मेष
स्पर्धात्मक यश मिळेल. या आठवड्यात नोकरदारांना हाती घेतलेल्या कामात यश मिळेल, प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यवसायाची स्थिती चांगली राहील. हाताखालील सहकारी मदत करतील. तथापि, कायद्याची चौकट मोडणार नाही, याची काळजी घ्या. महिलांसाठी प्रवासाचा योग आहे. पण त्याचबरोबर मैत्री करताना जपून करा. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. तसेच, स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.
वृषभ
इच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरदारांना कामानिमित्त परदेशी किंवा बाहेरगावी जावे लागेल. नवीन कामेही मिळू शकतात. तुमच्या कामगिरीवर वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाला लांबची कामे मिळतील. प्रवासाचा खर्च वाढेल; प्रत्येक ठिकाणी स्वतः जाण्याची गरज नाही—भागीदाराला पाठवू शकता. महिलांच्या बाबतीत घरात उत्तम वातावरण राहील. त्यांना प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी मिळतील.
मिथुन
नोकरदारांच्या दृष्टीने अचानक नवीन आव्हाने समोर येतील, त्याला पूर्ण तयारीने सामोरे जाल. प्रवासाचाही योग आहे, आणि त्यातून यश मिळेल. व्यावसायिक वर्गाला आर्थिक कोंडी जाणवेल; पैशांची वसुली महत्त्वाची ठरेल. बँकेची कामे पूर्ण होतील. नवीन करारांवर सही कराल. महिलांना भागीदारीत व्यवसाय सुरू करता येईल. विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे.
कर्क
घरात मंगल कार्य ठरतील. नोकरदारांना अपेक्षित असलेल्या घटना घडतील. बढती आणि पगारवाढीचा योग आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सरकारी माध्यमातून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ तेजीचा आहे. महिलांना घरातील मंगल कार्याच्या तयारीत व्यग्र राहावे लागेल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी संधी मिळेल.
सिंह
हा आठवडा मिश्र परिणाम देणारा आहे. कामाच्या ठिकाणी नोकरदारांचा वाद होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागू शकतो. त्याचबरोबर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल. व्यावसायिक वर्गाला अडकलेली कामे पूर्ण करता येतील. कागदपत्रे व्यवस्थितपणे वाचूनच सही करा. महिलांना कष्टाचे फळ मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. त्यांनी शक्यतो प्रवास टाळावा.
हेही वाचा – ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य
कन्या
या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरदारांना आवडत्या क्षेत्रात काम करता येईल. आरोग्याची काळजी घ्या. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्यासंबंधीची पूर्ण माहिती घ्या. व्यावसायिक वर्गाला व्यवसाय वाढीसाठी योग्य नियोजन करता येईल. त्याद्वारे उत्पन्न वाढेल आणि नवीन गुंतवणूक करू शकता. महिलांना कुटुंबासह धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी वेळेचा योग्य उपयोग करावा.
तुळ
या राशीच्या जातकांनी कोणतीही घाई न करता, संयम ठेवावा आणि देवावर विश्वास ठेवा. नोकरदारांसाठी हा कालावधी संघर्षमय आहे. नोकरी शोधणाऱ्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. कोणाला उसने पैसे देणे टाळा. व्यावसायिक वर्गाने बेकायदेशीर व्यवहार टाळावेत. महिन्याच्या सुरुवातीला मेहनत आणि चिकाटी आवश्यक आहे. महिलांना कामाची गती मंद वाटेल, पण प्रयत्न सोडू नका. विद्यार्थ्यांनी प्रेमसंबंधात सावध राहावे; तसेच वाहन चालवताना काळजी घ्यावी.
वृश्चिक
आर्थिक फसवणुकीची शक्यता आहे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. कामाच्या ठिकाणच्या वातावरणामुळे मानसिक दबाव येऊ शकतो. अशा वेळी ध्यानधारणा करावी. व्यावसायिक वर्गाने प्रत्येक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्यावेत. नवीन गुंतवणूक टाळावी. महिलांचा जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे; तथापि, दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांनी मित्रांबाबत सावध राहावे.
धनु
या आठवड्यात शुभ ग्रहांची साथ आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नोकरदारांना कामे जलद पूर्ण करता येतील. त्यांनी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाची पत वाढेल. तुमच्या शब्दाला वजन मिळेल आणि सामाजिक स्थान उंचावेल. महिलांना मध्यस्थी करून कामे पूर्ण करता येतील; सामाजिक कार्यक्रमात सहभागीही होतील. विद्यार्थ्यांचे भावंडांबरोबरचे मतभेद दूर होतील.
मकर
मित्रांकडून फायदा होईल. नोकरदारांना दैनंदिन कामे सहज पूर्ण करता येतील. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. परदेशातून नवीन संधी येऊ शकतात. व्यावसायिक वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. व्यवसायात यश दिसू लागेल. मित्रांसोबत सहलीचा योग आहे. महिलांचा खर्च वाढू शकतो. विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.
कुंभ
या राशीच्या जातकाला विशिष्ट ओळखीमुळे लाभ मिळेल. नोकरदारांच्या दृष्टीने उत्साही वातावरण राहील. कुटुंबात मंगल कार्य ठरतील. व्यवसायात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. शिवाय, कर्जही मंजूर होऊ शकते. परिणामी व्यापार वाढेल. महिलांना घरातील ज्येष्ठांच्या मदतीने कामे पूर्ण करता येतील. परदेशात शिक्षण घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना यश मिळेल; बँकेची मदत मिळू शकते.
हेही वाचा – आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…
मीन
या राशीच्या जातकांना या आठवड्यात यश मिळेल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तसोच सहकारी सहकार्य करतील. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. व्यावसायिक वर्गाला विरोधकांवर मात करता येईल. नवीन योजना अमलात आणता येतील. धाडसी निर्णयांमुळे आत्मविश्वास वाढेल. पुढाकार घेऊन महिलांना कामे पूर्ण करता येतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि चांगले गुण मिळतील.


