Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें

    September 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 27 सप्टेंबर 2026

    September 27, 2026

    ग म भ न

    September 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 27, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Fourteen, चौदैवै अध्याय, अध्याय चौदावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय चौदावा

    माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सुफळ । तो वसंतु होय स्नेहाळ- । शिरोमणी ॥21॥ प्रमेयमहापूरें । मतिगंगा ये थोरें । तैसा वरिष उदारे । दिठीवेनी ॥22॥ अगा विश्वैकधामा । तुझा प्रसादुचंद्रमा । करूं मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी ॥23॥ जी अवलोकिलिया मातें । उन्मेषसागरीं भरितें । वोसंडेल स्फूर्तीतें । रसवृत्तीचें ॥24॥ तंव तोषोनि गुरुराजें । म्हणितलें विनतिव्याजें । मांडिलें देखोनि दुजें । स्तवनमिषें ॥25॥ हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं ॥26॥ हो कां जो स्वामी । हेंचि पाहतु होतों मी । जे श्रीमुखें म्हणा तुम्ही । ग्रंथु सांग ॥27॥ सहजें दुर्वेचा हिरु । आंगेंचि तंव अमरु । वरी आला पूरु । पीयूषाचा ॥28॥ तरी आतां येणें प्रसादें । विन्यासें विदग्धें । मूळशास्त्रपदें । वाखाणीन ॥29॥ परी जीवा आंतुलीकडे । जैसी संदेहाची डोणी बुडे । ना श्रवणीं तरी चाडे । वाढु दिसे ॥30॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे, हा दृष्टिबंधु निफजे

    अर्थ

    हे कृपाळू श्रेष्ठा, श्रीगुरो, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूपी चांगले फळ ज्या योगाने येईल, तो वसंतऋतु आपण व्हा. ॥21॥ ज्या योगाने ही बुद्धिरूप गंगा ब्रह्मसिद्धांतरूपी बोधाचा महापूर येऊन चांगली फोफावेल, तसा उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे. ॥22॥ हे सर्व जगताला एकच आश्रय असणार्‍या श्रीगुरुराया, तुझा प्रसन्नतारूप चंद्र माझ्या अंत:करणात उदयास येऊन स्फूर्तिरूप पौर्णिमा करो. ॥23॥ महाराज, आपण माझ्याकडे कृपादृष्टीने पाहिले असता, माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांतादि नवरसांची मोठी भरती येईल. ॥24॥ तेव्हा संतुष्ट होऊन श्रीगुरुराय म्हणाले, ज्ञानदेवा, विनंती करण्याच्या मिषाने स्तुतीच्या पांघरुणाखाली, तू द्वैत केलेस, असे आम्हास दिसून येते. ॥25॥ हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीताग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयी उत्कट इच्छा मोडू देऊ नकोस. ॥26॥ यावर (ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात) : स्वामी महाराज, अशी का आपली इच्छा आहे? मी याचीच वाट पहात होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ‘ग्रंथ सांग’ असे म्हणावे. ॥27॥ हरळीची मुळी स्वभावत: तर अंगाने अमर आहेच, जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला (तर मग तिच्या अमरपणाविषायी शंका धरणे नको). ॥28॥ तर आता या श्रीगुरूंच्या प्रसादाने, मूळ जी गीताशास्त्रातील पदे, ती विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन करीन. ॥29॥ पण (असे वर्णन करीन की) जेणे करून जीवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल. (संशय नाहीसे होतील) एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल. ॥30॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं

    September 26, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे, हा दृष्टिबंधु निफजे

    September 25, 2026 अध्यात्म

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं

    By Team AvaantarSeptember 26, 2026

    अध्याय चौदावा वेद वानूनि तंव चांग । जंव न दिसे तुझें आंग । मग आम्हां…

    सार्थ ज्ञानेश्वरी : कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे, हा दृष्टिबंधु निफजे

    September 25, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें

    September 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 27 सप्टेंबर 2026

    September 27, 2026

    ग म भ न

    September 26, 2026

    बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!

    September 26, 2026

    माहेरपण

    September 26, 2026

    रक्तदाब कमी झालाय… कसे ओळखायचे?

    September 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 450
    • अवांतर 214
    • आरोग्य 151
    • पंचांग आणि भविष्य 600
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 949
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें

    September 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 27 सप्टेंबर 2026

    September 27, 2026

    ग म भ न

    September 26, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.