Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आंधळा मागतो एक डोळा…
    ललित

    आंधळा मागतो एक डोळा…

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरJune 2, 2026Updated:June 3, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, राजकडून गुरुदक्षिणा, उत्कृष्ट शिक्षक चितळे सर, चितळे सरांचे एक लाख रुपये, राज आणि चितळे सर, राजकडून चितळे सरांना दोन लाख, आंधळा मागतो एक डोळा, बाईंनी सांगितले सरांचे दु:ख, शाळा बिल्डिंग डोनेशन,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “सर, तुम्ही कसे आहात? मी तुमचा विद्यार्थी राज बोलतोय, ओळखलंत ना मला?”

    “राज अरे, मी बाई बोलतेय. सरांचा नुकताच डोळा लागलाय, प्रवासाने थोडे थकलेत रे ते… राज म्हणजे तू जोगेश्वरी मंदिराच्या समोर राहायचास, बरोबर ना?” बाईंनी विचारले.

    “हो बाई… आणि इतके सर्व आठवतेय तुम्हाला?” राजने आश्चर्याने विचारले.

    “खूप कष्ट करून शिक्षण घेतलेस रे तू. मला आठवतेय ना. स्टेशनवर ओझी वहायचास तू, पण शिकण्याची मोठी जिद्द होती. बरा आहेस ना? काय करतोस तू?” बाईंनी मोठ्या कुतूहलाने विचारले.

    “बाई, अजूनही मी ओझीच वाहतो, परंतु खांद्यावर नाही तर गाडीतून. माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे,” राजने सांगितले.

    “बाई, तुमच्या आवाजात मला काळजी दिसते. सर्व ठीक तर आहे ना?” राजने विचारले.

    “तुम्हा विद्यार्थ्यांपासून काय लपवायचे?” बाई बोलत्या झाल्या.

    हेही वाचा – ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    “शाळेच्या नवीन बिल्डिंगसाठी डोनेशन जमवायचे म्हणून तुझे सर पुण्याला गेले होते. एका दिवसात एक लाख रुपये त्यांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडून जमा केलेत. शाळेच्या सेक्रेटरी साहेबांना फोन करून तसे कळवले आणि सर पुण्याहून तळेगावला आलेत. ‘हे घे, एक लाख रुपयांचे पाकीट,’ असे म्हणत सरांनी कोटाच्या खिशात हात घातला, परंतु पाकीट खिशात नव्हते. सर, पुनः पुनः खिसे तपासत होते पिशवीत बघत होते; पण जे खिशात किंवा पिशवीत नव्हतेच ते कसे मिळणार? पाकीट कुणीतरी चोरले असावे किंवा ते कुठेतरी पडले असावे. म्हणतात ना – दैव देते आणि कर्म नेते…”

    राजने बाईंना थांबविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांचे बोलणे अव्याहत सुरूच होते.

    “सेक्रेटरी साहेबांचा अभिनंदनाचा फोन आला. परवा संध्याकाळी सरांचा शाळेत सत्कार ठेवलाय. हरवलेले पैसे परत मिळावे असे वाटते, पण ते अशक्यच आहे ना? आजच्या या युगात, कोण देईल रे सहजासहजी मिळालेली एवढी मोठी रक्कम? आता एक लाख रुपये भरून द्यायचे ही केवढी मोठी गोष्ट आहे रे आमच्यासाठी! माझ्या आजारपणामुळे होते-नव्हते ते सर्व पैसे संपले. केवळ दोन मार्ग आम्हाला दिसले ते म्हणजे, एकतर माझं मंगळसूत्र, नाही तर यांचं ‘उत्कृष्ट शिक्षका’चं गोल्ड मेडल विकून पैसे उभे करायचेत. सरांनी काळजावर दगड ठेवून त्यांचं गोल्ड मेडल विकायचे ठरविले. एकदा गोल्ड मेडल विकून पैसे मिळाले आणि ते सेक्रेटरी साहेबांकडे दिले की, हे निश्चिंत होतील.”

    बाईंनी मन मोकळे केले आणि त्यानंतरच त्या थांबल्या. हे सर्व ऐकताना राजचे डोळे पाणावले.

    “कुणाशी बोलतेस?” बाहेर येत सरांनी विचारले.

