Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: प्रदीप केळुस्कर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299
हेमाचा मेकअप सुरू होता, पंढरीदादा तिला अस्वली बनवत होते. अस्वली… एका आदिवासी बेटाची राणी… उर्वरित जगाचा फारसा संपर्क नसलेले बेट… राणीसह सारेच जंगली… दाट जंगल आणि त्यात वाहाणारे झरे… मोठमोठे वृक्ष, वृक्षाच्या ढोली… असंख्य रानटी प्राणी, सरपटणारे असंख्य जीव… प्राणी मारून खाणारी माणसे… बोट भरकटल्यामुळे दोन प्रवासी या बेटावर आलेले असतात.. ते प्रवासी आणि बेटावरील आठ जंगली माणसे आणि त्त्यांची राणी अस्वली… या नाटकात राणीची म्हणजेच अस्वलीची भूमिका हेमा करणार होती. हेमाचा मेकअप सर्वात कठीण, म्हणून मुख्य मेकअपमन पंढरीदादा स्वतः तिचा मेकअप करत होते, त्त्यांचे दोन सहकारी इतरांचा मेकअप करत होते. हेमाचा मेकअप संपताच जयाने तिच्या अंगावर अस्वलीचे कपडे चढवले……
भाग – 3 मी दोन दिवसांनी पुण्याला आलो. पुण्याला एका ट्युशन क्लासमध्ये इंग्रजी शिकवू लागलो आणि नोकरीसाठी अर्ज, परीक्षा देऊ लागलो. दोन महिन्यांत भारत सरकारच्या संरक्षण खात्यात माझी निवड झाली आणि मी दिल्लीला आलो. माझा पगार सुरू झाला. त्यामुळे भावंडांची शिक्षणे झाली. माझी हुशारी, प्रामाणिकपणा यामुळे नोकरीत भरभर वर चढत गेलो. पण हे सर्व वैद्य सरांमुळेच! याची जाणीव होती. वैद्य सरांनी जगात कसे वागायचे हे शिकवले, नाहीतर आपले काय झाले असते? मागच्या भावंडांची लग्ने झाली, ती स्थिरस्थावर झाली… पण मी मात्र लग्नावाचून राहिलो. आईवडील होते तोपर्यंत लग्नासाठी मागे लागत होते. पण कोल्हापूरात मला लागलेला डाग, त्याचे काय? त्या आरोपातून मी…
भाग – 2 कॉलेज संपल्यावर रोज सायंकाळी, वैद्य सरांबरोबर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये चालणे सुरू होतेच. कॉलेजच्या पहिल्यावर्षाला सरांनी फक्त मराठी आणि हिंदी साहित्याबद्दल गप्पा मारल्या. विजय तेंडुलकर, गो.पू. देशपांडे, मोहन राकेश, अमृता प्रितम, भालचंद्र नेमाडे, अरुण साधू, कुसुमाग्रज, शांता शेळके, पाडगावकर असे रोज एका लेखकाची माहिती सांगायची आणि जाताना त्या लेखकाचे किंवा कवीची पुस्तके सर द्यायचे. दुसर्या दिवशी कालची पुस्तके वाचली की, नाही याची खात्री करायचे. दर रविवारी माझे सरांकडचे जेवण ठरलेलं… त्यावेळी अरुणाची भेट व्हायची. आता हळूहळू माझी भाषा सुधारू लागली होती. कॉलेजमध्ये इंग्लिश ऐकून ऐकून तोंडात इंग्रजी पण बसली होती. त्यामुळे वैद्य सरांची बहीण अरुणाशी थोडंथोडं बोलण्याचे मी धाडस…
