Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य
    ललित

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेJune 22, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, आजोबा नातू, आजोबा नातवाचा स्नेहबंध, आजोबा नातू स्नेह, आजोबा आणि चिनार नातू, चिनारचा भीषण अपघात, चिनारचे आबांच्या मांडीवर झोपणे, नातवाचे आजोबाच्या मांडीवर झोपणे
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज घड्याळ खूप हळू चाललंय, असं वाटत होतं मला. सहा वाजले होते… एव्हाना चिनार घरी परत यायला निघाला असेल. माझ्या डोक्यात तेच विचार सुरू होते. माझ्या मनाची घालमेल सुनबाईने अचूक ओळखून ती मला म्हणाली, “आबा चिनारचा फोन येऊन गेला. तो निघाला आहे ऑफिसमधून, येईल सातपर्यंत. इथे येरझाऱ्या मारण्यापेक्षा तुम्ही थोडावेळ आराम करा तुमच्या खोलीत.” सुनबाईचंही बरोबर होते. मी माझ्या खोलीत गेलो खरा, पण लक्ष मात्र दरवाजाकडे होते. त्याच नादात डुलकी लागल्याचं, मला कळलं देखील नाही.

    0000

    “राजे आता हळूहळू माझ्या मांडीवर थोडा वेळ झोपायची सवय मोडायला लागा. लग्न ठरलंय तुमचं आता. उद्या माझ्या नातसुनेने तक्रार केली तर मग अवघड होऊन बसेल सगळं…”

    “कम ऑन आबा धिस इज नॉट फेअर, लग्न ठरलंय फक्त. अजून व्हायला वेळ आहे. बाय द वे मी तुमच्या नातसुनेला माझी ही सवय ऑलरेडी सांगितली आहे.”

    चिनारच्या या उत्तराने मी कपाळावर हात मारून घेत म्हटलं, “अरे तिला काय वाटेल माझ्याबद्दल!”

    “वाटू दे काय वाटायचं ते. पण मी तुला आजच सांगून ठेवतोय आबा, ही सवय मी मोडणार नाही. आय कान्ट थिंक ऑफ धिस. दिवसभर कितीही दमलेला असलो मी तरी, घरी आल्यावर फ्रेश होऊन तुझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपायची सवय झाली आहे मला. आई बाबांना देखील माहीत आहे. आई तर घरी आल्यावर मला काही खायला द्यायच्या भानगडीतच पडत नाही.”

    “ते सगळं जरी खरं असलं तरी, काळानुसार आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतात आणि त्यातच शहाणपण असते.”

    “अरे आबा, हे सगळं तुला आजच सांगून टाकायचं होतं का?”

    चिनारच्या प्रश्नाने मी तेव्हा निरूत्तर झालो होतो. आजोबा आणि नातवाचं नातं जगावेगळं असतं, पण इथे आमच्या दोघांच्या बाबतीत मात्र ते डोक्यावरून पाणी होतं.

    हेही वाचा – बेसनाचे लाडू… माँची आठवण

    “तू जगातील सगळ्यात ऑसम आबा आहेस. मला समजायला लागल्यापासून तू सावलीसारखा माझ्या सोबत आहेस. आई बाबांच्या नोकरीच्या बिझी शेड्युलमध्ये माझ्यासाठी खूप कमी वेळ असायचा. कदाचित म्हणूनच तू माझा बेस्ट फ्रेंड झालास. नर्सरीपासून माझी चिमुकली बोटं तुझ्या हातात विसावलेली असताना मला कसलीही भीती वाटत नसे, तीच स्थिती आजही आहे. आजकाल मीटिंग्ज, डेडलाइन्स, स्टॉक पोझिशन, लॉजिस्टिक इश्यूज, डेली रिपोर्ट्स या सगळ्यांत अडकून दिवसभर सतत तणावाखाली काम करताना सुद्धा माझं बँक ऑफ द माइंड म्हणजे तुझ्या मांडीवरची झोप असते. त्यामुळे मी निश्चिंत असतो. माझ्या कामाचा उरक आणि उत्साह बघून माझ्या एमडीने मला याचं रहस्य विचारले होते, तेव्हा सुद्धा मी हेच सांगितले होते.”

    आजकाल हे असंच होतंय. हेच सगळं सतत आठवतंय. माझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपलेला चिनार आठवून मनात कालवाकालव होते आहे, या सगळ्याचे कारण होते, गेल्या महिन्यात चिनारच्या गाडीला झालेला जीवघेणा अपघात. त्याच्या कंपनीच्या कारखान्यात कामगारांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे कारखान्यातून माल बाहेर पडायला अडचणी यायला सुरुवात झाली होती ज्याचा कंपनीच्या विक्रीवर हळूहळू परिणाम होत होता. मुख्य ऑफिसचे एक शिष्टमंडळ तातडीने कारखान्याला भेट द्यायला गेले होते, कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी. चिनारने पुढाकार घेऊन केलेली शिष्टाई फळाला येऊन संप सामोपचाराने मिटला होता. तिथून परत येतानाच द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात चिनारला गंभीर दुखापत झाली होती. तो आणि त्याच्या सहकाऱ्यांना जखमी अवस्थेत सुरुवातीला नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

