Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » प्रियकराकडून चौकशी… पण कोरडीच!
    ललित

    प्रियकराकडून चौकशी… पण कोरडीच!

    स्नेहा सुतारBy स्नेहा सुतारApril 2, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, मराठी लेखक, प्रियकराची आठवण, प्रियकराकडून मेसेज, प्रियकराकडून कोरडी चौकशी, ती आणि तो, प्रेमकथा, गोव्याची प्रेमकथा, प्रियकराचा मेसेज,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 8

    किसी रंजिश को हवा दो
    के मैं जिंदा हूं अभी
    मुझको एहसास दिला दो
    के मैं जिंदा हूं अभी…

    स्पीकरवर मंद आवाजात गजल विरघळत होती आणि ती लॅपटॉप घेऊन खिडकीत काम करत होती.

    “आज जायचं नाही का गं कॉलेजला?” आईने तिच्या रूमच्या दरवाजावर येऊन विचारलं.

    “नाही गं. आज ऑन ड्युटी आहे मी. डिपार्टमेंटचं काम आहे एक. जायचंय थोड्यावेळाने तिकडेच. हे एवढं काम करून निघणार मी.”

    “अय्या, म्हणजे आज पण तिकडेच वाटतं तू. रस्ते काय म्हणतायत?”

    “रस्ते गप्प आहेत सगळे… माणसंच कण्हतायत, त्याचा आवाज ऐकू येतोय सगळीकडून.”

    “नाहीतर काय बाई, विकासकाका सांगत होते परवा यांना, रोज पर्वरीला जाईपर्यंत पाठ, कंबर एक होतेय. आज इकडे तर उद्या तिकडे, असं तोंड फुटतंय म्हणे तिकडे रस्त्यांना!”

    हेही वाचा – त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    “मग काय… मागच्या पंधरावड्यात अगं डिपार्टमेंटकडे जायला एक रस्ता होता, आज दुसरीचकडून आहे. काल मला वाटलं, मी पोहोचतेय की, कोण जाणे डिपार्टमेंटला… की लांब नेऊन सोडतायत कुठे! मग आली गाडी जवळ बिल्डिंगच्या… पण हे असं नुसतं रस्ते उघडझाप करणं चालूय. त्यात रस्ते खराब झालेयत. दररोज ये जा करणाऱ्यांनी काय गं करावं? नको होत असेल जीव ना?”

    “मग काय… चांगलं झंजळावून निघत असेल पूर्ण अंग.”

    “हं…  अगं आई मला ते दोन लाडू दे ना डब्यातून न्यायला. बसमध्ये खाईन मी. काल बघ दोन पॉपकॉर्न घेतले. एक तुला एक मला. पर्वरीला कुठे मिळणार काही घ्यायला. लाडू खाईन दिलेस तर…”

    “दिलेस तर म्हणजे? ने ना… करतेय कुणासाठी? तुमच्याचसाठी ना! उलट बरे ते हेल्दी. डबा आहे बघ छोटा तो फडताळात. त्यातून घेऊन जा.”

    असं सांगून आई पुन्हा आपल्या सकाळच्या कामाला लागली. तिने पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घातलं.

    “Oye…” मोबाइलवर मेसेज पडला.

    ‘Gm’ तिने रीप्लाय केला.

    ‘Gm’

    ‘काय करते गं?’

    ‘काही नाही, जरा लॅपटॉपवर काम करत बसले आहे. आता जाईन थोड्यावेळात मीटिंगला…’

    ‘मीटिंग कुठे आहे गं? कसली मीटिंग?’

    ‘आज पर्वरीला. डिपार्टमेंटमध्ये बोलावलं आहे.’

    ‘अच्छा… घरी कधी?’

    ‘साडेचारची वेळ दिली आहे लेटरमध्ये.’

    ‘अच्छा. बसने ना?’

    ‘हो.’

    ‘पाऊस आहे आज?’

    ‘नाही.’

    ‘चल मग. काळजी घे. मी चाललो बाहेर.’

    ‘बरं.’

    तिला खरं तर बोलायचं नव्हतं, पण बोलल्याशिवाय राहवत पण नाही… आज साहेब असे इतक्या चौकशा कसे करतायत? तिला आश्चर्य वाटलं. नकोच याचा विचार म्हणून तिने मान झटकली. कालच्या मीटिंगचा रिपोर्ट लवकर पूर्ण करून तिला निघायचं होतं म्हणून पुन्हा तिने स्वतःला लॅपटॉपच्या स्क्रीनवर गाडून घेतलं…

    “आई येते गं.” म्हणून तिने दार लावून घेतलं. आईने “सावकाश चल” म्हटलेलं तिला दारात ऐकू आलं. ती गोड हसली आणि जायला निघाली.

    बसमध्ये आज गर्दी नव्हती त्यामुळे सीट लगेच मिळाली. बसल्यावर तिने आधी इअरफोन कानाला लावले. प्ले-लिस्ट सुरू केली…

    तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही,

    तुला बोलावता पोचायचा पाऊसही

    सलीलचा आवाज ऐकल्यावर तिला छान वाटलं. पाऊस नव्हता आणि तसं ऊनही नव्हतं… त्यामुळे तिला खिडकीतून येणारा वारा तसा बरा वाटला. मात्र, त्यात दिवस पुढे पुढे नेणारी ऊब होती. काहीशी आपल्या अंगाला चटका लावणारी… तिने डोळे बंद केले आणि खिडकीच्या फ्रेमवर डोकं टेकवलं. गाणं ऐकता ऐकता तिला डोळा लागला.