    “तुमचा माजी विद्यार्थी राजचा फोन आहे. त्याला तुमच्याशी बोलायचं आहे,” म्हणत बाईंनी फोन सरांकडे दिला.

    जणू काहीच झाले नाही, अशा अविर्भावात सर राजशी बोलत होते. बाईंशी बोलला नसता तर, राजला सरांची परिस्थिती आणि मन:स्थिती समजलीदेखील नसती!

    चितळे सर, वय वर्षे 70, एक नि:स्वार्थी, सेवानिवृत्त हाडाचे शिक्षक. मुलांवर चिडण्यापेक्षा प्रेम करणारे, कधीही छडी न वापरणारे, हसत-खेळत शिकविणारे, विद्यार्थ्यांचे लाडके सर.

    “सर, मी फोन अशासाठी केला की, मला पुण्यात एका रिक्षामध्ये एक पाकीट दिसले. पाकिटावरील अक्षर ओळखीचे वाटले म्हणून मी ते पाकीट उचलले. त्यावर ‘चितळे सर’ असे लिहिले होते. रिक्षावाल्याला विचारले की माझ्या आधी रिक्षात कोण बसले होते. त्याने केलेले वर्णन तुमच्याशी मिळते-जुळते असल्याने मला खात्री झाली की, ते पाकीट तुमचेच असणार… म्हणून मी तुम्हाला फोन केला, पण तुमचा फोन बंद आहे, असा मेसेज येत होता… कामे आटोपून मी घरी आलो. पाकीट उघडले तर त्यात मला एक लाख रुपये मिळाले, म्हणून मी तुम्हाला परत फोन केला आणि बाईंनी फोन उचलला.”

    “परमेश्वरा, तुझे अस्तित्व आहे रे बाबा!” सर गहिवरून म्हणाले.

    “सर, तुमचे अकाऊंट डिटेल्स द्या. मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो.”

    सरांच्या मनावरील ताण नाहीसा झाला. पैसे हरवल्याच्या कटू धक्क्यापेक्षा पैसे मिळाल्याचा धक्का हवाहवासा आणि सुखकर होता.

    सरांनी राजला अकाउंट डिटेल्स दिलेत आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, राजने पैसे त्यांना ट्रान्सफर करण्याऐवजी जर शाळेच्या सेक्रेटरी साहेबांनाच ट्रान्सफर केले, तर अकाऊंटमधून पैसे काढून ते सांभाळून शाळेत नेण्याची आपली जबाबदारी कमी होईल.

    “राज, तू सेक्रेटरी साहेबांनाच पैसे ट्रान्सफर करशील का? मी त्यांचे अकाऊंट डिटेल्स तुला देतो.”

    दुसऱ्या दिवशी सरांच्या मोबाइलच्या स्क्रीनवर मेसेज झळकला.

    हेही वाचा – रिटर्न गिफ्ट

    “तुम्ही जमवलेले एक लाख रुपये आणि माझे अकरा हजार असे एक लाख अकरा हजार रुपये. मी सेक्रेटरी साहेबांना पाठविताना नमूद केले की, हे चितळे सरांनी जमविलेले पैसे आहेत.”

    “राज, अरे तुझे आभार कसे मानू?” असे चितळे सर लिहित असतानाच राजचा पुढचा मेसेज आला.

    “मी शिकत असताना माझी परिस्थिती खूप गरिबीची होती. तुम्ही शिकवणीची फी न घेता मला शिकविले, मला वेळोवेळी मदत केली. सर, मी आज जो काही आहे तो फक्त तुमच्यामुळेच. सर, गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी भेट पाठवित आहे. प्लीज, त्याचा स्वीकार करा.”

    पुढच्याच क्षणी सरांच्या अकाऊंटमध्ये दोन लाख रुपये जमा झाले.

    म्हणतात ना…

    “आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे.”

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026 ललित

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026 ललित

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    प्रीत परी तुजवरती…

    By डॉ. विवेक वैद्यJune 12, 2026

    कॉलेजच्या फायनल इअरला होतो. क्लासमध्ये नवीनच मुलगी आलेली. धारदार नाक, गोरीपान, सडपातळ… सगळ्या मुलांच्या नजरा…

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026

    संवाद… पती अन् पत्नीमधला…

    June 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026

    Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी

    June 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 326
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 452
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 221
    • मैत्रीण 20
    • ललित 699
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.