Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी
    अध्यात्म

    Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी

    Team AvaantarBy Team AvaantarJune 12, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Twelve, बारावा अध्याय, अध्याय बारावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय बारावा

    किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा । भातारेंवीण करावा । तो हा योगु ॥66॥ एथ स्वामीचें काज । ना वापिकें व्याज । परि मरणेंसीं झुंज । नीच नवें ॥67॥ ऐसें मृत्यूहूनि तिख । कां घोंटे कढत विख । डोंगर गिळितां मुख । न फाटे काई  ॥68॥ म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि वाटा । भागा आला ॥69॥ पाहें पां लोहाचे चणे । जैं बोचरिया पडती खाणें । तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों ॥70॥ म्हणोनि समुद्र बाहीं । तरणे आथि केंही । कां गगनामाजीं पाईं । खोलिजतु असे  ॥71॥ वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लगतां काठी । सूर्याची पाउटी । कां होय गा ॥72॥ यालागीं पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा । तेवीं देहवंतां जीवां । अव्यक्तीं गति ॥73॥ ऐसाही जरी धिंवसा । बांधोनिया आकाशा । झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ॥74॥ म्हणोनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा । जे कां भक्तिपंथा । वोटंगले ॥75॥

    ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः । अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥6॥

    कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें । जियें कां वर्णविशेखें । भागा आलीं ॥76॥ विधीतें पाळित । निषेधातें गाळित । मज देऊनि जाळित । कर्मफळें ॥77॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जें चळे ना ढळे, सरे ना मैळे

    अर्थ

    अर्जुना, फार काय सांगावे? हा योग करणे म्हणजे नवर्‍यावाचून नित्य नवा अग्निप्रवेश (सती जाणे) आहे. ॥66॥ हा योग करण्याच्या कामात नवर्‍याचे (नवर्‍यबरोबर सती गेले असता जसा पुढे तोच नवरा मिळातो, तसे नवरा मिळवण्याचे) काम नाही, अथवा बापाकडच्या कुलाचाराचे काही निमित्तही नाही; परंतु मरणाबरोबर (मात्र) नित्य नवी लढाई आहे. ॥67॥ याप्रमाणे योगाचे दु:ख मृत्यूहून तीक्ष्ण आहे अथवा कढत विष पिववेल काय? डोंगर गिळताना मुख फाटणार नाही काय? ॥68॥ म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरिता जे निघाले त्यांच्या वाट्याला दु:खाचाच भाग आला. ॥69॥ असे पाहा की, जेव्हा बोचर्‍या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ते त्याचे पोट भरणे म्हणावे की, प्राणांशी त्याचा वियोग म्हणावा? ॥70॥ म्हणून बाहूंनी समुद्र तरून जाणे, हे कोठे (शक्य) आहे काय? अथवा आकाशात पायाने चालणे घडते काय? ॥71॥ युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्याची पायरी करून (सूर्यमंडळाचा भेद करून) जाता येईल काय? ॥72॥ म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येणार नाही, त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गती नाही. ॥73॥ असे असूनही जर ते जीव धैर्य धरून निर्गुणाचाच पिच्छा पुरवतील, तर त्यांना दु:ख प्राप्त होतील. ॥74॥ म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्तिमार्गाला लागले, ते हे दु:ख जाणतच नाहीत. ॥75॥

    पण हे पार्था, जे सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होऊन, अनन्य भक्तीयोगाने माझे ध्यान करीत उपासना करतात, ॥6॥

    (येथून पुढे भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाचे वर्णन करतात.) त्या भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषांची कर्मेंद्रिये ही वर्णाश्रमधर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात. ॥76॥ ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात आणि शास्त्राने मनाई केलेली कर्मे ते करीत नाहीत आणि केलेल्या कर्मांची फळे, ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात. ॥77॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : वांचूनि योगाचेनि बळें, अधिक कांहीं मिळे

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : वांचूनि योगाचेनि बळें, अधिक कांहीं मिळे

    June 11, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जें चळे ना ढळे, सरे ना मैळे

    June 10, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला

    June 9, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : वांचूनि योगाचेनि बळें, अधिक कांहीं मिळे

    By Team AvaantarJune 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा नवद्वारांचां चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी । उघडली खिडकी । ककारांतींची…

    Dnyaneshwari : जें चळे ना ढळे, सरे ना मैळे

    June 10, 2026

    Dnyaneshwari : इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला

    June 9, 2026

    Dnyaneshwari : तरि व्यक्त आणि अव्यक्त, हें तूंचि एक निभ्रांत

    June 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026

    Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी

    June 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 12 जून 2026

    June 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 326
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 451
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 221
    • मैत्रीण 20
    • ललित 699
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.