    बस म्हापश्याला पोहोचतात तिला जाग आली. लोकं बसमधून उतरू लागली. बसमधल्या उरलेल्या काही माणसांनी आपापल्या सीटा बदलून घेतल्या. मागचे लोक पुढे आले. खाली कंडक्टर “पणजे पणजे डायरेक पणजे” ओरडत होता. बसस्टॅण्डवर बरेच खड्डे दिसत होते रस्त्यात. एवढ्या बसेस रोज इथे येतात जातात, आत बाहेर होतात, मग इथला रस्ता नीट नको? कुणी लक्ष तरी देतं की नाही इकडे या अशा गोष्टींकडे? चांगली डझनभर पॅसेंजर आत घेऊन गाडी निघाली. होडीत पाण्यातून प्रवास केल्यासारखी बस हेलकावे खात बसस्टॅण्डवरून बाहेर पडली.

    पर्वरीला स्टॉप येईस्तोवर सलील तिच्या कानाशी गात होता. फक्त ती आणि सलील असे दोघेही प्रवास करत होते बसमध्ये आणि हे कुणालाच आजूबाजूला कळलं नव्हतं. काही माणसं अशा प्रकारे कुठे कुठे असू शकतात, नाही का? प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्ष! तीही तर त्याच्यासोबत वावरत असते. तो असतोच तिच्यासोबत. चालत असतो सोबत. आता पण होता. सोबतच…

    ‘पोहोचलीस का?’

    बघितलंत??? त्याचा मेसेज. ती बसमधून उतारायला, एवढ्यात फोनवर मेसेज.

    ‘आत्ता बसमधून उतरतेय.’ रस्त्यावरून चालता चालता तिने रीप्लाय केला.

    ‘बरं. पर्वरीला कुठे त्या कार ॲक्सेसरीजच्या दुकानाकडेच ना गं?’

    ‘हो.’

    ती डिपार्टमेंटच्या इमारतीत पोहोचली तर, समोर गोवर्धन सर! हातात फाइल्स घेऊन ते मीटिंगच्या हॉलमध्ये जात होते. त्यांना बघून तिने हातातला फोन बॅगमध्ये ठेवला. गोवर्धन सर म्हणजे तिच्यासाठी एक आदरणीय मार्गदर्शक होते. त्यांना बघून ती हसली आणि मान खाली झुकवून तिने नमस्कार केला.

    “सुप्रभात सर…”

    तिला बघून त्यांनीही मान हलकेच खाली लववून हसून नमस्कार केला.

    “सुप्रभात… करूयात थोड्याच वेळात मीटिंगला सुरुवात. चहा नाश्ता करून या. कँटीनमध्ये सोय केली आहे.”

    “होय सर, आलेच पाच मिनिटांत,” असे म्हणून ती कँटीनच्या दिशेने निघाली. आज अगदी कामात दिवस जाणार होता. चहा घेता घेता तिने त्याला मेसेज केला.

    ‘चहा घेतेय. आता जाईन मीटिंगला. आठवण आलीच तर मेसेज कर बाबा. मला तुझी खूप आठवण येतेय…’

    ‘काळजी घे…’

    कँटीनवाल्या दादाच्या काऊंटरवर पोऱ्या रेडिओवर काहीतरी लावायचा प्रयत्न करत होता. त्याला कोणतेच स्टेशन नीट मिळत नव्हते.

    हेही वाचा – त्याच्या आठवणींची खोल दरी…

    तिने चहा संपेपर्यंत त्याच्या रीप्लायची वाट पाहिली. मग मोबाइल सायलंटवर ठेऊन तिने तो बॅगमध्ये टाकला. उठून ती काऊंटरपाशी गेली. पोऱ्या त्या रेडिओला आता हाताने फटके मारून स्टेशन मिळवण्याचा प्रयत्न करत होता…

    “अरे, ऐसा मत करो. लगेगा ना उसको!” तिने गमतीने त्याला म्हटले.

    “लगता है तो गाना लगेगा ना मॅडम!”

    ती हसली आणि तिने काही चॉकलेट्स त्याला द्यायला सांगितले. चॉकलेटसाठी सुट्टे पैसे देऊन तिने उरलेले सुट्टे बॅगमध्ये ठेवले आणि ती जायला वळली. इतक्यात मागून गाणं सुरू झालं…

    हम तेरे प्यार में सारा आलम
    खो बैठे हैं, खो बैठे
    तुम कहते हो कि ऐसे प्यार को
    भूल जाओ, भूल जाओ
    हम तेरे प्यार में सारा आलम…

    काय गंम्मत आहे ना… माणूस कोरडा आणि चौकशी पण करतोय. पण स्वतःला हवं तेव्हा! तिला कुठे काय वाव? बघू, पुढे काय होतंय! पुढच्याच भागात…

    क्रमश:

    स्नेहा सुतार

    Related Posts

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026 ललित

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026 ललित

    चमचम

    August 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    By प्रणाली मंगेश महाशब्देAugust 22, 2026

    I Love You! तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर, झालं असं की, काल आम्ही सगळे…

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.