Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…
    ललित

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरApril 9, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, टेल्कोतील नोकरी, टेल्कोतील अनुभव, टेल्को फौंड्री, टेल्कोतील भट्टी उभारणी, जर्मनीच्या रॉबर्टची टोपी, रॉबर्टची आठवण, रॉबर्टसमवेतचा सुखद अनुभव
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी (प्रातिनिधीक))
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नोकरीमधला सगळ्यात मोठा पीरियड मी तेव्हाच्या टेल्कोमध्ये घालवला. चिंचवडला फौंड्री या विभागामध्ये तेव्हा मी काम केले. फौंड्री म्हणजे इथे लोखंडाचा रस तयार करतात आणि तो रस निरनिराळ्या साच्यांमध्ये ओतून गाड्यांना लागणारी कास्टिंग तयार करतात. मी मेंटेनन्स म्हणजे मशीनची दुरुस्ती आणि देखभाल या विभागात काम करत होतो. त्यामुळे माझ्याकरिता 8 तासांच्या शिफ्टची नोकरी असा प्रकार नव्हता. बऱ्याच वेळा दोन किंवा तीन शिफ्ट पण थांबावं लागायचं. एकदा शॉपमध्ये मेजर ब्रेक डाऊन आल्यामुळे, मी सलग पाच शिफ्ट काम केले आहे. म्हणजे, आज सकाळी कामावर गेलो आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12.30 वाजता घरी आलो. तेव्हा घरी फोन करून काही कळवण्याची सोय पण नव्हती. बायकोला माहीत असायचं की, हे आले नाहीत म्हणजे कंपनीमध्ये आहेत आणि काळजीचे काही कारण नाही. जास्त थांबल्याचा फायदा म्हणजे नंतर कॉम्पेन्सेटरी ऑफ घेता यायचा.

    हेही वाचा – कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    लोखंडाच्या रसाची हाताळणी सतत होत असल्यामुळे असुरक्षितता, मशीनचे कर्कश्य आवाज, आणि शॉपमध्ये चांगल्यापैकी एक्झॉस्ट सिस्टीम असूनही खूप धूळ… असे वातावरण कायमच असायचे. पण सवय झाल्यानंतर त्याचे काही वाटायचे नाही.

    लोखंडाचा रस करण्याकरिता आमच्याकडे 12 टन क्षमतेच्या तीन वीजभट्ट्या होत्या. अजून सुधारणा करण्याकरिता 40 टन क्षमतेची होल्डिंग फर्नेस घेण्याचे मॅनेजमेंटने ठरवले. आपली  8 फूट बाय 8 फूट खोली  असते, तेवढी मोठी ही भट्टी असणार होती. 1978 सालची ही गोष्ट. त्याप्रमाणे स्वीडन मधल्या ASEA या कंपनीच्या नावे ऑर्डर निघाली. भट्टीचे सगळे सामान आले आणि भट्टीची उभारणी करण्याकरिता स्वीडनचे इंजिनीअर निमीनन इथे आले. उभारणी करण्यात त्यांच्याबरोबर काम करण्याची मला छान संधी मिळाली. कधी कधी निमीनन यांना कारमधून हॉटेलमध्ये सोडणे किंवा तिथून ऑफिसला आणणे, हे काम माझ्याकडे यायचे. कारमध्ये बसल्यावर ते डोळे मिटून बसायचे… का? तर, रस्त्यावरची बेशिस्त ट्रॅफिक बघून त्यांना टेन्शन यायचे. ते म्हणायचे, स्वीडनमध्ये कोणीही, कुठलाही ट्रॅफिक नियम कधीच मोडत नाही. त्यामुळे रस्त्यावर एकदम सुरक्षित वाटते. इथे अगदीच विरुद्ध आहे. मी चूप व्हायचो, काय उत्तर देणार!

    निमीनन यांचे भट्टी उभारणीचे काम संपले आणि ते परत गेले. भट्टी सुरू करण्याकरिता कमिशनिंग इंजिनीअर ही वेगळी व्यक्ती येते. त्याप्रमाणे ASEA कंपनीचे जर्मनीमधले  रॉबर्ट इथे आले. कारमधून ऑफिससमोर उतरल्यावर ते बॅगेतून एक नवीनच घेतलेली कॅप काढायचे आणि डोक्यावर घालायचे. त्यावर समोरच्या फ्लॅप वर ASEA असे लिहिलेले होते. शॉपमध्ये काम करताना त्यांच्या डोक्यावर ती कॅप कायम असायची. त्यांच्याबरोबर पण काम करण्याची मला छान संधी मिळाली. त्यामुळे शिकायला पण भरपूर मिळाले. म्हणता म्हणता रॉबर्ट यांचे काम संपले, भट्टी व्यवस्थित सुरू झाली, तिचा वापरही सुरू झाला. रॉबर्ट यांची परत जाण्याची वेळ जवळ आली.

