Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…

    May 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…
    ललित

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    मधुर सुनील कुलकर्णीBy मधुर सुनील कुलकर्णीMay 2, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, गौरी आदिनाथ प्रेमकथा, मराठी प्रेमकथा, आदिनाथ जोसेफ प्रेमकथा, गौरीचे कौन्सिलिंग करिअर, कोपिष्ट नाना, आदिनाथचे ममा डॅड, आदिनाथ गौरी क्लासमेट, गौरीची दु:खद कथा, गौरीचे डिप्रेशन, गौरीचा फसलेला विवाह, गौरीचा घटस्फोट, व्यसनी सौमित्रशी गौरीचा विवाह, आदिची गौरीला आश्वासक साथ
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    गौरी आणि आदिनाथबद्दल शैलाच्या कानावर आलं. “गौरी, सावध हो. तुझी पावलं जिकडे वळताहेत तो मार्ग तुझा नाही. मला सगळं कळलं आहे. आदिनाथला भेटणं बंद कर.”

    गौरी धीर गोळा करून म्हणाली, “मी प्रेम करते आदिनाथवर. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे.”

    “डोकं ठिकाणावर आहे का तुझं? ख्रिश्चन मुलाशी लग्न करणार तू?”

    “धर्म बघून कुणी प्रेम करतं का आई?”

    “गौरी, जरा विचार करून बोल. आपल्या घरचं वातावरण तुला माहिती असून तू वाहवत गेलीस.”

    “आई, आम्ही कुठलीही मर्यादा ओलांडली नाही. आदि इतका संयमी, समंजस मुलगा शोधून सापडणार नाही.”

    गौरीचा तो निश्चय बघितला आणि शैलाला नानांची भीती वाटायला लागली. शैलाने नानांजवळ तिच्या लग्नाचा विषय काढला.

    “गौरीसाठी मुलं बघायला सुरुवात करा.”

    “शैला, अजून तिचं एमए पूर्ण व्हायचं आहे. ते तरी पूर्ण होऊ दे.”

    “लग्न ठरेपर्यंत तीच वेळ येते. फार उशीर नको.”

    नानांजवळ गौरीबद्दल शैलजा काही बोलू शकत नव्हती. त्याचे विपरित परिणाम होऊन काहीतरी भलतंच घडलं असतं. शैलाने वधू-वर सूचक मंडळात गौरीचे नाव नोंदवले.

    0000

    “गौरी, जरा बाहेर ये.”

    नानांची हाक आली तशी गौरी खोलीच्या बाहेर आली.

    “उद्या आपट्यांकडल्या नवचंडीच्या यज्ञाला तू आणि आई दोघीही माझ्याबरोबर चला. तुला आग्रहाचे आमंत्रण आहे. त्यांचा मुलगा सौमित्र युएसला असतो. तो महिनाभर रजेवर आला आहे.”

    हेही वाचा – एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    गौरीने काही न बोलता मान हलवली. उद्या यज्ञाला जायचं म्हणजे कॉलेजला जाता येणार नाही. आदि भेटणार नाही. तिने व्हॉट्सॲपवर त्याला मेसेज टाकला. गौरीला खरंतर अजिबात जायची इच्छा नव्हती. श्रीमंत लोकांकडे गेलं की, तिला दडपण यायचं. तिच्या राहणीचं, तिच्या दिसण्याचं! आणि आपटे म्हणजे बडं प्रस्थ होतं. त्यांच्या मालकीच्या दोन फॅक्टरी होत्या. प्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्यांचं नाव होतं. त्यांच्याकडे सतत पूजा, यज्ञ सुरू असायचे आणि त्यासाठी त्यांना गुरुजी म्हणून नानाच हवे असत.

    गौरीने तिच्या मैत्रिणीला फोन केला… “प्रीती, उद्या मला कॉलेजला यायला जमणार नाही. नोट्स मला नंतर देशील… आणि आदिला माझा निरोप दे.”

    आपट्यांकडे जाताना शैलाने गौरीला बजावलं, “गौरी साडी नेसून चल.”

    “काय ग आई! आधीच मला फक्त सलवार कमीज घालायचं बंधन आहे. माझ्या मैत्रिणी किती नवीन ड्रेसेस घालून कॉलेजमध्ये येतात. माझ्या या राहणीची मला लाज वाटते.”