    कंपनीमध्ये ही बातमी कळताच लगोलग चक्र हलली आणि त्या सर्वांना मुंबईतील नामांकित इस्पितळात हलवून आवश्यक ते उपचार सुरू करण्यात आले. चिनार मात्र उपचारांना पाहिजे तितका प्रतिसाद देत नव्हता आणि म्हणूनच काळजी वाढली होती. मला रहावलं नाही म्हणून मग मी एक दिवस त्याला भेटायला गेलो होतो. तिथल्या बेडवर शांतपणे झोपलेल्या चिनारला बघून मला रडायला आलं. इच्छा असूनही माझ्या मांडीवर त्याचं डोकं मला ठेवता आलं नाही. तो डोळे उघडेल या आशेवर मी कितीतरी तास त्याच्या उशाशी बसून होतो, पण ते झाले नाही. शेवटी भेटायची वेळ संपल्यावर विमनस्क अवस्थेत मी घरी आलो…

    चिनार शुद्धीवर आला खूप उशिराने. नक्की काय झाले होते अपघाताच्या वेळी हे त्याला सगळं आठवलं. डॉक्टरांनी घरी जायची परवानगी दिल्यावर तो घरी आला देखील गेल्या आठवड्यात. पण मला भेटायला मात्र टाळत होता तो, ज्याचं मला आश्चर्य वाटत होते. अखेर आज सकाळी उठल्यावर त्याने स्वतःहून मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी देवाची पूजा उरकून त्याच्या खोलीत शांतपणे प्रवेश केला.

    मिनिटभर आम्ही दोघेही एकमेकांना फक्त बघत होतो. पहिला संवाद कोण करणार याची वाट दोघेही बघत होतो. त्याचा हात माझ्या हातात घेऊन दुसऱ्या हातानं मी त्याच्या हातावर शांतपणे थोपटू लागलो. त्याची नजर माझ्यावर रोखली होती, हे मला जाणवलं. पण मान वर करून त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नाही झाली माझी. शेवटी क्षीण आवाजात त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, “आबा. मला लवकरात लवकर यातून बाहेर पडायला मदत कर प्लीज.” असं म्हणून तो ओक्साबोक्शी रडायला लागला. आता मात्र माझा संयम सुटला आणि त्याच्या बेडवर बसून मी त्याला माझ्या कुशीत ओढून घेतले. काही काळ आम्ही दोघेही निःशब्द होतो. आता मला पुढाकार घेऊन परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला लागणार होते.

    “बेटा मी आहे ना तुझ्यासोबत चोवीस तास. तू बघच आता किती लवकर तुला यातून मी बाहेर काढतो ते.”

    हेही वाचा – आनंदी जीवनाचे रहस्य

    …आणि झालं देखील तसंच. पुढच्या काही आठवड्यांत चिनारच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा झाली. वजन नेहमी प्रमाणे झाले. गेल्या आठवड्यात डॉक्टरांना भेटून घरी आला तोच उड्या मारत… “आबा, डॉक्टरांनी परवानगी दिली आहे, मला ऑफिसला जायची. आता सोमवारपासून रोजचं आयुष्य सुरू! संध्याकाळी घरी आल्यावर फ्रेश होऊन लगेच तुझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपायचे आहे मला. बी रेडी फॉर मी टू कम बॅक फ्रॉम ऑफिस.”

    0000

    “आबा”

    चिनारच्या हाकेने मी जागा झालो. समोरच्या घड्याळात पाहिलं. साडेसात वाजले होते.

    “तू कधी आलास?”

    “झाली काही मिनिटं. पण तू गाढ झोपेत होतास. शेवटी नाईलाजाने तुझी झोपमोड केली मी. आय ॲम सॉरी…”

    “अरे सॉरी काय त्यात…” म्हणजे एवढा वेळ झोपेत मी तुझाच विचार करत होतो असं म्हणून माझं मलाच हसायला आलं.

    चिनारने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं. ते थोपटता थोपटता मला आमचं जुनं संभाषण आठवलं…

    “राजे आता हळूहळू माझ्या मांडीवर थोडा वेळ झोपायची सवय मोडायला लागा. लग्न ठरलंय तुमचं आता. उद्या माझ्या नातसुनेने तक्रार केली तर मग अवघड होऊन बसेल सगळं.”

    “आबा यावर मी तेव्हा तुला दिलेलं उत्तर आजही तेच आहे.”

    चिनारचं हजरजबाबी उत्तर ऐकून आम्ही दोघेही हसायला लागलो.

    आमच्या दोघांच्या आयुष्याची गाडी अखेर आज पूर्वपदावर आली म्हणून मी परमेश्वराचे मनातल्या मनात आभार मानले.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026 ललित

    उपवास

    August 7, 2026 ललित

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    By प्रणाली वैद्यAugust 7, 2026

    भाग – 37 दिवाकर उठून त्याच्या शेजारी येऊन बसले. तेव्हा शर्वाय विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला.…

    उपवास

    August 7, 2026

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    August 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 387
    • अवांतर 202
    • आरोग्य 136
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 522
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 834
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.