Author: सुधीर करंदीकर

Avatar photo

मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

आज 23 एप्रिल… म्हणजे ‘जागतिक पुस्तक दिन’ (World Book Day). युनेस्कोद्वारा (UNESCO) घोषित हा दिवस वाचनाचा आनंद घेणे, पुस्तकांचे महत्त्व समजून घेणे आणि प्रकाशकांना प्रोत्साहन देणे यासाठी साजरा केला जातो… पुस्तक वाचन ही मानसिक, बौद्धिक आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर सवय आहे. वाचनामुळे तणाव कमी होतो, ज्ञान आणि शब्दसंग्रहात भर पडते, एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि विचारप्रक्रिया व्यापक होते. पुस्तक वाचनाचे प्रमुख फायदे : तणावमुक्ती (Stress Relief) : फक्त 6 मिनिटे वाचन केल्याने तणाव 68% पर्यंत कमी होऊ शकतो. हे संगीत ऐकण्यापेक्षा किंवा चालण्यापेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. वाचनामुळे नवनवीन गोष्टी, संस्कृती आणि विचार समजतात, ज्यामुळे ज्ञानाचा परिघ विस्तारतो. नियमित वाचनामुळे…

Read More

रोज सकाळी 40 ते 45 मिनिटे फिरणे यासारखा सुंदर आणि सोपा व्यायाम नाही. फिरताना छोटीशी पथ्य पाळायची असतात… ती म्हणजे, फिरताना हातात मोबाइल नाही आणि घरगुती गप्पा नाहीत. फिरताना भेटणाऱ्यांना ‘हाय’ ‘हॅलो’ करत चालत राहिलो, तर चेहेरा आनंदित राहतो, आणि मन पण प्रसन्न राहते… आणि एखादी वेगळी सकाळ अशी पण असते – खरंतर सकाळ ही रोजच वेगळी असते, पण आजची सकाळ जरा हटके, म्हणजे वेगळ्यातली वेगळी होती! आम्ही सकाळी  साधारण 7 – 7:15 वाजता बाहेर पडतो. ही वेळ ऑफिसची असल्यामुळे, रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी कंपन्यांच्या बसचे पिक-अप पॉइंट्स आहेत. काही ठिकाणी कॅबचे पिक-अप पॉइंट्स आहेत. त्यामुळे फिरण्याच्या पूर्ण रस्त्यावर, या वेळेला फुटपाथवर…

Read More

नोकरीमधला सगळ्यात मोठा पीरियड मी तेव्हाच्या टेल्कोमध्ये घालवला. चिंचवडला फौंड्री या विभागामध्ये तेव्हा मी काम केले. फौंड्री म्हणजे इथे लोखंडाचा रस तयार करतात आणि तो रस निरनिराळ्या साच्यांमध्ये ओतून गाड्यांना लागणारी कास्टिंग तयार करतात. मी मेंटेनन्स म्हणजे मशीनची दुरुस्ती आणि देखभाल या विभागात काम करत होतो. त्यामुळे माझ्याकरिता 8 तासांच्या शिफ्टची नोकरी असा प्रकार नव्हता. बऱ्याच वेळा दोन किंवा तीन शिफ्ट पण थांबावं लागायचं. एकदा शॉपमध्ये मेजर ब्रेक डाऊन आल्यामुळे, मी सलग पाच शिफ्ट काम केले आहे. म्हणजे, आज सकाळी कामावर गेलो आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12.30 वाजता घरी आलो. तेव्हा घरी फोन करून काही कळवण्याची सोय पण नव्हती. बायकोला…

Read More

विदर्भामध्ये वाशिम या छोट्या गावात आम्ही राहात होतो. आमचं बालपण तिकडेच गेलं. पाचवी ते 11वी म्हणजे मॅट्रिकपर्यंत सरकारी शाळेत शिक्षण झाले. त्यावेळी शाळेची फी, माझ्या आठवणीप्रमाणे, 13 आणे होती. शाळा घरापासून बऱ्यापैकी लांब होती. शाळेत चालत जायचे आणि चालत परत यायचे. सायकल, रिक्षा हे त्यावेळी आटोक्याबाहेरचे होते. स्कूल व्हॅन हा प्रकार तर तेव्हा अस्तित्वातच नव्हता! शाळेत जाण्याकरिता दोन हाफ पॅन्ट आणि दोन बुशशर्ट… आणि इतर वेळी वापरण्याकरिता एक जास्तीची हाफ पॅन्ट आणि शर्ट एवढेच कपडे असायचे. बूट मोजे हा प्रकार देखील आमच्या ऑटोक्यामधला नव्हता. पायात साधी चप्पल असायची. पण यामध्येच आम्ही मस्त असायचो आणि एन्जॉय करायचो… घराच्या आसपास राहणारे मित्र…

Read More

जागतिक आनंद दिन (International Day of Happiness) दरवर्षी 20 मार्चला जगभर साजरा केला जातो. लोकांना आयुष्यात आनंदाचे महत्त्व पटवून देणे, मानसिक आरोग्य सुधारणे आणि जगभरात सकारात्मकता पसरवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. भूतान देशाच्या पुढाकाराने, संयुक्त राष्ट्र महासभेने 12 जुलै 2012 रोजी ठराव मंजूर करून 20 मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिन’ म्हणून घोषित केला. 2013पासून हा दिवस साजरा केला जात आहे. दरवर्षी या दिनाकरिता वेगळी वेगळी थीम असते. यावर्षी थीम होती – ‘Caring and Sharing’. ही थीम आपण कशी आचरणात आणायची ते बघूया – आपल्या आसपास असणाऱ्यांची आणि ज्यांना गरज आहे अशांची नेहमी काळजी करणे, काळजी घेणे आणि आनंद पसरविणे.…

Read More