायची सवय लागते… आणि महत्त्वाचे म्हणजे, दुसऱ्या दिवशी मन प्रसन्न आणि आनंदी राहते, दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते, परिणामी दिवसातील कामे शांतपणे तसेच एकाग्र मनाने व्यवस्थितरीत्या करता येतात. याशिवाय, शारीरिक स्वाथ्य लाभते तसेच मानसिक आरोग्य लाभ देखील मिळतात.

तसं पाहिलं तर, आपल्या सर्वांनाच रात्री लवकर झोपण्याचे फायदे माहीत असतात. परंतु  सध्याच्या जीवनशैलीत बहुतांश लोकांच्या बाबतीत रात्री लवकर झोपणे एकंदरीतच जमत नसल्याचे दिसून येते. याची नानाविध कारणे असू शकतात. परंतु आपण जर आरोग्यास अधिकतम प्राधान्य दिले तर, आपणास सर्व कारणांवर यशस्वीरीत्या मात करता येईल.

थोडक्यात, स्वतःच्याच निरामय आरोग्यासाठी प्रत्येकाने रात्री लवकर झोपायचेच, असे ठामपणे ठरविले पाहिजे आणि त्यासाठी हळूहळू सवय लावायला हवी. आपण नेहेमी सकाळी उठण्यासाठी गजर लावतो, तद्वतच रात्री झोपण्यासाठी गजर लावल्यास लवकर झोपायची सवय आपसूकच लागेल. रात्रीचा गजर मात्र 9:30 वाजताचा लावावा, म्हणजे झोपण्यासाठी आवराआवर करून 10 वाजेपर्यंत पलंगावर आडवे होता येईल. उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय असल्याने सुरुवातीला लवकर झोप लागणार नाही. परंतु हळूहळू मात्र लवकर झोपण्याची सवय नक्की आचरणात आणता येईल.

हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक…

तात्पर्य, शारीरिक तथा मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दिवसाची सुरुवात लवकर उठून करायला हवी आणि लवकर उठण्यासाठी लवकर झोपणे नितांत आवश्यक आहे.

येथे मागील लेखातील इंग्रजी म्हणीचा पुनश्च उल्लेख करणे नक्कीच यथार्थ होईल –

Early to bed, early to rise, makes a man healthy, wealthy and wise.

क्रमशः

(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा.)

मोबाइल – 9850856774

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!