    “नानांना आवडत नाही तुला माहितीय ना, परत तेच का बोलते? आपल्या घरचं वातावरण आहे तसं! तुला काही कमी तर नाही पडू देत ना ते!”

    गौरी मुकाट्याने साडी नेसली. आपट्यांकडलं ऐश्वर्य बघून गौरीचे डोळे दिपले. सगळं फर्निचर, सामान अद्ययावत, उंची होतं. तिचं दडपण जास्तच वाढलं.

    पूजा होत आली होती, इतक्यात गौरीला आपटे काकूंनी किचनमध्ये बोलावलं, “गौरी, तू पण आत ये की. आईजवळ बस.”

    गौरी उठली आणि आपटे काकूंच्या मागोमाग गेली. शैला सगळ्या गुरुजींच्या जेवणाची तयारी करत होती… “आई मी घरी जाऊ का?” गौरीने विचारलं.

    “गौरी, इथे तुझी मदत व्हावी म्हणून तुला आणलं आहे. जेवणाची तयारी कर जरा. ताट, वाट्या पुसायला घे.”

    गौरीला हे अजिबात आवडलं नाही. घरात इतके नोकर असताना आईने हे काम आपल्याला सांगावं, हे गौरीला अजिबात पटलं नाही. तिने नाराजीनेच सगळं केलं. आपट्यांकडला यज्ञ पार पडला आणि गौरीला कधी घरी जाते असं झालं. पुसलेली ताटं बाहेर नेताना गौरीची दारात एका तरुणाशी टक्कर झाली. सिगरेटचा उग्र दर्प गौरीला जाणवला आणि तिने मान वळवली, “आर यु गौरी?”

    गौरीने फक्त मान हलवली आणि तिथून बाजूला झाली. तिला आदिनाथची तीव्रतेने आठवण झाली. इतक्यात तिच्या मोबाइलची रिंग वाजली. आदिनाथचा फोन होता. ती कोपऱ्यात गेली आणि तिने फोन घेतला. “गौरी, निरोप मिळाला. कुठे जाणार होतीस? मला काही बोलली नाहीस. उद्या येते आहेस न कॉलेजमध्ये?”

    “हो, उद्या येते आहे. आदि, लव्ह यु!” गौरीच्या अंगावर रोमांचं आले.

    “पहिल्यांदा तुझ्याकडून हे ऐकलं. से इट अगेन…” आदिनाथ तिला चिडवत म्हणाला.

    “आदि…” गौरीने सुखाने डोळे मिटले.

    0000

    रात्री व्हॉट्सॲपवर तासभर बोलत होती. तिचं आदिनाथवर प्रेम आहे, हे हिम्मत करून ती नानांना सांगणार होती. त्या रात्री स्वप्नात सारखा आदिनाथ येत होता.

    सकाळी गौरी उत्साहाने उठली. गाणं गुणगुणत किचनमध्ये जाणार इतक्यात तिच्या कानावर शब्द पडले…

    “आपटे वहिनींनी गौरीला मागणी घातली आहे. मी होकार दिला आहे. इतकं बडं स्थळ, इतकी धार्मिक, चांगली माणसं शोधूनही सापडणार नाहीत… आणि सौमित्रमध्ये नकार देण्यासारखे काहीच नाही. शिकलेला, देखणा, अमेरिकेत उच्च पदावर आहे. त्याला देखील गौरी खूप आवडली आहे. लग्न करूनच तो युएसला जाईल. गौरीचे व्हिसाचे काम झाले की, ती नंतर जाईल. साखरपुडा नकोच म्हणाले. मलाच मुहूर्त काढायला सांगितला आहे. पुढच्या आठवड्यातच उत्तम मुहूर्त आहे. ठरवून टाकू.”

    “बरं झालं, काळजीच मिटली,” शैला खुशीत म्हणाली.

    गौरीने दारावरची पकड घट्ट केली. डोळ्यात आसवं, मनात राग, भीती सगळं उफाळून आलं. ती नकळत ओरडली, “नाना, मला हे लग्न करायचं नाही.”

    “अगं पण का? इतकं चांगलं स्थळ चालत आलं आहे.”

    “नाना, प्लिज माझं ऐका,” गौरी रडत म्हणाली.

    “आईवडिलांना सोडून जायचं म्हणून तिला रडू येतंय. तुम्ही काळजी करू नका. गौरीचा होकार आहे.”

    “आई, मला बोलू दे.”

