Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चांगुलपणाचा असाही अनुभव
    ललित

    चांगुलपणाचा असाही अनुभव

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरApril 27, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, लघुकथा, रिक्षावाल्याचे कन्याप्रेम, चांगुलपणाचा प्रत्यय, रिक्षावाल्याची खमण खरेदी, रि७वाल्याचा चांगुलपणा, प्रेम द्या प्रेम घ्या
    फौटो सौजन्य -- गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आपल्या सगळ्यांकडेच छान छान आठवणींचा छोटा-मोठा खजिना हा असतोच असतो.     माझी अशीच एक आठवण शेअर करत आहे… (‘ही सत्य घटना आहे,’ असा उल्लेख मुद्दाम करतो आहे, कारण माझे बरेच लेख काल्पनिक असतात.) बऱ्याच वेळेला आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो की, ज्या समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद आणू शकतात आणि आपल्या चेहऱ्यावर पण आनंद आणू शकतात…

    बऱ्याच वेळेला बावधनहून कर्वेनगरला घरी जाताना माझा ऑटो रिक्षेशी संबंध येतो. एक दिवस बावधनहून गुजरात कॉलनीपर्यंत (अंतर साधारण दोन किलोमीटर) मी पीएमटी बसने आलो. गुजरात कॉलोनीमधून कोथरूड भाजी मंडईपर्यंत पाच ते सात मिनिटांचे अंतर चालत गेलो आणि तिथून ऑटो करून घरी जाणार होतो.

    कोपऱ्यावरच्या फरसाणच्या दुकानासमोर एक ऑटो उभी दिसली. तिथपर्यंत पोहोचलो आणि नेमके तेव्हाच ड्रायव्हर रिक्षेतून खाली उतरून बाहेर पडत होते…

    “दादा, कर्वेनगरला चलणार का?” – मी

    हेही वाचा – कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    “चला…” असे म्हणत ड्रायव्हर मागे वळले.

    मी :  तुम्ही दुकानात जात होता का? तुम्हाला या दुकानातून काही घ्यायचंय का?

    ड्रायव्हर : सकाळी निघताना मुलीने सांगितलं होतं, येताना ढोकळा आणा. तिला ढोकळा खूप आवडतो. इथे ढोकळा चांगला मिळतो. पण तुम्ही बसा, आधी तुम्हाला सोडतो. ढोकळा पुढे कुठेतरी घेईन.

    मी  :  दादा, मुलीकरिता ढोकळा घेऊन या. मला 5 ते 10 मिनिटे उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. ढोकळा घेऊन या, मी थांबतो.

    पाच मिनिटांत ड्रायव्हर हातात एक पाकीट घेऊन आले आणि गाडी सुरू केली. त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघून मी जाम खूश झालो. मुलीच्या आवडीचा ढोकळा आज घरी गेल्यानंतर मुलीला दिल्यावर ती खूश होणार, हाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

    हेही वाचा – अवघ्या पंधरा दिवसांत 5 रुपयांचे झाले 500 रुपये!

    थोडं पुढे गेलो आणि माझ्या लक्षात आलं की, मीटर सुरू करायचं राहिलं आहे.

    मी  : दादा, मीटर सुरू करायचं राहिलं आहे, सुरू करा.

    ड्रायव्हर :  काका राहू द्या.  तुमच्या मनाला येईल तेवढे पैसे द्या.

    माझी उतरण्याची जागा आली. मी नेहेमी देतो तेवढे पैसे दिले, त्यांनी ते मोजले पण नाहीत आणि खिशात ठेवले.

    ‘धन्यवाद’ आणि ‘पुन्हा भेटू’ची आनंदी चेहऱ्यांनी देवाण घेवाण झाली आणि आम्ही आपापल्या मार्गाला लागलो. मजा आली.

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026 ललित

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026 ललित

    एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    April 25, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    By सतीश बर्वेApril 27, 2026

    माँ आज तुझी रोजच्या पेक्षा जास्त आठवण आली गं. कारण अगदीच क्षुल्लक होते. मी दोन…

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    April 25, 2026

    फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026

    चांगुलपणाचा असाही अनुभव

    April 27, 2026

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 280
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 398
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 582
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.