Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता

    September 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    वजाबाकी

    September 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 2, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    यालागीं अर्जुना पाहीं । अध्यात्मज्ञानाच्या ठायीं । जया नित्यबोधु नाहीं । शास्त्रमूढा ॥839॥ तया शरीर जें जालें । तें अज्ञानाचें बीं विरुढलें । तयाचें व्युत्पत्तित्व गेलें । अज्ञानवेलीं ॥840॥ तो जें जें बोले । तें अज्ञानचि फुललें । तयाचें पुण्य जें फळलें । तें अज्ञानचि गा ॥841॥ आणि अध्यात्मज्ञान कहीं । जेणें मानिलेंचि नाहीं । तो ज्ञानार्थु न देखे काई । हें बोलावें असें  ॥842॥ ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता । तया पैलद्वीपीची वार्ता । काय होय  ॥843॥ कां दारवंठांचि जयाचें । शीर रोंविलें खांचे । तो केवीं परिवरींचें । ठेविलें देखे ॥844॥ तेवीं अध्यात्मज्ञानीं जया । अनोळख धनंजया । तया ज्ञानार्थु देखावया । विषो काई  ॥845॥ म्हणोनि आतां विशेषें । तो ज्ञानाचें तत्त्व न देखे । हें सांगावें आंखेंलेखें । न लगे तुज ॥846॥ जेव्हां सगर्भे वाढिलें । तेव्हांचि पोटींचें धालें । तैसें मागिलें पदें बोलिलें । तेंचि होय ॥847॥ वांचूनियां वेगळें । रूप करणें हें न मिळे । जेवीं अवंतिलें आंधळें । तें दुजेनसीं ये ॥848॥ एवं इये उपरतीं । ज्ञानचिन्हें मागुतीं । अमानित्वादि प्रभृती । वाखाणिलीं ॥849॥ जे ज्ञानपदें अठरा । केलियां येरी मोहरां । अज्ञान या आकारा । सहजें येती ॥850॥ मागां श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें मुकुंदें । ना उफराटीं इयें ज्ञानपदें । तेंचि अज्ञान ॥851॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    अर्थ

    याकरता अर्जुना, असे पहा की, ज्या शास्त्रमूढाला अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी नित्य जागृति नाही ॥839॥ त्याला शरीर जे प्राप्त झाले, ते अज्ञानाच्या बीजाचा अंकुर होय. आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल होय. ॥840॥ तो जे जे बोलतो, ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे आणि अरे, त्याची जी पुण्यकर्मे आहेत, ते अज्ञानच फळास आलेले आहे. ॥841॥ आणि ज्याने अध्यात्मज्ञानाला कधीच मानले नाही, तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पाहात नाही, हे सांगावयास पाहिजे काय? ॥842॥ नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही, तोच जो माघारी पळून जातो, त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार? ॥843॥ अथवा घराच्या दाराच्या उंबर्‍यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत पुरले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहील? ॥844॥ त्याप्रमाणे अर्जुना, अध्यात्मज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते जाणण्याला विषय होईल काय? ॥845॥ म्हणून आता तो ज्ञानाचे तत्त्व पाहात नाही, हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको. ॥846॥ जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे, तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते. त्याप्रमाणे वरती ज्ञानाचे जे वर्णन केले, त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे. ॥847॥ वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे स्पष्टीकरण कराण्यास नको. आंधळा मनुष्य जेवावयाला बोलाविला असता तो दुसर्‍या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यावयाचा, तसेच हेही आहे, असे समज. ॥848॥ याप्रमाणे ही ‘अमानित्वादि’ ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली. ॥849॥ कारण की, ज्ञानाची अठरा पदे उलट फिरविली (उदाहरणार्थ, अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे) असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात. ॥850॥ मागे (या अध्यायाच्या) अकराव्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसर्‍या अर्ध्यामधे श्रीमुकुंदाने असे संगितले की, ही ज्ञानपदे उलट केली की तेच अज्ञान होय! ॥851॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    शुक्राचे अध्यात्म

    By अस्मिता दीक्षितSeptember 1, 2026

    || श्री स्वामी समर्थ || जिथे आनंद तिथे शुक्र. शुक्र हा भौतिक सुखाचा मेरुमणी आहे.…

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रेमाथिलेनि भक्तें, जैसेनि भजिजे कुळदैवतें

    August 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता

    September 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    वजाबाकी

    September 1, 2026

    कहाणी एका घटस्फोटाची!

    September 1, 2026

    गणरायाचे डोळे रंगविण्याचे कौशल्य

    September 1, 2026

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 418
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 561
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 28
    • ललित 889
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता

    September 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    वजाबाकी

    September 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.