    “गौरी, तुला नानांची शपथ आहे, या मुलाला नकार देऊ नकोस!”

    उभ्या जागी गौरी थिजली. आईच मुलीला वडिलांची शपथ घालत होती. बाळबोध वातावरणात वाढलेली गौरी मूग गिळून गप्प बसली. मनात आदिची मनोमन क्षमा मागितली. तिची वाट आता तिला एकटीलाच चालायची होती. आदिचा हात सुटला होता…

    0000

    शेवटच्या पेशंटचे कोन्सल्लिंग झाले आणि पूर्वाने हातात मोबाईल घेतला…

    “हॅलो, आदिनाथ! पूर्वा बोलतेय. उद्या संध्याकाळी आठ वाजता तू माझ्या क्लिनिकमध्ये येऊ शकशील? एक सिव्हीअर डिप्रेशनची केस आहे. आय एम ट्राइंग माय बेस्ट पण तुझी मदत हवी आहे.”

    “शुअर! सव्वा आठपर्यंत येतो.” आदिनाथने होकार दिल्यावर पूर्वाला बरं वाटलं. एमए सायकॉलॉजी करून आदिनाथने पीएचडी केलं होतं. कितीतरी डिप्रेशनच्या पेशंट्सना त्याने त्यातून बाहेर काढलं होतं. तो एक नामांकित सायकॉलॉजीस्ट म्हणून पुण्यात प्रसिद्धीस येत होता.

    आदिनाथ पूर्वाच्या केबिनमध्ये आला…”हाय पूर्वा!”

    “हाय आदि! आज पेशंटचे तिसरे सीटिंग आहे. नो रिस्पॉन्स!”

    “फाईल बघू.” आदिनाथने फाइल उघडली. पेशंटचं नाव होतं… गौरी बापट. त्याने फोटो बघितला आणि त्याला धक्का बसला. गौरी मनोरुग्ण? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून पूर्वाने विचारलं, “आदि, तू ओळ्खतोस का हिला?”

    “हो, माझ्या कॉलेजमध्ये माझ्याच क्लासमध्ये होती. शिक्षण अर्धवट सोडून लग्न करून युएसला गेली होती. स्ट्रेंज! एक सायकॉलॉजीची विद्यार्थिनी मनोरुग्ण व्हावी?”

    इतक्यात रीसेप्शनिस्टने पेशंटला आत पाठवलं. समोर गौरीला बघून आदिनाथ चरकला. डोळ्याखाली गडद काळी वर्तुळं, निर्जीव डोळे, कुठल्याही भावना नसलेला भकास चेहरा! छे, ही माझी गौरी असूच शकत नाही. तो निरागस गोडवा, ते लांब केस, चेहऱ्यावर असलेले सात्विक भाव… सगळं सगळं हरवलं होतं. गौरीबरोबर तिची मावशी आली होती.

    गौरी खुर्चीवर बसणार इतक्यात तिचं लक्ष आदिनाथकडे गेलं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सरसर बदलले. ती थरथर कापायला लागली आणि मावशीचा हात धरून जोरात ओरडली. “मावशी घरी चल, मला कोणाशीही बोलायचं नाही. मला नकोय कुठलं औषध…” आणि हातात चेहरा लपवून रडू लागली.

    “गौरीताई, रिलॅक्स. तुम्हाला त्रास होत असेल तर आजचं सीटिंग कॅन्सल करू. तुम्ही मावशीबरोबर घरी जा. ओके?” पूर्वाने गौरीला समजावलं.

    गौरी केबिनच्या बाहेर पडली आणि पूर्वा आदिनाथला म्हणाली, “त्या काहीच बोलत नाही. फसलेलं लग्न आहे, इतकंच फक्त त्यांच्या आईवडिलांकडून कळलं.”

    “त्यांच्या पुढच्या सीटिंगला मला कळव, मी येईन.”

    आदिनाथ घरी परतला, पण गौरी डोळ्यासमोरून हलत नव्हती. इतका श्रीमंत, उच्चशिक्षित, देखणा नवरा मिळालेल्या गौरीची ही अवस्था? तो खुर्चीवर डोळे मिटून बसला. गौरीची शेवटली भेट आठवली…

    0000

    गौरी आदिनाथला घट्ट मिठी मारून रडत होती. “आदि, मी आज लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर पडले आणि तुला फोन केला. सगळं संपलं रे! मी तुझी नाही होऊ शकत.”

