Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : जे मन बुद्धि इहीं घर केलें माझां ठायीं
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जे मन बुद्धि इहीं घर केलें माझां ठायीं

    Team AvaantarBy Team AvaantarJune 14, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Twelve, बारावा अध्याय, अध्याय बारावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय बारावा

    नामाचिया सहस्रवरी। नावा इया अवधारीं। सजूनियां संसारीं। तारू जाहलों ॥90॥ सडे जे देखिले। ते ध्यानकासे लाविले। परीग्रहीं घातले। तरियावरी ॥91॥ प्रेमाची पेटी। बांधली एकाचां पोटीं। मग आणिले तटीं। सायुज्याचां ॥92॥ परी भक्तांचेनि नांवें। चतुष्पदादि आघवे। वैकुंठींचिये राणिवे। योग्य केले ॥93॥ म्हणोनि गा भक्तां। नाहीं एकही चिंता। तयांतें समुद्धर्ता। आथि मी सदा ॥94॥ आणि जेव्हांचि का भक्तीं। दिधली चित्तवृत्ती। तेव्हांचि मज सूति। तयांचिये नाटीं ॥95॥ याकारणें गा भक्तराया। हा मंत्र तुवां धनंजया। कीजे जे यया। मार्गा भजिजे ॥96॥

    मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय। निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः॥8॥

    अगा मानस हें एक। माझां स्वरूपीं सवृत्तिक। करूनि घालीं निष्टंक। बुद्धिनिश्चयेंसीं ॥97॥ इयें दोनीं सरिसीं। मजमाजीं प्रेमेंसीं। रिगालीं तरी पावसी। मातें तूं गा ॥98॥ जे मन बुद्धि इहीं। घर केलें माझां ठायीं। तरी सांगें मग काई। मी तूं ऐसें उरे॥99॥ म्हणोनि दिवा पालवे। सवेंचि तेज मालवे। कां रविबिंबासवें। प्रकाशु जाय ॥100॥ उचललेया प्राणासरिसीं। इंद्रियेंही निगती जैसीं। तैसा मनोबुद्धिपाशीं। अहंकारु ये॥101॥ म्हणोनि माझां स्वरूपीं| मनबुद्धि इयें निक्षेपीं। येतुलेनि सर्वव्यापी। मीचि होसी ॥102॥ यया बोला कांहीं। अनारिसें नाहीं। आपली आण पाहीं। वाहतु असें गा॥103॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी

    अर्थ

    माझी हजारों नांवें, ह्याच कोणी नावा, त्या तयार करून संसारसागरांतून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असे समज ॥90॥ जे भक्त सडे (अंतर्बाह्य परिग्रहरहित) आहेत असे मी पाहिले त्यांस (माझ्या) ध्यानरूपी कांसेला लाविलें व परिग्रही होते त्यांना नामरूपी नावेवर बसवलें ॥91॥ एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या कांठावर आणलें ॥92॥ परंतु जे माझे भक्त असे (माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत) मग ते (गजेंद्रासारखे) चार पायांची जनावरें वगैरे कां असेनात, पण त्या सर्वांस वैकुंठाच्या राज्यास योग्य केलें ॥93॥ म्हणून माझ्या भक्तांना एकहि चिंता नाही. कारण मी त्यांचा उद्धार करणारा मी नेहमी तयार आहे ॥94॥ आणि जेव्हा भक्तांनी (आपली) चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले ॥95॥ या करता, हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, या भक्तिमार्गाचे आचरण करावे, हा विचार पक्का लक्षात ठेव ॥96॥

    माझ्याच ठिकाणीं मन वृत्तिवंत करून घाल, माझ्या ठिकाणीं बुद्धि स्थिर कर. (म्हणजे) त्यानंतर तूं माझ्या ठिकाणीं निवास करशील (मद्रूप होशील) यांत शंका नाही ॥8॥

    अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपलें मन फक्त माझ्या स्वरूपीं अखंड वतनदार करून ठेव ॥97॥ बा अर्जुना, या दोघांनी (बुद्धि व मन यांनी) जर माझ्यामध्यें बरोबर प्रवेश केला तर तूं मला पावशील ॥98॥ कारण कीं मन व बुद्धि हीं माझ्या ठिकाणीं कायमची राहिलीं तर मग मी, तूं असें द्वैत उरेल काय? सांग ॥99॥ म्हणून पदराच्या वार्‍यानें दिवा मालवला असतां त्या दिव्याचें तेज (जसें) लागलीच नाहीसें होतें, अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याच्या बिंबाबरोबर (जसा) प्रकाश जातो ॥100॥ शरीरांतून प्राण निघाल्याबरोबर इंद्रियें जशीं त्याच्या बरोबर निघतात, त्याप्रमाणें जिकडे मन व बुद्धि जातील तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो ॥101॥ म्हणून माझ्या स्वरूपीं मन व बुद्धि ही दोन्ही ठेव. एवढ्यानें सर्वव्यापी जो मी तोच तूं होशील॥102॥ अर्जुना हें जें मी बोललों यांत कांही अन्यथा नाही असें मी आपली शपथ घेऊन तुला सांगतों ॥103॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं तरी माझियां भक्तां, आणि संसाराची चिंता

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एऱ्हवीं तरी माझियां भक्तां, आणि संसाराची चिंता

    June 13, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी

    June 12, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : वांचूनि योगाचेनि बळें, अधिक कांहीं मिळे

    June 11, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एऱ्हवीं तरी माझियां भक्तां, आणि संसाराची चिंता

    By Team AvaantarJune 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा ययापरी पाहीं। अर्जुना माझें ठाईं। संन्यासूनि नाहीं। करिती कर्में ॥78॥ आणीकही…

    Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी

    June 12, 2026

    Dnyaneshwari : वांचूनि योगाचेनि बळें, अधिक कांहीं मिळे

    June 11, 2026

    Dnyaneshwari : जें चळे ना ढळे, सरे ना मैळे

    June 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 14 ते 20 जून 2026

    June 14, 2026

    Dnyaneshwari : जे मन बुद्धि इहीं घर केलें माझां ठायीं

    June 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 14 जून2026

    June 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 328
    • अवांतर 190
    • आरोग्य 120
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 454
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 223
    • मैत्रीण 20
    • ललित 703
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    June 14, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    कृष्ण-सुदामाच्या प्रेमाची पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.