    त्यावेळी चौधरी साहेब हे फौंड्रीचे प्रमुख होते. रॉबर्ट यांच्या जाण्याच्या दिवशी सकाळी 11 वाजता चौधरी साहेबांनी स्पेशल मीटिंग बोलावली. सगळ्या डिपार्टमेंट्सचे प्रमुख, संबंधित स्टाफ यांना बोलावले होते. अर्थात, मी पण त्यामध्ये होतोच. रॉबर्टही हजर होते. ऑफिसच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मोठे अंडाकृती टेबल आहे. दोन्ही टोकांना एक एक खुर्ची आणि दोन्ही बाजूला साधारण 8-8 खुर्च्या आहेत… आणि बाजूला भिंतीलगतही खुर्च्या आहेत. महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे सकाळी 11 वाजताच हॉल पॅक झाला…

    चौधरी साहेब पहिल्या चेअरवर बसले होते आणि त्यांच्या डाव्या बाजूला रॉबर्ट बसले. माझा नंबर टेबलच्या दुसऱ्या टोकाच्या म्हणजे चौधरी साहेबांच्या बरोबर समोर दुसऱ्या टोकाच्याच्या खुर्चीवर लागला… फर्नेस व्यवस्थित सुरू करून दिल्याबद्दल रॉबर्ट यांना पुष्पगुच्छ आणि गिफ्ट देऊन त्यांचे आभार मानले. आता रॉबर्ट यांचे काम संपले आहे आणि आज दुपारी ते आपल्या मायदेशी परत जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

    “त्यांच्या संपर्कात राहून सगळ्यांनी आवश्यक ती माहिती घेतली असेलच, पण अजून कुणालाही काही शंका असतील, तर त्या त्यांनी रॉबर्ट यांना जरूर विचाराव्या… जेणेकरून आपल्या सगळ्यांना फर्नेसचा वापर करताना यापुढे काहीही अडचण येणार नाही, असे सांगून त्यांनी पुढची सूत्रे रॉबर्ट यांच्याकडे दिली.

    रॉबर्ट :  (जर्मनीमध्ये रहात असूनही इंग्रजीव) माझ्या कामात सगळ्यांनीच छान सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. माझे सगळेच काम खेळीमेळीच्या वातावरणात छानच झाले. माझ्या राहण्याची आणि इथे रोज जाण्या-येण्याची पण व्यवस्था खूपच छान होती. तुमच्या शंका काही असतील तर जरूर विचारा…

    (सगळ्यांना वाटले की, आता लोक शंका विचारतील आणि रॉबर्ट उत्तरे देतील)

    पण रॉबर्ट यांनी एकदम गुगली टाकली. त्यांनी स्वतःच्या डोक्यावरची ASEA लिहिलेली कॅप हातात घेतली आणि टेबलवरून  ती  माझ्याकडे भिरकावली.  कॅप बरोब्बर माझ्यासमोर येऊन थांबली.

    रॉबर्ट : Karandikar,  This cap is for you and cap is now yours.

    रॉबर्ट : (सगळ्यांना उद्देशून) चौधरी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शंका जरूर विचारा, पण त्यांना मी उत्तरे देणार नाही, माझ्या वतीने मिस्टर करंदीकर उत्तरे देतील…

    मी स्वतःला चिमटा काढून जागे असल्याची खात्री करून घेतली. माझ्या बाजूला बसलेल्यांनी हात मिळवून माझे अभिनंदन केले.

    प्रश्नोत्तरे सुरु झाली. सगळ्यांनीच सहभाग घेतला. थोड्याच वेळात चहा आणि बिस्किटे आली. दुपारी 1 वाजता मीटिंग संपली. सगळ्यांनी रॉबर्ट यांना बाय बाय केले आणि आम्ही जेवायला कँटीनमध्ये गेलो.

    हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…

    असा आणि इतका विश्वास  कोणी अनोळखी परदेशी माणूस आपल्यावर दाखवू शकतो, हा एक आगळा वेगळा आणि स्फूर्तिदायक अनुभव आज मला मिळाला. (मी मनात देवाचे आभार मानले आणि फौंड्रीचे आभार मानले, आणि रॉबर्ट यांचेही आभार मानले…)

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    सार्थक

    August 3, 2026 ललित

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026 ललित

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सार्थक

    By अतुला प्रणव मेहेंदळेAugust 3, 2026

    “नमू, अगं चल नाश्ता करून घे. तुला आवडतात ते डिंकाचे दोन लाडू आणि अळीवाची खीर…

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : भलतेथ बुद्धी बळी, रजे आरिसा उजळी

    August 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑगस्ट 2026

    August 3, 2026

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 382
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 518
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 825
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.