    “वेडी आहेस का? काहीही संपलेलं नाही. तू माझी आहेस आणि माझीच राहणार.”

    “आदि, ते शक्य नाही. मला आईने नानांची शपथ घातली आहे. नानांना काही झालं तर?”

    “कमॉन गौरी! तुझी तयारी असेल तर सगळं सोडून माझ्या घरी ये. ममा आणि डॅड तुझं स्वागतच करतील.”

    “आदि, माझी हिम्मत नाही. नाना आपलं प्रेम स्वीकारणं शक्यच नाही. मला एकदाच तुला डोळे भरून बघायचं होतं म्हणून आज भेटले. मला विसरून जा आणि माफ कर. मी प्रीत निभावू शकले नाही.” गौरीने त्याचे दोन्ही तळवे हातात घेतले, त्यावर ओठ टेकले आणि ती वळून परत जायला निघाली…

    0000

    “गौरी, थांब,” आदिनाथ जोरात ओरडला.

    “आदि, आर यु ओके?” आदिने वळून बघितलं. डॅड त्याच्या खांद्यावर थोपटत होते. गौरीच्या आठवणींमधून आदिनाथ जागा झाला.

    “डॅड, आज गौरी पेशंट म्हणून पूर्वाच्या क्लिनिकमध्ये आली होती.”

    “गौरी आणि पेशंट?”

    “हो, आय एम गोइंग टु हॅन्डल धिस केस.”

    “गुड बेटा, बेस्ट लक. तिला त्यातून बाहेर काढ आणि घरी घेऊन ये एकदा,” त्याला थोपटत डॅड म्हणाले.

    0000

    पुढच्या सीटिंगला गौरीशी पूर्वा बोलायला लागल्यावर पंधरा मिनिटांनी आदिनाथ आला. “पूर्वा, तुझी हरकत नसेल तर मला फक्त गौरीशी बोलायचं आहे.”

    “ओह शुअर आदि!” पूर्वा केबिनच्या बाहेर जायला लागली तशी गौरी थरथर कापायला लागली. पूर्वा बाहेर गेल्यावर आदिनाथ खुर्चीतून उठला आणि गौरीजवळ आला. गौरी अंग आकसून खाली मान घालून खुर्चीत बसली होती. आदिनाथने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हाक मारली, “गौरी.”

    गौरी आदिनाथच्या कमरेला मिठी मारून जोरात रडायला लागली. आदिनाथ फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवत होता.

    “गौरी, आज आपण काहीच बोलणार नाही. तू शांतपणे घरी जा, औषध घे. पुढच्या सीटिंगला आपण बोलू.”

    आदिनाथने पूर्वाला आत केबिनमध्ये बोलावलं… “पूर्वा, पुढच्या सिटिंगमध्ये गौरी मला सगळं तिच्या मनातलं सांगणार आहे… हो न गौरी?”

    गौरीने आदिनाथकडे बघितलं. तिच्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर आदिनाथला पुसटसं हसू दिसलं.

    0000

    पुढच्या सिटिंगला आदिनाथने गौरीला त्याच्या क्लिनिकमध्ये बोलावलं. आज गौरी थोडी वेगळी वाटली. तिच्या हाता-पायांची थरथर कमी झाली होती.

    “गौरी, तू मनातलं सगळं सांगितल्याशिवाय मी ट्रीटमेंट कशी देणार?”

    “मला काहीही सांगायचं नाही.” गौरी परत रडायला लागली.

    “गौरी…” आदिनाथने उठून तिचा चेहरा त्याच्या हातात धरला, “गौरी, तुला तुझ्या आदिला सगळं सांगावं लागेल.”

