Author: प्रदीप केळुस्कर

Avatar photo

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

नरू जोरात सायकल चालवत होता, त्याच्या पाठीमागे शिऱ्या बसला होता. शिऱ्या घड्याळ बघत म्हणाला, “साडेसहा वाजले की रे, जोरात घे…” “घेतो रे, पन चढ हाय न्हवं…” “अरे, सात वाजले की सर दरवाजा बंद करत्यात… जल्दी.” नरूने जोरात सायकल घेतली आणि पावणेसात वाजता सायकल हॉलच्या पायऱ्याला लावली. दोघे घाम पुसत उभे राहिले. लहानशी वाऱ्याची झुळूक आली, त्याने त्या दोघांना बरे वाटले. मग नरूने हळूच हॉलचा दरवाजा ढकलला… हॉलमध्ये जयवंत सर खुर्चीत बसून पुस्तक वाचत होते. त्यांच्यासमोर, बाकावर आठ मुले आणि चार मुली, दोन वयस्क पुरुष आणि एक वयस्क स्त्री पण बसली होती. नरू आणि शिरीष आत जाऊन एका बाकावर बसले… सात…

Read More

गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला डॉ. जगदाळे बसले होते. मागील बाजूला त्त्यांची पत्नी विजया आणि मोठी मुलगी अश्विनी बसली होती. सर्वजण उसासे टाकत होती. डॉक्टर सतत मोबाइलवर कुणाशीतरी बोलत होते. मागील बाजूला अश्विनी पण मोबाइलवर हळूहळू बोलत होती… विजयाबाई फक्त हुंदके देत होत्या. डॉ. जगदाळे यांचा मुलगा, हेरंबचा ॲक्सिडेन्ट झाला होता. कॉलेजवरून रूमवर येताना मोटरसायकल स्लिप झाली होती आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली त्याचे पाय चिरडले होते. तो रुबी नर्सिंगमध्ये ॲडमिट होता आणि तातडीचे ऑपरेशन सुरू होते.. रात्री विजयाबाई आणि अश्विनी जेवत असताना पुण्याच्या पोलीस स्टेशनवरुन फोन आला. विजयाबाई तर…

Read More

आपा मास्तर नेहमीच्या दुकानात उभे होते. दुकानात गर्दी होती. आज संक्रात, हळदीकुंकू प्रत्येकाकडे असतेच. त्यामुळे गूळ, तीळ, साखर घ्यायला गर्दी झाली होती. आपा मास्तरनी पावं किलो साखरेचे तिळगूळ मागितले. दुकानातला आगाऊ नोकर मास्तरना म्हणाला, “असा काय मास्तर, सासवेसुनेक मिळान फक्त पाव किलो तिळगूळ?” दुकानदाराने हे ऐकले आणि तो ओरडला, “तुकाराम…” तुकारामने जीभ चावली आणि त्याने मास्तरांना हात जोडले. मास्तरांनी त्याला हात दाखवला… आणि ते मालकाकडे गेले. मालक म्हणाला, “राग मानू नकात गुरुजी… तो जरा जादा आसा.” मास्तर म्हणाले, “तेची तरी काय चूक! एवढी तरूण सून घरात दिसता म्हणून तेना विचारल्यानं.” मास्तर घरी निघाले. हळदीकुंकूचे दिवस आले की, ते बेचैन व्हायचे.…

Read More

भाग – 2 नंदा… म्हणता म्हणता मी बारावी झाले आणि रत्नागिरीस डीएडची ॲडमिशन घेतली. आप्पा मला रत्नागिरीस घेऊन गेले, तेव्हा माझ्या लक्षात आले, रत्नागिरीत सुद्धा आप्पांच्या किती ओळखी? अगदी एसटी स्टॅण्डवर सुद्धा लोक आप्पांशी बोलायला येत होती…  आम्ही ज्या लॉजवर राहिलो एक रात्र, तेथे पण आप्पांना मोठं मान…! कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी पोहोचलो तेथील क्लार्क आप्पांना ओळखत होते, त्यांनी भरभर आमची कामे केली. नाट्यप्रेमाने आणि भजनी गाण्याने आप्पांनी माणसे जोडली होती. आप्पांचे नाट्यप्रेम आणि भजनप्रेम जोरात होते, त्यांनी पंचक्रोशीतील धडपड्या तरुणांना एकत्र करून नाटके सुरू ठेवली… आमच्या गावात नोकरीनिमित्त आलेल्या दोन बाई पण नाटकात भाग घेऊ लागल्या आणि आप्पा बाळ कोल्हटकरांची, मधुसूदन…

Read More

भाग – 1 माझी शाळा सुटली तशी मी धावतच घरी आले. बाकी वर्गातील मुले रेंगाळत रेंगाळत येत होती मागाहून… पण मला घाई होती. दूध पिऊन आप्पांसोबत देवळात जायचे होते. आमच्या घराच्या पानंदीजवळ आप्पाच दिसलें. काठीने आमच्या काळू आणि सैना या गाईना हाकवत गोठ्याकडे नेत होते. मला पहाताच आप्पा म्हणाले, “नंदा, धावतेस कशाला? कोण पाठी लागलंय?” मी म्हटलं, “अहो आप्पा, तुमच्याबरोबर देवळात यायचंय, रोजच येते ना मी!” आप्पा हसून म्हणाले, “होय बाई, मला माहात होते पण गमतीने विचारलं.” मी धावत धावत घरात घुसले आणि दप्तर कोपऱ्यात ठेवले. घरात गेले तर आईने नुकतेच चुलीवरून दूध उतरवून ठेवले होते. चुलीच्या बाजूला ठेवलेल्या फडक्याने…