सकाळी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो. एवढ्यात सेलफोन वाजला म्हणून पाहिले तर अनोळखी नंबर! फोन रिसिव्ह केला तर कोणीतरी स्त्री बोलत होती… ‘‘मनोहरचा फोन काय रे?’’ ‘‘होय, मनोहर बोलतोय, कोण बोलतंय?’’ ‘‘मी सविता, सविता चौगुले, कोल्हापुरात एम.ए. वर्गातली…’’ ‘‘अरे हो, सविता! किती वर्षांनी? कुठे असतेस? आणि माझा नंबर कोणी दिला?’’ ‘‘अरे, मी पुण्यात असते… आणि तुझा चुलत भाऊ आहे ना जगदीश, तो कोल्हापुरात आपल्या कॉलेजला होता, तो मला भेटतो पुण्यात. त्याच्याकडून नंबर घेतला…’’ ‘‘अच्छा, तू पुण्यात असतेस का? वर्गातील कोणीच भेटत नाही मला. मी गेली पंचवीस वर्षे दिल्लीत आहे, सरकारी नोकरीत!’’ ‘‘हो, जगदीश म्हणाला मला… तू दिल्लीत असतोस म्हणून. बरं,…
विमल ऑफिसमधून बाहेर पडली. स्टेशनच्या दिशेने जात असताना डोक्यात अनेक विचार होते.. त्यातील मुख्य विचार होता, जागृतीचा… जागृती, तिची लाडकी लेक. अजितच्या मागे लाडाने वाढवलेली जागृती. आता मराठी सीरिअल्समध्ये काम करू लागली आहे. अवघे एकवीस वर्षे वय… म्हणून काळजी! हे वय म्हणजे… विमल गाडीत बसली. चर्चगेट टू बोरिवली.. नेहेमीचा लेडीज ग्रुप… विमल जोगेश्वरीला उतरायची. तिची जवळची मैत्रीण संपदा… गेली वीस वर्षे संध्याकाळी याच गाडीत, याच डब्यातून प्रवास. संपदा लवकर आली तर, विमलसाठी सीट ठेवायची… विमल लवकर चढली तर संपदासाठी जागा राखून ठेवायची. संपदाला विमलच्या बारीकसारीक गोष्टी माहीत असायच्या आणि विमलला संपदाच्या! विमल शेजारी बसताच संपदा बोलू लागली… “मग जागृती खूश…
जयवंत देसाईंची गाडी ‘हसमुखराय अँड कंपनी’ समोर थांबली. साठ वर्षांचे देसाई खाली उतरले आणि पेढीच्या पायऱ्या चढले. त्यानी पाहिले शेठजी आपल्या खुर्चीवर नव्हते. शेठजीच्या बाजूच्या खुर्चीवर हरीभाऊ बसत. हरीभाऊ हे शेटजींचे दिवाणजी… व्यवहारावर लक्ष ठेवणारे! हरीभाऊ आतबाहेर करत होते… पेढीतील नोकरांवर ओरडत होते… हातातील ऑर्डर्स पुऱ्या करत होते… हमाल धान्याची पोती उचलत होते… बाहेर नेऊन ढकलगाडीवर ठेवत होते. विजय कॅशिअर पैसे, चेक घेत होता, बिल फाडून देत होता.. नेहेमीचे पेढीवरचे दृश्य होते हे! देसाईच्या समोर हरीभाऊ येताच देसाई म्हणाले, “शेटजी दिसत नाहीत आज?” “त्त्यांचा मुलगा यायचा आहे आज पॅरिसहून… त्याला आणायला विमानतळावर गेलेत… काय ऑर्डर आहे तुमची?” “शनिवारी तुम्ही माल…
भाग – 2 कार्यालयात मी अग्रलेख लिहित असताना दुबईच्या अमला शेखचा मला फोन आला. ती कोल्हापुरच्या लिंगनूरला राहणारी गंगू होती. चार-पाच वर्षांची असताना गंगी निपाणीच्या उरूसमध्ये हरवली होती. तिला पळवून नेले होते. तिला आई-वडिलांचा शोध घ्यायचा आहे. मग मीच त्या शोधमोहिला निघालो. सोबत कार्यालयातील जुना कर्मचारी आणि एकदम विश्वासू असलेल्या भगवानला घेतलं होतं. निपाणीत लहानसे हॉटेल चालवणाऱ्या हरीभाऊंची मदत घेतली. ते कथा-कादंबऱ्या लिहिणारे लेखक होते. ते मला घेऊन लिंगनूरला आनंदरावांकडे आले. हरीभाऊंनी ओळख करून देताना सांगितलं, “हे संपादक प्रवीण कागलकर…” मी त्यांना अमला शेखची माहिती सांगितली. त्यांनी लगेच ओळखलं… “लक्षुमी आणि सद्या यांना गंगी नावाची लेक व्हती, लक्षुमी सारखी देखणी…