    गौरीने त्या पिंगट डोळ्यात बघितलं आणि हुंदके देत सगळं सांगायला लागली, “मी लग्न करून दोन महिन्यांनी व्हिसाचे काम झाल्यावर युएसला गेले. तिथे गेल्यावर कळलं, मी फसले गेले होते. सौमित्र सतत ड्रिंक्स, चरस, गांजा, वेगवेगळ्या मुलींना चटक लावणे, जुगार या सगळ्या वाईट सवयीत अडकला होता. मला सिगरेटचे चटके देऊन त्याच्या आईवडिलांना हे कळता कामा नये, ही धमकी द्यायचा. माझ्याही शरीरावर अत्याचार केले. विकृत होता तो आदि! आपटे काका-काकूंना देखील हे इतकं गंभीर आहे, याची कल्पना नव्हती. मला परतायला कुठलाच मार्ग नव्हता, पण आपटे काका माझ्या पाठीशी राहिले. ते युएसला आले आणि गौरीला चेंज हवा म्हणून भारतात घेऊन जातो, असं सौमित्रला सांगितलं. इथे आल्यावर घटस्फोटाची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. मी दोन महिन्यांची गरोदर होते. अबॉर्शन केलं. आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. जगणं नकोसं झालं होतं. आई, नाना पुरते खचून गेले होते. एकदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला, पण वाचले. आदि, मला जगायचं नाहीय रे!” गौरीने टेबलवर डोकं ठेवलं.

    “सायकॉलॉजीची विद्यार्थिनी इतकी कमकुवत गौरी? तुला कौन्सिलिंगची आवड होती म्हणून तू हा विषय घेतला आणि स्वतःची ही अवस्था करून घेतलीस?”

    आदिनाथने गौरीला प्यायला पाणी दिलं… “औषधं घे, यु विल बी फाइन.”

    “आदि, ममा आणि डॅड कसे आहेत?” गौरी इतकी नॉर्मल बोलतेय हे बघून आदिला प्रचंड आनंद झाला.

    “दोघेही मजेत.”

    “आणि तू..?” गौरीचे डोळे गच्च भरले होते.

    “मी पण मजेत. आपल्या दोघांच्या भेटीतल्या सुंदर आठवणींमध्ये रमतो.”

    “म्हणजे तू?”

    “नाही केलं लग्न! बघितल्या खूप मुली पण प्रत्येकीत गौरी शोधत होतो, ती नाही सापडली.”

    “आदि…”

    “रिलॅक्स गौरी, यावर आपण नंतर बोलू, ओके? आजचं सिटिंग थांबवू. पुढची अपॉइंटमेंट मावशीला घ्यायला सांग.”

    गौरीने आदिनाथकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात तिला तेच प्रेम दिसलं, जे त्याने इतकी वर्ष जपून ठेवलं होतं. गौरीला तिचं वळण सापडलं होतं… आता आदिनाथचा हात धरून ती याच वळणावर मार्गस्थ होणार होती…!

    समाप्त
    Avatar photo
    मधुर सुनील कुलकर्णी

    M A (इंग्लिश) असून पुण्याला वास्तव्य आहे. पाच वर्षांपूर्वी कथालेखनास प्रारंभ केला. त्याआधी अनेक कविता केल्या आहेत. आत्तापर्यंत 60 कथांचे लेखन! 'सिद्धी' हा पहिला कथासंग्रह एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झाला. दुसरा कथासंग्रह 'भक्ती!' नोव्हेंबर 2025मध्ये प्रकाशित झाला आहे. 'सिद्धी' या कथासंग्रहास जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत एक आंतराष्ट्रीय द्वितीय पारितोषिक आणि तीन राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 'भक्ती' या कथासंग्रहास चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही कथांना प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार लाभले आहेत. याबरोबरच गाण्याची आवड असून पुण्यात स्टेज शो करते. हौशी चित्रकार असून अनेक स्केचेस काढले आहेत.

    Related Posts

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026 ललित

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    May 1, 2026 ललित

    कॉन्फरन्स रूममध्ये ‘ती’ व्यक्ती पाहून आराध्याचा श्वासच अडखळला

    May 1, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    By स्नेहा सुतारMay 2, 2026

    भाग – 12 “जुईली… ए जुईली…” आईच्या आवाजाने जुईली दचकून जागी झाली. “अगं दिवेलागणीची वेळ…

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    May 1, 2026

    कॉन्फरन्स रूममध्ये ‘ती’ व्यक्ती पाहून आराध्याचा श्वासच अडखळला

    May 1, 2026

    आश्वस्त करणारी मिठी

    May 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…

    May 2, 2026

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026

    Dnyaneshwari : जी सत्यलोकु तुजमाजीं आहे, देखिला चतुराननु हा नोहे

    May 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 मे 2026

    May 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 285
    • अवांतर 184
    • आरोग्य 107
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 403
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 202
    • मैत्रीण 18
    • ललित 599
    • शैक्षणिक 78
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…

    May 2, 2026
    Most Popular

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.