Read More

आज रविवार म्हणून मी घरी होतो, दुपारी थोडी झोप काढावी, असा विचार होता. एवढ्यात वाडीतली यमुनाकाकी दारात हजर झाली. “अण्णानू आसात, काय झोपलात?” “ये बाये ये, नाय झोपाक, काय म्हणत?” मी म्हणालो. “आण्णानू, माझा नशीब फुटक्या…” “काय झाला?” “दोनी सुनो माका विचारणत नाय, माजा नशीब फुटक्या…” “आता नवीन सून इलिया मा घरात!” “पयला बरा म्हणाक व्हया, हय दुसरा त्यांच्यापारीस चढ…” “काय केल्यानी?” मी विचारले. “सकाळी चाय केल्यानं, माका विचारल्यानं नाय… मी चुलीवरसून चाय घेवंक गेलंय तर माजो हात धरल्यानं… सांगता अजून त्याच्या घोवचो चाय होऊचो आसा, तुमी व्हयो तर परत चाय ठेवा…” “मग तू ठेवलस काय परत चाय तुझ्यासाठी?” “मी…

Read More

मी नंदा… माझ्या मुलाने मला दिलेला धक्का तुम्हाला सांगणार आहे… याला धक्का म्हणू की, चटका कोण जाणे? मला दोन मुलगे… नवरा बँकेत नोकरीला. आम्ही दोघे एका तालुक्याच्या गावी राहतो. तसं आमचं घर सांगलीला, पण नोकरीनिमित्त या गावात आहोत. माझ्या मोठ्या मुलाचे, सचिनचे गेल्या वर्षी लग्न झाले. सचिन आणि त्याची बायको दोघेही बँकेत. नोकरीनिमित्त नगरला रहातात. धाकटा मुलगा राहुल इथेच बारावी झाला आणि इंजिनीरिगसाठी पुण्याला गेला. पुण्यात माझ्या नवऱ्याचा मित्र उमेश रहातो. माझा नवरा सुरेश आणि उमेश लहानपणापासूनचे मित्र. उमेश आणि त्याची पत्नी अनिता दोघेही बजाजमध्ये नोकरीला. त्यांना दोन मुली… अनघा आणि अर्चना. आमच्या मुलापेक्षा त्या थोडया लहान. राहुल पुण्यात गेला,…

Read More

शांती भाजीवाली डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आळीत घरोघरी फिरत होती. दीपूच्या आईचं घर येताच तिने टोपली जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने हाळी दिली “ओ दीपूच्या आई, भाजी घेणार काय?” तिची हाळी ऐकून दीपूची आई पदराला हात पुसत बाहेर आली. “घेणार का भाजी, कांदापात हाय, माठ हाय, मुळा हाय, कोबी हाय.” शांतीला पाहताच दीपूच्या आईला आनंद झाला. तशी दोन दिवसाआड येणारी शांती ही त्यांची मैत्रीणच. दोघी एकमेकींसमोर आपलं मन मोकळ्या करायच्या. “होतीस कुठे इतकं दिवस? लय दिसानं आलीस?” “ताप येत होता दादल्याला, त्याला डागदर कडे नेत व्हते.” “आता बरं हाय का?” “व्हय, घेणार का भाजी?” “लाल माठ दे दोन जुड्या…” शांतीने माठाच्या…

Read More

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीजवळची गावे. या गावांतील लोकांना नदीपलीकडे जायचे वांदे होते. उन्हाळ्यात जायला मिळे, पण पावसाळ्यात कृष्णा दुथडी भरून वाहू लागे आणि मग या गावांचा पलीकडील गावांचा संपर्क तुटे. अनेक वर्षांची पूल बांधण्याची लोकांची मागणी सरकारने मान्य केली आणि आंध्र प्रदेशमधील एका कपंनीला पुलाचे काम मिळाले. पूल फार मोठा होता आणि पूल उभारणे जिकिरीचे होते. पुलाच्या बांधकामासाठी मराठवाड्यातील शेकडो मजूर आपल्या बायका-पोरांसह हजर झाले. कंपनीने त्यांना झोपडया उभारण्यासाठी तात्पुरती जागा मिळवून दिली. पाण्यासाठी मोठा ओढा होता.कामगार आले तसे त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी मुकादम आले. मुकादम आपल्या पंटरसह फिरू लागले. इतक्या माणसांसाठी दुकाने उभी राहिली… तसेच विडीकाडी, देशीदारूची पण दुकानें…

Read More

भाग – 2 रविवारी सकाळी 8 वाजता निनाद डॉ. पाटील यांच्या सदाशिव नगरमधील घरी पोहोचला. काल रात्री डॉ. अंजलीने स्वतः फोन करून रविवारी सकाळी 8 वाजता येण्याची आठवण करून दिली. तसेच व्हॉट्सअॅपवर लोकेशन मॅप पाठविला. निनादला डॉ. अंजलीचे कौतुक वाटले. निनादला पाहून डॉ. अंजली म्हणल्या, ‘गुड मॉर्निंग आजगांवकर.’ तो पटकन म्हणाला, ‘गुड मॉर्निंग डॉक्टर.’ ‘‘नाही नाही, रविवारी आम्ही कुटुंबीय डॉक्टर नसतो. रोजच्या व्यापातून वेगळे होण्यासाठी हा रविवार असतो. आज मी फक्त अंजली. या दिवशी आम्ही तिघे भरपूर गप्पा मारतो. रोज आम्ही तिघेजण एवढे घाईत असतो की, एकत्र जेवण किंवा गप्पा शक्यच नसतात… बसा ना. पप्पा एवढ्यात येतील. तो पर्यंत आपण…

Read More