Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : श्रीगुरु वोंवाळिजती, कां भुवनीं जे उजळिती
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : श्रीगुरु वोंवाळिजती, कां भुवनीं जे उजळिती

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 31, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    श्रीगुरूंचें मन । जया देईल अवधान । तें मी पुढां होईन । चमत्कारु ॥425॥ तया श्रवणाचा अंगणीं । होईन शब्दाचिया आक्षोणी । परिसु होईन घसणी । आंगाचिया ॥426॥ श्रीगुरूंचे डोळे । अवलोकनें स्नेहाळें । पाहाती तियें सकळें । होईन रूपें ॥427॥ तिये रसने जो जो रुचेल । तो तो रसु म्यां होईजेल । गंधरूपें कीजेल । घ्राणसेवा ॥428॥ एवं बाह्यमनोगत । गुरुसेवा समस्त । वेंटाळीन वस्तुजात । होऊनियां ॥429॥ जंव देह हें असेल । तंव ऐसी वोळगी कीजेल । मग देहांतीं नवल । बुद्धि आहे ॥430॥ इये शरीरींची माती । मेळवीन तिये क्षिती । जेथ श्रीचरण उभे ठाती । आराध्याचे ॥431॥ माझा स्वामी कवतिकें । स्पर्शति जियें उदकें । तेथ लया नेईन निकें । आपीं आप ॥432॥ श्रीगुरु वोंवाळिजती । कां भुवनीं जे उजळिती । तयां दीपांचिया दीप्तीं । ठेवीन तेज ॥433॥ चवरी हन विंजणा । तेथ लयो करीन प्राणा । मग आंगाचा वोळगणा । होईन मी ॥434॥ जिये जिये अवकाशीं । श्रीगुरु असती परिवारेंसीं । आकाश लया आकाशीं । नेईन तिये ॥435॥ परि जीतु मेला न संडीं । निमेषु लोकां न धडीं । ऐसेनि गणाविया कोडी । कल्पांचिया ॥436॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये

    अर्थ

    श्रीगुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तु मीच होईन, असा चमत्कार करीन. ॥425॥ श्रीगुरूंच्या श्रवणरूप अंगणात असंख्य शब्द मी होईन, त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्शविषय मी होईन. ॥426॥ श्रीगुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तु पहातील त्या त्या सर्व मीच होईन. त्यांच्या जिभेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणांची सेवा करीन. ॥427॥ त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल् तो तो मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणाची सेवा करीन. ॥428॥ याप्रमाणे सर्व वस्तुमात्र मी होऊन श्रीगुरूंची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन, असे त्याचे मनोगत असते. ॥429॥ हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून याप्रमाणे सेवा घडेल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड बुद्धीमधे मी धरीन. (ती अशी) ॥430॥ जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे रहातील, त्या जागी या (माझ्या) शरीराची माती मिळवीन. ॥431॥ माझे स्वामी ज्या पाण्याला सहजच स्पर्श करतील त्या पाण्यात मी माझ्या शरीरातील पाणी चांगले लयाला नेईन. ॥432॥ ज्या दिव्यांनी श्रीगुरूंस ओवाळतात अथवा जे दिवे श्रीगुरूंच्या मंदिरात लावतात, त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिसळीन. ॥433॥ श्रीगुरूंची चवरी व पंखा जो असेल तेथे (त्या चवरीत व पंख्यात) मी माझ्या प्राणांचा लय करीन. व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा (वारा) मी होईन. ॥434॥ ज्या ज्या पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन. ॥435॥ परंतु जिवंत असतांना अथवा मेल्यावर श्रीगुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिषभर (सुद्धा) गुरूंची सेवा) लोकांवर सोपविणार नाही व अशी ही सेवा कोट्यावधी कल्पांचा काल मोजला तरी चालू राहील. ॥436॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे

    July 30, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये

    July 29, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    By डॉ. शिरीष कुलकर्णीJuly 30, 2026

    आपल्या आत्मिक आनंदासाठी ‘हनुमान चालीसा’ गायन ही खरोखरच एक अद्भुत पर्वणी असते. गोस्वामी तुलसीदास यांनी…

    सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे

    July 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये

    July 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाभीं आपणचि जन्मे ऐसें गुरुमूर्तिप्रेमें

    July 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026

    Recipe : उपवासाचे खमंग मिनी थालिपीठ!

    July 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : श्रीगुरु वोंवाळिजती, कां भुवनीं जे उजळिती

    July 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 379
    • अवांतर 200
    • आरोग्य 134
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 512
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 819
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.